Barsu Refinery : बारसूमध्ये तुफान राडा, पोलिसांचा लाठीचार्ज; रिफायनरीचा प्रश्न चिघळला

मुंबई तक

28 Apr 2023 (अपडेटेड: 28 Apr 2023, 11:48 AM)

Barsu Refinery protesters Angree : बारसू रिफायनरी प्रकल्प स्थळावरून आंदोलक महिलांना हटवण्यासाठी त्यांच्यावर लाठीचार्ज आणि अश्रूधुरांचाव वापर करण्यात आला होता. या घटनेनंतर घटनास्थळी मोठा संघर्ष पेटला आहे.

barsu refinery women protesters were lathi charged by police

barsu refinery women protesters were lathi charged by police

follow google news

Barsu Refinery protesters Angree : रत्नागिरीच्या राजापूरमध्ये प्रस्तावित बारसू रिफायनरी प्रकल्पावरून कोकणात वातावरण चांगलेच तापले आहे. प्रकल्पासाठी मातीचे सर्वेक्षण सूरू असताना आज मोठ्या संख्यने आंदोलक महिला,पुरूष सर्वक्षणाच्या ठिकाणी दाखल झाल्या होत्या. यावेळी आंदोलकानी या माती सर्वेक्षणाला विरोध दर्शवला होता. या विरोधानंतर पोलिस आणि आंदोलक आमने सामने आले होते. त्यानंतर या आंदोलक महिलांना प्रकल्प स्थळावरून हटवण्यासाठी त्यांच्यावर लाठीचार्ज आणि अश्रूधुरांचा वापर करण्यात आला होता. यानंतर पोलिसांना सर्वेक्षणाच्या ठिकाणाहून आंदोलकांना हटवण्यात यश आले होते. (barsu refinery women protesters were lathi charged by police)

हे वाचलं का?

पोलीस-आंदोलक आमने सामने

बारसू रिफानरी प्रकल्पासाठी मातीचे सर्वेक्षण सुरु असताना आता दुपारी मोठ्या प्रमाणावर आंदोलक सर्वेक्षणाच्या ठिकाणी दाखल झाले होते.यामध्ये महिला,पुरुष आणि तरूणांचा समावेश होता. पोलिस आणि आंदोलक एकमेकांसमोर उभे ठाकल्याचे काही वेळापुर्वीचे दृष्य होते. या आंदोलकांना घटनास्थळावरून हटविण्यासाठी पोलीसांचा मोठा फौजफाटा देखील होता.या पोलिसांनी आंदोलकांना घटनास्थळावरून हटवण्यासाठी लाठीचार्ज आणि अश्रूधुरांचा वापर केला होता. या लाठीचार्ज आणि अश्रूधुरांच्या आंदोलकांवरील वापरानंतर वातावरण चांगलेच तापले होते.

हे ही वाचा >> ‘रिफायनरी लोकांच्या हिताची मग जबरदस्ती का?’ बारसूवरून उद्धव ठाकरे संतापले

विनायक राऊतांना पोलिसांनी घेतलं ताब्यात

ठाकरे गटाने स्थानिकांना पाठिंबा दर्शवला होता. त्यामुळे बारसू येथे आंदोलकांची भेट घेण्यासाठी निघालेल्या ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांच्यासह सात जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहेत. गेल्या अनेक तासांपासून राऊत आणि कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात आहेत. तसेच स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशध्यक्ष, सोलापूर जिल्हाध्यक्ष जनार्दन पाटील यांना देखील पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

माती सर्वेक्षणास पहिल्या दिवसापासून विरोध

बारसू रिफानरी प्रकल्पासाठी गेल्या काही दिवसांपासून मातीचे सर्वेक्षण सुरु आहे. या माती सर्वेक्षणाला कोकणातील नागरीकांनी पहिल्या दिवसांपासून विराेध दर्शवला आहे. पहिल्या दिवशी ज्या गाड्या माती सर्वेक्षणासाठी आल्या होत्या त्या गाड्या अडवण्यासाठी महिलांनी रस्त्यावर लोळण घेतली होती.त्यानंतर पोलिसांनी या महिलांना रस्त्यावरून हटवले होते.

हे ही वाचा >> बारसूसाठी पंतप्रधानांना पत्र अन् ठाकरेंचा दुटप्पीपणा, मुख्यमंत्री काय म्हणाले?

 

    follow whatsapp