Baramati Lok Sabha elections 2024 : बारामतीसाठी अजित पवारांचा विजय शिवतारेंसोबत 'तह'

ऋत्विक भालेकर

28 Mar 2024 (अपडेटेड: 28 Mar 2024, 09:08 AM)

Baramati Lok Sabha Elections 2024 : विजय शिवतारे यांनी अजित पवारांविरोधात मैदानात उडी घेतली होती, पण एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत समेट झाला आहे.

विजय शिवतारे आणि अजित पवारांतील वादावर पडदा पडला आहे.

विजय शिवतारे यांचे बंड थोपवण्याचा प्रयत्न एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्याकडून झाला.

follow google news

Vijay Shivtare ajit pawar baramati lok sabha elections 2024 : बारामती लोकसभा मतदारसंघामधील तिढा सुटला आहे. अजित पवारांचा बदला घ्यायची वेळ आली आहे, असे म्हणत शिवसेनेचे विजय शिवतारे यांनी दंड थोपटले होते. त्यामुळे बारामतीत अजित पवार यांना सुनेत्रा पवार यांना निवडून आणणे जड जाईल, अशी चर्चा सुरू झाली होती. अखेर शिवतारेंचा विरोध थोपवण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मध्यस्थी केली. त्यामुळे आता शिवतारे सुनेत्रा पवार यांना पाठिंबा जाहीर करणार असल्याची माहिती आहे. 

हे वाचलं का?

शिवसेनेचे माजी मंत्री विजय शिवतारे यांनी बारामती लोकसभा लढवण्याची भूमिका घेतली होती. शिवतारे यांनी थेट अजित पवारांविरोधातच बंड केल्याने याचा फटका सुनेत्रा पवारांना बसेल, अशी चर्चा सुरू झाली. शिवसेना महायुतीतील पक्ष असूनही, शिवतारे विरोध करत असल्याने दोन्ही पक्षांमध्येही वाद सुरू झाला होता. मात्र, त्यावर बुधवारी (२७ मार्च) रात्री पडला.

अजित पवार-विजय शिवतारेसोबत शिंदे फडणवीसांची बैठक

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत बंडाचे निशाण फडकवणाऱ्या विजय शिवतरे यांना बैठकीसाठी बोलवण्यात आलं होतं. बुधवारी (27 मार्च) मध्यरात्री वर्षा या मुख्यमंत्र्यांच्या निवास्थानी या सर्व नेत्यांची जवळपास दीड तास बैठक पार पडली.

हेही वाचा >> 'भाजपला कमळावरती बाईच पाहिजे', राणांना उमेदवारी मिळाल्यावर अडसूळ बिथरले

अमित शाहांची शिंदेंना सूचना 

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या बैठकीत विजय शिवतारे यांची समजूत काढण्यात आली. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या सूचनेनुसार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना बारामतीतील हा तिढा सोडवण्याची जबाबदारी देण्यात आली होती. त्यामुळे शिवतारे आणि अजित पवार यांना समोरासमोर बसवून मागील सर्व वादावर पडदा टाकण्याचा निर्णय झाला. 

शिवतारेंनी कोणत्या मागण्या केल्या?

मतदारसंघातील जवळपास 11 प्रलंबित विकासकामांना निधी देऊन गती देण्याचं आश्वासन शिवतारे यांना तीनही नेत्यांकडून देण्यात आलं. यामध्ये पुरंदर विमानतळ प्रकल्पासाठी भूसंपादनासाठी स्वेच्छादाराचा विषय, जेजुरी विकास आराखडा, राष्ट्रीय बाजार प्रकल्प अशा विविध प्रकल्पाबाबत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री प्रचार सभांमध्ये आश्वासन देऊन कामांना गती देतील असे आश्वासन देण्यात आले आहे.

हेही वाचा >> शिवसेनेच्या दिग्गज नेत्याचं कापलं तिकीट; शिंदेंनी गमावली जागा...

शिवतारेंच्या भूमिकेकडे लक्ष

विजय शिवतारे यांच्यासोबत चर्चा झाली. आता बारामतीतून उमेदवारी भरायची की नाही याबाबत समर्थक आणि जिल्हा परिषद सदस्यांशी 28 मार्चला पुण्यात चर्चा करून भूमिका जाहीर करणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. पत्रकार परिषदेत शिवतारे भूमिका मांडणार असून, महायुतीच्या उमेदवार म्हणून सुनेत्रा पवारांना पाठिंबा जाहीर करतील, असे म्हटले जात आहे. 

    follow whatsapp