मतदानानंतर सुनेत्रा पवारांना अश्रू अनावर, दादांच्या आठवणीने कंठ दाटला; नेमकं काय म्हणाल्या?

मुंबई तक

• 10:14 AM • 23 Apr 2026

आदरणीय  दादांवरचं प्रेम, विश्वास, आधार आणि त्यांनी दिलेलं योगदान यासाठी बारामतीची जनता सकाळपासून सगळीकडेच उत्साहाने म्हणत नाही मी तर त्यांचं एक कर्तव्य म्हणून आज मतदानासाठी मोठ्या संख्येने बाहेर पडताना दिसत आहेत.

Sunetra Pawar on Baramati by election

Sunetra Pawar on Baramati by election

Google CTA

बातम्या हायलाइट

point

मतदानानंतर सुनेत्रा पवारांना अश्रू अनावर

point

दादांच्या आठवणीने कंठ दाटला

point

नेमकं काय म्हणाल्या?

Sunetra Pawar on Baramati by election : आज बारामती विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक होत आहे. यासाठी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी बारामतीमधील काटेवाडी याठिकाणी मतदानाचा हक्क बजावला. यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्या अत्यंत भावूक झाल्याचं पहायला मिळालं. ही निवडणूक अत्यंत भावनिक वातावरणात होत असल्यामुळे स्वत: बारामतीकरांनीच ही निवडणूक हातात घेतली असल्याचं त्यांनी सांगितलं. 

हे वाचलं का?

'जनता सहा दशके पवार कुटुंबियांच्या मागे'

यावेळी बोलताना सुनेत्रा पवार म्हणाल्या की, 'अत्यंत भावनिक वातावरणात आजची पोटनिवडणूक होत आहे. आताच मी आपल्या सर्वांच्या समक्ष मतदान केलेलं आहे. बारामतीची जनता गेली सहा दशके पवार कुटुंबियांच्या मागे आहेत. आदरणीय  दादांवरचं प्रेम, विश्वास, आधार आणि त्यांनी दिलेलं योगदान यासाठी बारामतीची जनता सकाळपासून सगळीकडेच उत्साहाने म्हणत नाही मी तर त्यांचं एक कर्तव्य म्हणून आज मतदानासाठी मोठ्या संख्येने बाहेर पडताना दिसत आहेत. आणि बारामतीची जनता हे मतदान दादांनी त्यांच्यासाठी केलेल्या योगदानाची परतफेड आणि श्रद्धांजली म्हणून हे सगळे लोक सगळ्या गावातून मोठ्या संख्येने बाहेर पडत आहेत.'

हे ही वाचा : बारामती सर्व्हे: पवार, फडणवीसांसह सगळे एकवटले, सुनेत्रा वहिनींची वाट सोपी, पण एक चॅलेंज...

'अत्यंत  भावनिक निवडणूक'

पुढं बोलताना त्या म्हणाल्या की, 'सगळ्याच बाजूनं अत्यंत  भावनिक निवडणूक आहे. त्यांच (अजितदादांच्या मातोश्री) वय जवळजवळ 89 वर्षे असल्यानं त्यांचं घरीच मतदान झालेलं आहे. त्यांचे आशीर्वाद घेऊन मी इथे आले आहे. आणि दादांशिवाय कुठल्याही गोष्टी करण्याची आपल्याला सवय नाही. पण आज आपल्याला हे मानून चाललं पाहिजे की, दादा आपल्यात नाहीत आणि सगळ्याच बारामतीकरांनी लक्षात घेतलेले आहे आणि ते मतदानासाठी बाहेर पडत आहेत.'

हे ही वाचा : मालेगाव बॉम्बस्फोट: CBI, NIA च्या तपासानंतरही शेवटचे चारही आरोपी निर्दोष, मग दोषी कोण?

'बारामतीकरांनी निवडणूक हातात घेतली'

बारामतीकरांना काय आवाहन कराल या प्रश्नाचं उत्तर देताना त्या म्हणाल्या की, 'खरं सांगायचं तर ही सबंध पोटनिवडणूक अत्यंत भावनिक वातावरणात होत असल्यामुळे स्वत: बारामतीकरांनीच ही निवडणूक हातात घेतली आहे. त्यामुळे ते प्रत्येकजण आपले कर्तव्य म्हणून या निवडणुकीकडे पहात आहेत आणि मतदानााठी ते सगळे बाहेर पडत आहेत.'