ADVERTISEMENT
Kailash Vijayvargiya News : मध्य प्रदेशचे कॅबिनेट मंत्री कैलाश विजयवर्गीय यांनी महिलांच्या कपड्यांवरुन एक वक्तव्य केलंय. या वक्तव्यमुळे सोशल मीडियावर नवा वाद निर्माण झाला आहे. इंदौरमध्ये एका कार्यक्रमात बोलताना विजयवर्गीय यांनी पाश्चात्य आणि भारतीय संस्कृतीतील वस्त्रसंस्कृतीवर भाष्य केले. त्यांच्या या वक्तव्याचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
हे ही वाचा >> गाड्या थांबल्या, टोळी उतरली आणि तिघांना बेदम मारलं, भर रस्त्यात थरार... बीडमध्ये पुन्हा मोठं प्रकरण
विजयवर्गीय काय म्हणाले?
विजयवर्गीय म्हणाले, "पाश्चात्य संस्कृतीत कमी कपडे घालणाऱ्या मुलींना सुंदर मानले जाते, पण आपल्या भारतीय संस्कृतीत सुंदर कपडे, दागिने आणि श्रृंगार यांना महत्त्व आहे. माझ्या मते, महिलांनी सुंदर कपडे परिधान करावेत, कारण त्या देवीचा अवतार आहेत." मात्र, त्यांनी पुढे केलेल्या एका टिप्पणीने वादाला तोंड फोडले. ते म्हणाले, "मला कमी कपडे घालणाऱ्या मुली आवडत नाहीत. जेव्हा मुली सेल्फी घेण्यासाठी येतात, तेव्हा मी त्यांना सांगतो, बेटा, आधी चांगले कपडे घालून या, मग सेल्फी काढू."
या वक्तव्यामुळे सोशल मीडियावर तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. काहीजण याला विजयवर्गीय यांची वैयक्तिक मते मानत असले, तरी काहींनी याला महिलांच्या कपड्यांवरील अनाठायी टिप्पणी ठरवून टीका केली आहे. हा वाद अशा वेळी समोर आला आहे, जेव्हा अलीकडेच मध्य प्रदेशचे दुसरे कॅबिनेट मंत्री विजय शाह यांच्या कर्नल सोफिया यांच्यावरील वक्तव्यामुळेही वादंग निर्माण झाले होते.
हे ही वाचा >> लग्नाच्या 12 वर्षानंतर सुनेचे सासरच्यांवर छळाचे आरोप, हायकोर्टाचा सुनेलाच दणका, अकोल्याचं प्रकरण काय?
विजयवर्गीय यांच्या या वक्तव्याने राजकीय आणि सामाजिक वर्तुळात नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. सोशल मीडियावर याबाबत जोरदार चर्चा सुरू आहे.
ADVERTISEMENT











