IAS तुकाराम मुंढे यांच्या समर्थकाकडून भाजप आमदाराला धमकी, आता देवेंद्र फडणवीसांचा विधानसभेत मोठा शब्द

IAS Tukaram Mundhe and BJP MLA : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः हस्तक्षेप करत संबंधित व्यक्तीवर कठोर कारवाई होईल, तसेच मुंढे यांच्या बाबतची संपूर्ण माहिती संकलित करून तथ्याधारित निवेदन दिले जाईल, असे आश्वासन दिले.

IAS Tukaram Mundhe and BJP MLA,

IAS Tukaram Mundhe and BJP MLA,

मुंबई तक

10 Dec 2025 (अपडेटेड: 10 Dec 2025, 08:52 AM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

IAS तुकाराम मुंढे यांच्या समर्थकाकडून भाजप आमदाराला धमकी

point

आता देवेंद्र फडणवीसांचा विधानसभेत मोठा शब्द

IAS Tukaram Mundhe and BJP MLA, नागपूर : सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांच्या समर्थकाकडून भाजपचे आमदार कृष्णा खोपडे यांना फोनवरून धमकी दिल्याचा गंभीर मुद्दा मंगळवारी (दि.10) विधानसभेत जोरदार चर्चेचा विषय ठरला. या प्रकरणामुळे सत्ताधारी सदस्यांनी कामकाज स्थगित करण्याची मागणी केली आणि त्यानंतर सभागृहात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. शेवटी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः हस्तक्षेप करत संबंधित व्यक्तीवर कठोर कारवाई होईल, तसेच मुंढे यांच्या बाबतची संपूर्ण माहिती संकलित करून तथ्याधारित निवेदन दिले जाईल, असे आश्वासन दिले.

हे वाचलं का?

आमदार कृष्णा खोपडे यांनी औचित्याचा मुद्दा उपस्थित करत धमकीचे प्रकरण सभागृहात मांडले. खोपडे यांनी सांगितले की, नागपूर स्मार्ट सिटी प्रकल्पातील अनियमितता आणि भ्रष्टाचारावर लक्षवेधी प्रस्ताव दिल्यानंतर एका व्यक्तीने त्यांना फोन करून धमकी दिली. त्यांच्या म्हणण्यानुसार, स्मार्ट सिटीच्या कामांमध्ये काही ठराविक कंत्राटदारांना जवळपास 20 कोटी रुपयांचे नियमबाह्य देयक करण्यात आले होते, ज्यावर त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. याच प्रकरणासह काही महिला अधिकार्‍यांवर दबाव टाकल्याच्या तक्रारींवरही त्यावेळी पोलिसांत गुन्हे नोंदवले गेले होते, अशी माहिती त्यांनी सभागृहात दिली.

हेही वाचा : 'निलेश राणे तर देशभक्तीचं उदाहरण..', सुप्रिया सुळेंनी भर सभागृहात भाजपची काढली पिसं.. 'तो' Video आता थेट दिल्ली दरबारी

या चर्चेदरम्यान विरोधी पक्षातील नेतेही मुद्द्यावर बोलले. काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी मुंढे यांच्याविरोधातील आरोपांचा पुनर्विचार करण्याची मागणी केली. वडेट्टीवार म्हणाले की, आमदारांना धमकी देणे हा गंभीर गुन्हा आहे आणि त्यावर नक्की कारवाई व्हायलाच हवी. मात्र, त्याचबरोबर संबंधित प्रकरणातील सर्व दस्तऐवज तपासून खरी परिस्थिती समोर आणणे आवश्यक आहे. त्या काळातील आयुक्तांनी तपास करून मुंढे यांच्या भूमिकेत कोणतीही अनियमितता नसल्याचे स्पष्ट केले होते, असंही वडेट्टीवार यांनी सांगितलं. तसेच महिला आयोगानेही तक्रारकर्त्या महिला कर्मचार्‍यांच्या वर्तणुकीबद्दलच प्रश्न उपस्थित केले होते, असे त्यांनी सांगितले.

या चर्चेमुळे सभागृहात काही काळ वातावरण चांगलेच तापले. सत्ताधारी सदस्यांनी धमकीच्या घटनेला अत्यंत गंभीर मानत सरकारने तात्काळ ठोस पावले उचलावीत, अशी मागणी केली. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उभे राहून म्हणाले की, "आमदारांना धमकी देणे हा लोकशाही प्रक्रियेवरील आघात आहे. संबंधित व्यक्तीवर निश्चित कारवाई होईल. तसेच तुकाराम मुंढे यांच्याविषयी सर्व बाजूंनी तपास करून वस्तुस्थितीचे स्पष्टीकरण सभागृहात देण्यात येईल."

मुंढे हे राज्यातील कठोर आणि निर्भीड प्रशासक म्हणून ओळखले जातात. अनेक ठिकाणी त्यांनी केलेल्या कारवाईमुळे त्यांचे समर्थक आणि विरोधक दोघेही मोठ्या प्रमाणावर आहेत. त्यामुळे त्यांच्या नावाशी संबंधित कोणतीही घटना राजकीयदृष्ट्या संवेदनशील ठरते. या नवीन घडामोडीमुळे पुन्हा एकदा मुंढे यांच्या कामकाजावर आणि त्या संदर्भातील वादांवर चर्चा रंगण्याची शक्यता आहे. या प्रकरणातील धमकी देणारा कोण? त्याचा मुंढे यांच्याशी प्रत्यक्ष काही संबंध आहे का? आणि सरकारची पुढील कारवाई काय असणार? या प्रश्नांची उत्तरे येत्या काही दिवसांत स्पष्ट होतील.

इतर महत्त्वाच्या बातम्या

'निलेश राणे तर देशभक्तीचं उदाहरण..', सुप्रिया सुळेंनी भर सभागृहात भाजपची काढली पिसं.. 'तो' Video आता थेट दिल्ली दरबारी

    follow whatsapp