CJP Press Conference : इंडियन एक्सप्रेसने निवडणूक आयोगाच्या आयुक्तांमधील मतभेद समोर आणल्यानंतर देशभरात खळबळ उडाली आहे. दरम्यान, सीजेपीने पत्रकार परिषदेत घेत मुख्य निवडणूक आयुक्त ग्यानेश कुमार यांना थेट इशारा दिलाय. ज्ञानेश कुमार यांनी 48 तासांत राजीनामा द्यावा, अन्यथा देशभर आंदोलन सुरू असं सीजेपीचे आंदोलक अभिजीत दिपके यांनी म्हटलंय. ते दिल्लीतील पत्रकार परिषदेत बोलत होते.
ADVERTISEMENT
'सर्व निवडणुका थांबवाव्यात आणि SIR प्रक्रिया स्थगित करावी'
निवडणूक आयोगाने आगामी सर्व निवडणुका थांबवाव्यात आणि SIR प्रक्रिया स्थगित करावी. सर्वोच्च न्यायालयाने SIRशी संबंधित सर्व फाईल्स ताब्यात घ्याव्यात, अशीही मागणी CJPने केली आहे. भविष्यात या फाईल्स आगीत जळाल्याचा दावा केला जाऊ नये, यासाठी त्या न्यायालयाच्या ताब्यात असाव्यात, असे CJPने म्हटले आहे. CJPचे दीपके यांनी ज्ञानेश कुमार यांच्यावर टीका करत, मोदींची चापलुसी करायची असेल तर त्यांच्या घरी चपराशी व्हावे, असंही म्हटलंय.
अभिजीत दिपके म्हणाले, पीनराई विजयन स्वत: जिंकले पण केरळमध्ये मतदार डिलिट झाल्यानंतर ते मुख्यमंत्री होऊ शकले नाहीत. देशातील ताकदवर नेत्यांना संपवण्यासाठी ही प्रोसेस राबवली गेली का? आमचं काही विरोधकांवर विशेष प्रेम नाही. मात्र, लोकशाहीमध्ये विरोधकांना संपवलं तर ती लोकशाही राहणार आहे का? महाराष्ट्रातील प्रादेशिक पक्ष फोडण्यात आले. खासदार-आमदार विकत घेतले. उद्धव ठाकरेंचा पक्ष फोडण्यात आला. निवडणूक आयोगाने त्यांचं चिन्ह भाजपची कंपनी असलेल्या पक्षाला दिला. या सगळ्याचे गुन्हेगार ज्ञानेश कुमार आहेत. भाजपला सत्तेत ठेवण्यासाठी त्यांनी काळजी घेतलीये. त्यांनी तातडीने राजीनामा द्यावा.
"भाजपच्या विजयाचा खरे हिरो ज्ञानेश कुमार आहेत"
पुढे बोलताना अभिजीत दिपके म्हणाले, ज्ञानेश कुमार निवडणूक आयोगाचे आयुक्त बनले त्यापूर्वी हरियाणामध्ये भाजपच्या मतांची टक्केवारी 36 टक्के होती. कुमार आयुक्त बनल्यानंतर भाजपचे मतदार 40 टक्क्यांवर पोहोचले. महाराष्ट्रात 25 टक्क्याहून 27 टक्क्यांवर पोहोचले. दिल्ली, पश्चिम बंगाल, आसाम या सर्व राज्यांमध्ये ज्ञानेश कुमार यांच्या भाजपच्या मतांची टक्केवारी वाढली. भाजप मोदींच्या चेहऱ्यावर निवडणूक जिंकत नाही. भाजपच्या विजयाचा खरे हिरो ज्ञानेश कुमार आहेत. भाजपसाठी त्यांनी अद्वितीय कामगिरी केलीये. कारण आता जेवढ्या भाजप जिंकत आहेत. त्या मोदी लाटेत देखील त्यांना जिंकता आल्या नव्हत्या. 2014 ते 2020 पर्यंत त्यांची लाट होती. आता देशात वेगळं वातावरण आहे. मोदींवर आणि सरकारवर लोकं नाराज आहेत. तरीही त्यांच्या मोठ्या प्रमाणात जागा निवडून येत आहेत. त्याचं खरं कारण ज्ञानेश कुमार आहे. इंडियन एक्सप्रेसच्या रिपोर्टमधून बरंच काही समोर आलंय. ज्ञानेश कुमार मनात येईल, त्या पद्धतीने काम करत आहेत.
सौरव दास म्हणाले, देशातील युवकांना बदल हवाय. आम्ही शाळा ठीक करा, हे कॅम्पेन चालवत आहोत. भ्रष्ट सिस्टिम बदलण्यात यावी, हीच लोकांची इच्छा आहे. देशभरात आमचं अभियान सुरु आहे. आमच्या मतांची किंमत राहिलेली नाही, असं लोकं म्हणत आहेत. लोकांचा मतांचा अधिकार काढून टाकण्यात येत आहे. जे झीला फॉर्म 6 च्या अडून मतदानापासून वंचित ठेवले जात आहे.
ADVERTISEMENT












