LIVE Updates Mumbai BMC Elections 2026: मुंबई महानगरपालिका (BMC) च्या दीर्घप्रतीक्षित सार्वत्रिक निवडणुकीसाठी आता मतदान सुरू झालं आहे. आज गुरुवार (15 जानेवारी 2026) रोजी सकाळी 7.30 ते संध्याकाळी 5.30 वाजेपर्यंत मुंबईतील 227 प्रभागांमध्ये मतदान होणार आहे. राज्यातील एकूण 29 महानगरपालिकांच्या निवडणुका एकाच टप्प्यात होत असून, यामध्ये मुंबईची निवडणूक सर्वात महत्त्वाची मानली जात आहे.
ADVERTISEMENT
मुंबई महानगरपालिका निवडणुकीचे LIVE UPDATE:
- जळगाव शहर महानगरपालिका
सकाळी 11. 30 पर्यंत मतदानाची टक्केवारी: 13.39 टक्के
- जळगाव शहराच्या आर. आर. विद्यालयात बोगस मतदानाच्या आरोपातून गोंधळाचे वातावरण! प्रभाग क्रमांक ५ अ मध्ये बोगस व दुबार मतदार येत असल्याचे आरोप, प्रभाग पाच अ मध्ये शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख तथा माजी उपमहापौर विष्णू भंगाळे आणि अपक्ष उमेदवार पियुष पाटील यांच्यात थेट लढत
- बृहन्मुंबई महानगरपालिका निवडणूक
सकाळी 11.30 वाजेपर्यंत मतदानाची टक्केवारी : 17.73 टक्के
- बृहन्मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक-2026 साठी मतदान केल्यानंतर बोटावरील शाई पुसल्या जात असल्याचे वृत्त विविध माध्यमांतून प्रसारित होत आहे. तसेच,महानगरपालिका आयुक्त यांनी ही बाब मान्य केल्याचेही वृत्तात सांगितले जात आहे. याबाबत बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात येत आहे की, मतदानानंतर बोटावरील शाई पुसल्या जात असल्याबाबत माननीय महानगरपालिका आयुक्त श्री. भूषण गगराणी यांनी कोणत्याही प्रकारचे विधान अथवा वक्तव्य केलेले नाही. त्यामुळे, माध्यमांत प्रसारित होणाऱ्या वृत्तात कोणतेही तथ्य नाही.
- बृहन्मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक
सकाळी 9:30 वाजेपर्यंत मतदानाची टक्केवारी : 6.98 टक्के
- बालमोहन मतदान केंद्रात 22 क्रमांकाच्या ईव्हीएम मशीनमध्ये बिघाड झाला. एका उमेदवाराच्या बूथ एजंटने आक्षेप घेतल्यानंतर ते बदलण्यात आलं.
- मुंबईत 227 प्रभागांमध्ये मतदानाला झाली सुरुवात
- मतदानाची वेळ उलटून एक तास उलटला तरीही, ईव्हिएम मशीन सुरु होईनात,
ज्युनिअर कॉलेज ग्यान केंद्र आणखी दोन-तीन मतदान केंद्रांवर ईव्हिएम मशी सुरु होत नसल्याची माहिती समोर आलीये.
मुंबई महापालिका निवडणुकीसंबंधी महत्त्वाची माहिती
- राज्य निवडणूक आयोगाने 15 डिसेंबर 2025 रोजी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला होता. त्यानुसार:
- नामनिर्देशन दाखल : 23 डिसेंबर 2025 ते 30 डिसेंबर 2025
- अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख : 2 जानेवारी 2026
- अंतिम उमेदवार यादी : 3 जानेवारी 2026
- मतदान : 15 जानेवारी 2026
- मतमोजणी व निकाल : 16 जानेवारी 2026
मतदार आणि प्रभागांची माहिती
मुंबई महानगरपालिकेसाठी सुमारे १.०३ कोटी मतदार (१०,३४४,३१५) पात्र आहेत. यामध्ये पुरुष मतदार ५५.१६ लाख, महिला मतदार ४८.२६ लाख आणि इतर प्रवर्गातील १,०९९ मतदारांचा समावेश आहे. एकूण २२७ प्रभाग असून, त्यापैकी ११४ प्रभाग महिला आरक्षित आहेत. राज्यभरात २९ महापालिकांसाठी एकूण ३ कोटी ४८ लाख ७९ हजार ३३७ मतदार मतदान करणार आहेत.
ADVERTISEMENT











