बारामती पोटनिवडणूक : अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी शरद पवारांचा काँग्रेसला सल्ला, काय म्हणाले?

Baramati Vidhansabha By Election : बारामती विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी अर्ज माघारी घेण्याचा आज (दि.9) शेवटचा दिवस आहे. या पार्श्वभूमीवर शरद पवारांनी काँग्रेसला सल्ला दिलाय.

Baramati Vidhansabha By Election

Baramati Vidhansabha By Election

मुंबई तक

09 Apr 2026 (अपडेटेड: 09 Apr 2026, 12:16 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी शरद पवारांचा काँग्रेसला सल्ला

point

शरद पवार नेमकं काय म्हणाले?

Baramati Vidhansabha By Election  : महाराष्ट्राचे दिवंगत नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मृत्यूनंतर बारामती विधानसभेची पोटनिवडणूक होत आहे. या निवडणुकीसाठी अर्ज माघारी घेण्याचा शेवटचा दिवस आहे. अनेक राजकीय पक्षांनी या निवडणुकीत सूनेत्रा पवार यांच्याविरोधात उमेदवार न देण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, काँग्रेसने आकाश मोरे यांना मैदानात उतरवलं होतं. दरम्यान, अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी खासदार शरद पवारांनी काँग्रेसला महत्त्वाचा सल्ला दिलाय. शरद पवार काय म्हणाले? जाणून घेऊयात...

हे वाचलं का?

शरद पवार म्हणाले, असं आहे की, "काँग्रेसने लढवायचं ठरवलंय. तो राष्ट्रीय पक्ष आहे. आम्ही काय त्यांना सांगू शकत नाही. पण ही जागा अपघातामुळे रिक्त झाली. अपघातामुळे झाल्यामुळे कतृत्ववान प्रतिनिधी महाराष्ट्रापासून गेला. मला विचारलं तर मी काँग्रेसला सल्ला देईल. या पार्श्वभूमीवर ही निवडणूक बिनविरोध करणे योग्य होईल. मात्र, हा निर्णय काँग्रेसला घ्यायचा आहे. आमचा सल्ला आहे."

हेही वाचा : 'रील स्टार' महिला पोलीस बनल्या खंडणीखोर, प्राचार्याला ब्लॅकमेल करून लाखो उकळले; पोलीस उपनिरीक्षकासह तिघांवर गुन्हा

रोहित पवारांचं सर्व उमेदवारांना आवाहन 

रोहित पवार म्हणाले, "बारामती विधानसभेची पोटनिवडणूक ही बिनविरोध होणं ही अजितदादांवर प्रेम करणाऱ्या राज्यातील प्रत्येकाची आणि तमाम बारामतीकरांची इच्छा आहे. अजितदादांची बहुतांश राजकीय कारकिर्द ही काँग्रेसमध्ये आणि नंतर काँग्रेससोबत गेली. या काळात काँग्रेसच्या प्रत्येक नेत्याशी त्यांचा अत्यंत निकटचा संबंध राहिला. आज बारामती विधानसभा पोटनिवडणुकीतील उमेदवारी अर्ज माघारी घेण्याचा अखेरचा दिवस आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मा. हर्षवर्धन सपकाळ साहेब यांची मुंबईत भेट घेतली आणि अजितदादा, त्यांचं काम आणि त्यांचा काँग्रेसशी असलेला संबंध बघता काँग्रेसने बारामतीत उमेदवारी मागे घ्यावी, अशी विनंती त्यांना केली."

"अजितदादांसारख्या एका प्रमुख नेत्याच्या अपघाताचा FIR जर महाराष्ट्रात होत नसेल अशा सरकारविरोधात संघर्ष का करु नये? असा स्पष्ट विचार त्यांनी यावेळी मांडला. त्यांच्या या विचारांचा आणि त्यांच्या पक्षाच्या धोरणाचा आदर आहे. पण तरीही काँग्रेससह अर्ज दाखल केलेल्या इतरही सर्व अपक्ष उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेऊन सुनेत्राकाकी यांना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करावं, अशी माझी या सर्वांना विनंती आहे आणि या विनंतीचा हे सर्वजण आदर ठेवतील, असा विश्वास आहे.", असंही रोहित पवार यांनी नमूद केलं. 

इतर महत्त्वाच्या बातम्या 

बारामतीच्या पोटनिवडणुकीबाबत काँग्रेसचा मोठा निर्णय? रोहित पवार आणि हर्षवर्धन सपकाळ यांच्या भेटीत काय घडलं?