गायकवाडांनी धमक्या दिल्या, अंबींची पोलीस ठाण्यात धाव, सरोदेंमार्फत दाखल केलेली तक्रार जशीच्या तशी

Prashant Ambi registered case against Sanjay Gaikwad : शिवाजी कोण होता? या पुस्तकाचे प्रकाशक प्रशांत अंबी यांनी आमदार संजय गायकवाड विरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. वकील असीम सरोदे यांच्यामार्फत त्यांनी राजाराम पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

Prashant Ambi registered case against Sanjay Gaikwad

Prashant Ambi registered case against Sanjay Gaikwad

मुंबई तक

24 Apr 2026 (अपडेटेड: 24 Apr 2026, 12:01 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

गायकवाडांनी धमक्या दिल्या, अंबींची पोलीस ठाण्यात धाव

point

सरोदेंमार्फत दाखल केलेली तक्रार जशीच्या तशी

Prashant Ambi registered case against Sanjay Gaikwad, कोल्हापूर : कॉम्रेड गोविंद पानसरे लिखित 'शिवाजी कोण होता?' या पुस्तकाच्या शिर्षकावर आणि पुस्तकातील मजकूरावर आक्षेप घेत आमदार संजय गायकवाड यांनी प्रकाशाला शिवीगाळ केली होती. शिवाय, शिवाजी कोण होता? या पुस्तकाचे प्रकाशक प्रशांत अंबी यांना फोनवर वारंवार शिवीगाळ करत संजय गायकवाडांनी "तुला घरात घुसून मारु, पानसरेंना भेटायला वर जा", अशा प्रकारे धमक्याही दिल्या होत्या. आता या प्रकरणात प्रशांत अंबी यांनी वकील असीम सरोदे यांच्यामार्फत राजाराम पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीत नेमकं काय आहे? सविस्तर जाणून घेऊयात... 

हे वाचलं का?

प्रशांत अंबी यांनी सरोदेंमार्फत दाखल केलेली तक्रार जशीच्या तशी 

फोनवर अश्लील शिवीगाळ करणे, छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणे, माझी जीभ कापण्याची व घरात घुसून जीवे मारण्याची धमकी दिल्याबाबत संजय गायकवाड या बुलढाणा येथील आमदारा विरोधात फौजदारी तक्रार... 

मी प्रशांत श्रीकांत आंबी, रा. राजेंद्रनगर, नवीन वसाहत, कोल्हापूर, विनम्रपणे खालीलप्रमाणे तक्रार दाखल करीत आहे. मी गेली अनेक वर्षे कॉम्रेड गोविंद पानसरे लिखित “शिवाजी कोण होता?” हे पुस्तक नाममात्र  किंमतीत संपूर्ण महाराष्ट्रभर वितरित करण्याचे काम करीत आहे. या पुस्तकाच्या शीर्षकात “शिवाजी कोण होता?” असा एकेरी उल्लेख का अश्या कारणावरून बुलढाणा येथील आमदार संजय गायकवाड यांनी माझ्याशी वैमनस्य बाळगून मला दिनांक 22 एप्रिल 2026 रोजी मध्यरात्री 12:51 वाजता त्यांच्या 94049083132 नंबर वरून फोन केला. तेव्हा मी माझ्या घरीच होतो. मी त्यांना सुरुवातीलाच म्हणालो की उद्या बोलू कारण रात्री उशिरा कॉल आला होता.

हेही वाचा : गिरीश महाजनांना धारेवर धरणाऱ्या ‘त्या’ महिलेच्या अडचणी वाढल्या, वरळी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल

सदर फोनवर त्यांनी माझ्याशी अतिशय अश्लील, अपमानास्पद आणि शिवीगाळयुक्त भाषा वापरली. आमदार संजय गायकवाड यांचे प्रत्येक वाक्य ऐकतांना मला वाईट वाटत होते. परंतु मानसिक संतुलन ढळू न देता व असभ्य भाषा न वापरता मी त्यांच्याशी बोलत होतो. इतक्या रात्री कॉल आल्याने व माझी बायको बाजूलाच होती, मी माझ्या बायकोला संजय गायकवाड यांनी माझ्याशी केलेला संवाद ऐकविला. माझ्या बायकोला खूप वाईट वाटले. संजय गायकवाड यांचे प्रत्येक वाक्य कुणालाही राग येईल, मनाचा  तोल बिघडेल आणि मानसिक परिणाम होईल असे तणाव निर्माण करणारे होते. त्यांच्या प्रत्येक वाक्यात शिवी, असंस्कृतपणा, स्त्री देहाचा अपमान करणारे घाणेरडे उच्चार इतकेच नाही तर खुद्द छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणारी स्टेटमेंट्स आहेत. संजय गायकवाड हे गुन्हेगारी प्रवृत्तीचे व्यक्ती आहेत हे याआधीच्या अनेक घटनांवरून दिसते. त्यांनीच अत्यंत गर्वाने सांगितले की, मी कोण आहे ते गुगल, युट्युब इत्यादी समाज माध्यमांवर बघावे. पोलीस सुद्धा आमदार संजय गायकवाड बाबत बघू शकतात व लगेच लक्षात येईल की आमदार असणे म्हणजे आपण काहीही बोलू शकतो, कुणालाही धमक्या देऊ शकतो, कुणाच्याही आई-बहिणींची, बायकोची इज्जत काढू शकतो, कुणालाही मारू शकतो असे त्यांना वाटते. 
आमदार संजय गायकवाड याने जी अश्लील विधाने केलीत, जी शिवीगाळ केली, धमक्या दिल्या, जीभ कापण्याचे व जीवे मारण्याचे वक्तव्य केलीत ती वाक्ये खालीलप्रमाणे आहेत- 
1) अरे, गोविंद पानसरे कोण XXXXX? शिवाजी महाराजांना शिवाजी म्हणणारा!
2) तुला माहितेय ना, पानसरेचे काय हाल झाले?
3) ब्राम्हण आहे का तू?
4) तू काही जास्त शहाणपणा शिकवू नकोस, लिहून घे मी आमदार संजय गायकवाड आहे, तुला घरात घुसून मारीन, XXX, XXX!
5) ये ये XXX, मी धमक्या देत नाही करून दाखवतो.
6) तुया XXXXXXXX, शिवाजी महाराज तुझ्या XXX XXX होता!
 तू शिवाजी लिहिलं कसं? XXX XXXX!
7) तू राहायचो कुठं तू XXXXX!
 तुझ्या घरात घुसून मारीन, तुले XXXXXX!
9) पानसरेला भेटायला वर जाय!
10) अरे XXXXX तू शिवाजी महाराज मला वाचायला काय शिकवतोस? माझ्या रक्तारक्तात, कणाकणात शिवाजी महाराज हायत!
11) तुला उद्या सकाळी कोल्हापुरात उत्तर भेटेल! तुझी माय XXXXXXX
12) अरे XXXXXX जवा आपल्या राजाचा अपमान होता तेव्हा प्रत्येकाचा संयम सुटतो.
13) तुझ्या मायनं दूध पाजलं असलं तर तू सांग कुठे यायचं ते?
14) निघ रे, तुझ्या मायची XXX XXXX, तुझ्या XXXX XX XXX, तुझ्या बायकोची XX XXX, त्या XXXX
15) तू शिवी देऊन तर पाह्य , तुझ्या मायच्या XXXXX XXXXXX
16) तुझ्या XXX XXX XX, माझ्या राजाचा अपमान करतोस काय तू? XXXX तू
17) तू काय सांगतो रे XXX XXXX, XXXX औलाद, XXX तुम्ही आमच्या महाराजाला बदनाम करून टाकलं, XXX, XXXX
18) ये तुझ्या XXXXXXX, मला नको शिकवू वाचायंचं
19) शिवाजी महाराज तुझ्या XX XXXX होता. 
20) जा कुठे रिपोर्ट द्यायचा तिकडे दे, कुठं पब्लिश करायचं पब्लिश कर...तुझ्या XXXXXXX येतो बघ XXXX तिकडं उद्या
21) येतो उद्या, तू भेट फक्त.. तुला कसा चिरडून टाकतो पाह्य जरा..
21) आणि जरा वाच संजय गायकवाड कोण आहे महाराष्ट्रातला आमदार चेक कर तू भी... चेक कर तू, फेसबुक कर.. Youtube कर.. पाह्य समजल तुला..
22) तू आमच्या महाराजांचा अपमान करतो, औरंग्याची औलाद आहेस का तू?
 23) मी पुस्तकं लिहलं काय XXXXX XXXX, त्वा लिहलं ना, XXX । औलाद
24) तू काय दलाल आहेस का पुस्तक वाटणारा XXX रे
25) ये तुझ्या XXX XX XXX, तुझ्यामग XXX XX, तुझ्या बायकोले...
26) काय संस्कार शिकवतो रे XXX XXXX.. XX XX XX
27)  तू काय शिव्या दिशील रे तुझी जीभ कापून टाकीन मी..
28) थांब तूला आता, रोज तुझी XX XXXXX, 100 पुरुष तिथं येऊन
29) काय बघतो रे XXXX.. तुझा XXX XX XXXX.. काय बघतो, XXXXX...

कोणतेही सभ्य संभाषण न करता केवळ शिवीगाळ, असभ्य भाषा असेच संजय गायकवाड करीत होते. तरीही मी त्यांना नम्रपणाने माझे म्हणणे सांगत होतो. दरम्यान मी त्यांना अनेकवेळा तुम्ही पुस्तक वाचा अशी सुद्धा विनंती केली, पण ते ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. वारंवार माझ्याकडून मी त्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न करत होतो, पण ते फक्त शिवीगाळ करीत होते आणि धमक्या देत होते. कोल्हापुरात घरात घुसून तुला मारणार असे त्यांनी अनेकदा म्हटले. ते असंस्कृत, हिंसक लोकांच्या मदतीने माझ्या घरात घुसतील, दंगल घडवून आणतील, सामाजिक तेढ निर्माण करतील अशी साधार भीती मला व माझ्या कुटुंबियांना आहे. त्यांनी व त्यांच्या सोबतच्या गुंडानी आधी सुद्धा अनेकांना जीवावर बेतेल अशी मारहाण केलेली आहे त्यामुळे आमदार संजय गायकवाड वर गुन्हा नोंदवावा. 

संजय गायकवाड वारंवार शिविगाळ करत होते याचबरोबर मला जीवे मारण्याची धमकी दिली. संजय गायकवाडने इतिहास पुरुष, शूरवीर असलेल्या स्वराज्य रक्षक शिवरायांचा अपमान केला आहे त्याबाबत योग्य कलम लावून गुन्हा नोंदविणे आवश्यक आहे. त्यांच्या बोलण्यामुळे मला व माझ्या कुटुंबियांना मानसिक त्रास आणि असुरक्षितता निर्माण झाली आहे. माझ्या कुटुंबात संजय गायकवाड याच्या फोन कॉल धमक्यांमुळे भीती आणि दहशत निर्माण झालेली आहे. या सगळ्याला आमदार संजय गायकवाड जबाबदार आहेत . त्यांच्यावर BNS च्या कलम 351 व 351 (3), कलम 352, कलम 356, कलम 192 व मानवी हक्क संरक्षण कायदा तसेच इतर  कलमांनुसार गुन्हा नोंदवावा म्हणून ही कायदेशीर तक्रार मी देत आहे. आपण त्वरित चौकशी करून कायदेशिर कारवाई करावी यासाठी ही तक्रार आहे. 

मला व माझ्या कुटुंबाला व आमच्या जीवाला आमदार संजय गायकवाड, बुलढाणा आणि त्यांच्या गँगच्या लोकांपासून धोका असल्याने आपण या तक्रारीची गंभीर दाखल घेऊन संजय गायकवाड, पत्ता - शिवाजी नगर, जुनागाव, तालुका व जिल्हा बुलढाणा याच्या विरोधात गुन्हा (FIR)नोंदवावा. 

इतर महत्त्वाच्या बातम्या 

अकोला : पोलीस निरीक्षक असलेला पती दुसऱ्या महिलेसोबत असल्याची खबर, पत्नी तिथे पोहोचताच तुफान राडा