नवी दिल्ली: राज्यसभा खासदार राघव चड्ढा यांनी आम आदमी पार्टीचा राजीनामा दिला आहे. शुक्रवारी (24 एप्रिल) एका पत्रकार परिषदेत यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिल्याची घोषणा केली. पण याचवेळी त्यांनी एक मोठा गौप्यस्फोट केला. राघव चड्ढा हे आता आप सोडून भाजपमध्ये सामील होणार आहेत. चड्ढा यांनी स्वतःच्या नावासह भाजपमध्ये सामील होणाऱ्या आपच्या तब्बल 7 खासदारांची नावंही सांगितली. धक्कादायक बाब म्हणजे, 15 दिवसांपूर्वी चड्ढा यांच्या जागी राज्यसभेचे उपनेते म्हणून नियुक्त झालेले अशोक मित्तल हे देखील भाजपमध्ये सामील होत आहेत.
ADVERTISEMENT
भाजपचं नवं ऑपरेशन लोट्स!
राघव चड्ढा यांनी पत्रकार परिषदेत बोलताना असं म्हटलं की, 'आम आदमी पार्टीची ज्या आदर्शांसाठी आणि मूळ मूल्यांसाठी स्थापन झाली होती, त्यापासून ती पूर्णपणे भरकटली आहे. मी आम आदमी पार्टीपासून दूर जाऊन जनतेच्या दिशेने वाटचाल करत आहे,' असे सांगून त्यांनी आपली भाजपमध्ये जाण्याची भूमिका स्पष्ट केली.
हे ही वाचा>> मोठा राजकीय भूकंप... भाजपने मोठा पक्ष फोडला, 'हे' 8 खासदार थेट जाणार BJP मध्ये!
यावेळी त्यांनी अशा 7 खासदारांची नावे सांगितली, जे आता भारतीय जनता पार्टीमध्ये सामील होणार आहेत. राघव चड्ढा यांनी सांगितले की, त्यांनी या विलीनीकरणाची, राजीनाम्यांची आणि इतर बाबींची कागदपत्रे पूर्ण केली आहेत.
पाहा कोणकोणते खासदार जाणार भाजपमध्ये
राघव चड्ढा यांनी जाहीर केलेल्या नावांमध्ये स्वाती मालिवाल, अशोक मित्तल आणि संजीव अरोरा यांच्यासारख्या दिग्गज नेत्यांचा समावेश आहे.
ADVERTISEMENT











