Chitra Wagh deletes tweet : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंवर केलेल्या टीकेमुळे भाजपच्या विधानपरिषदेच्या आमदार चित्रा वाघ यांच्यावर पोस्ट डिलीट करण्याची वेळ आलीय. सोशल मिडीयावर केलेली पोस्ट चित्रा वाघ यांनी काही मिनीटातच डिलीट करुन टाकली. पण ही वेळ का आली, नेमकं काय झालं ते सुरुवातीपासून जाणून घेऊयात.
ADVERTISEMENT
देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरेंवर टीका करताना काय म्हटलं होतं?
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी नागपुरातील हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येलाच उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला. माध्यमांनी मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदेंना उद्धव ठाकरे आणि इंडिगोवरुन प्रश्न विचारला. यावेळी देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना टोला लगावला. " उद्धव ठाकरे इंडिगो विमानाने येत नाही हे तुम्हाला आणि आम्हाला चांगलं माहिती आहे. ते ज्या विमानाने फिरतात त्याला यायला काही अडचणी नाहीत. आणि जर तेही नको वाटलं तर,शिंदेसाहेबांनी आणि मी समृद्धी महामार्ग बनवला आहे. वाटलं तर गाडी पाठवून देतो", असे चिमटे काढत फडणवीसांनी ठाकरेंच्या प्रायव्हेट जेटमधून येण्यावरुन टीका केली.
हेही वाचा : राज्यातील 38 कारखान्यानी एफआरपीचे 140 कोटी थकवले, खुद्द सहकार मंत्र्यांच्या कारखान्याचे 9 कोटी थकीत
चित्रा वाघ यांच्याकडून प्रायव्हेट जेटने प्रवास करतानाचे फोटो डिलीट
दरम्यान, फडणवीसांच्या या टीकेनंतर भाजपच्या आमदार आणि फडणवीसांच्या निकटवर्तीय चित्रा वाघ यांनी एक पोस्ट केली. या पोस्टमध्ये प्रायव्हेट जेटमधून नागपूरला दाखल झालेल्या आमदार चित्रा वाघ यांनी फोटो पोस्ट केला. या फोटोत आमदार प्रविण दरेकर आणि प्रसाद लाड,सुमित वाघमोडे आणि भाजपचे माध्यम समन्वयक दिसत होते. एकीकडे चित्रा वाघ यांचे नेते देवेंद्र फडणवीस प्रायव्हेट जेटमधून येण्यावरुन टीका करतात, तर दुसरीकडे त्यांचे खास शिलेदार असणारे चित्रा वाघ,प्रसाद लाड आणि प्रवीण दरेकर आणि नवनाथ बन मात्र प्रायव्हेट जेटमधून हिवाळी अधिवेशनासाठी दाखल होतात. विरोधी पक्षातील नेत्यांना सल्ला देणारे फडणवीस त्यांच्याच आमदारांना सल्ला का देत नाहीत? खास शिलेदारांसाठी समृद्धी महामार्गावरुन येण्यासाठी गाडी का पाठवून देत नाहीत? असा सवाल विचारला जाऊ शकतो. त्यामुळे या मुद्द्यावरुन कोंडी होण्याची शक्यता असल्यानेच चित्रा वाघ प्रायव्हेट जेटमधील फोटो असलेली पोस्ट डिलीट केल्याची चर्चा आहे. आजपासून सुरु होत असलेल्या अधिवेशात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये मोठी खडाजंगी होण्याची शक्यता आहे, हा एकप्रकारे त्याचाच ट्रेलर असल्याचं बोललं जातंय.
इतर महत्त्वाच्या बातम्या
ADVERTISEMENT











