'..यासाठी मी त्यांना परत भेटीन' एकनाथ शिंदेंच्या भेटीबद्दल काय म्हणाले राज ठाकरे?

Raj Thackeray : मनसेप्रमुख राज ठाकरे आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीनंतर विविध चर्चांना उधाण आले होते. मनसे आणि  ठाकरे गटात मीठाचा खडा पडला का? असे प्रश्न उपस्थित केले गेले. यावर राज ठाकरेंनी स्पष्टीकरण दिले आहे. मुंबईतील पार्किंगच्या समस्येसाठी एकनाथ शिंदे यांना भेटलो असल्याचं राज ठाकरे यांनी सांगितलं. ते म्हणाले की, 'या राज्याचा नागरिक, एका पक्षाचा अध्यक्ष म्हणून आणि विरोधी पक्ष म्हणून काही सूचना सत्ताधाऱ्यांना देणं गरजेचं आहे. यासाठी मी त्यांना परत भेटीन.' राज ठाकरे नेमकं काय म्हणाले, सविस्तर जाणून घेऊया

Raj Thackeray

Raj Thackeray

मुंबई तक

• 12:53 PM • 20 Feb 2026

follow google news

बातम्या हायलाइट

point

'..यासाठी मी त्यांना परत भेटीन'

point

एकनाथ शिंदेंच्या भेटीबद्दल काय म्हणाले राज ठाकरे?

Raj Thackeray : मनसेप्रमुख राज ठाकरे आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बुधवारच्या (दि.18) भेटीनंतर विविध चर्चांना उधाण आले होते. मनसे आणि  ठाकरे गटात मीठाचा खडा पडला का? असे प्रश्न उपस्थित केले गेले. यावर राज ठाकरेंनी स्पष्टीकरण दिले आहे. मुंबईतील पार्किंगच्या समस्येसाठी एकनाथ शिंदे यांना भेटलो असल्याचं राज ठाकरे यांनी सांगितलं. ते म्हणाले की, 'या राज्याचा नागरिक, एका पक्षाचा अध्यक्ष म्हणून आणि विरोधी पक्ष म्हणून काही सूचना सत्ताधाऱ्यांना देणं गरजेचं आहे. यासाठी मी त्यांना परत भेटीन.' राज ठाकरे नेमकं काय म्हणाले, सविस्तर जाणून घेऊया.

हे वाचलं का?

हे ही वाचा : 'माझ्या मृत्युनंतर तिची काळजी कोण घेणार?' ISRO च्या निवृत्त कर्मचाऱ्याने बायकोला संपवलं

प्रत्येक वेळी राजकारण शोधलंच पाहिजे का?

एकनाथ शिंदे यांची भेट का झाली याविषयी राज ठाकरे यांनी बोलताना सांगितले की, 'आपल्याकडे पूर्वीसारखे निकोप राजकारण राहिलेले नाही. निवडणूका संपलेल्या आहेत. आज ते (शिंदे) सत्तेवर आहेत. आम्हाला काही सूचना द्यायच्या असतील, काही चांगल्या गोष्टी करवून घ्यायच्या असतील तर त्यासाठी भेट व्हायला नको? प्रत्येक वेळी राजकारण शोधलंच पाहिजे याची आवश्यकता नाही. आज शहरांचे, राज्याचे प्रश्न आहेत. हे प्रश्न आम्ही सांगणं गरजेचं नाहीये का?'

पार्किंगच्या प्रश्नाविषयी भेटलो 

यापुढं बोलताना ठाकरे म्हणाले की, 'आपल्या शहरांची परिस्थिती भीषण अवस्थेत पोहोचली आहे. रस्ते, फ्लायओव्हर, ब्रिज बांधणं म्हणजे अनेकांना विकास वाटतो. मात्र ती सूज आहे. आज मुंबई, ठाणे,पुणे आणि सर्वच शहरांत रिडेव्हलपमेंट सुरु आहे. जिथे 40 माणसं रहात होती आज तिथे 400  माणसं रहात आहेत.अशा परिस्थितीत अनेकांकडे गाड्या आहेत. त्या गाड्या रस्त्यावर पार्क होतात. रस्त्यावर गाड्या पार्क करणाऱ्यांना दंड लावला नाही तर शहरांना शिस्त येणार नाही. हीच गोष्ट मी त्यांच्या कानावर घालायला गेलो होतो. याविषयीच त्यांना भेटायला गेलो होतो. त्यांनी गगराणींना फाईल पाठवली आहे.

हे ही वाचा : बँकिंग क्षेत्रातील 23 वर्षांच्या नोकरीनंतर अमृता फडणवीस यांचा राजीनामा, मुख्यमंत्र्यांच्या पत्नीची पोस्ट तुफान व्हायरल

'कुंपणच शेत खातंय'

मु्ंबईत येणाऱ्या बांग्लादेशी घुसखोरांविषयी विचारले असता ते ठाकरे म्हणाले की, 'आपल्याकडे कुंपणच शेत खातंय. या सगळ्या लोकांना आधारकार्ड, रेशन कार्ड देणारी माणसं इथलीच आहेत. त्यांच्यावर कारवाई  कोण करणार? एका शहरात किती माणसं येऊ शकतात आणि किती माणसं राहू शकतात त्याला आपण आकार-उकार देणार आहोत का? कोणीही उठायचं, कुठेही जायचं आणि कोणत्याही शहरांत रहायला सुरुवात करायची असं होऊ शकत नाही. या गोष्टीचा केंद्र आणि राज्य सरकारने विचार करायला हवा. ज्यांच्याकडे आपण चांगली शहरं म्हणून बघतोय ती बरबाद होणार आणि ती झालेलीच आहेत. या राज्याचा नागरिक, एका पक्षाचा अध्यक्ष म्हणून आणि विरोधी पक्ष म्हणून काही सूचना सत्ताधाऱ्यांना देणं गरजेचं आहे. यासाठी मी त्यांना परत भेटीन.'  

    follow whatsapp