Ajit Pawar: "राष्ट्रवादीचा तिरंगा झेंडा...", पुण्यात भगवा फडकवण्याच्या शिंदेंच्या विधानावर अजितदादा नेमकं काय म्हणाले?

मुंबई तक

01 Mar 2025 (अपडेटेड: 01 Mar 2025, 05:47 PM)

Ajit Pawar Press Conference :  पुणे जिल्ह्यात भगवा फडकवायचा आहे, असं मोठं विधान राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुणे जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना केलं होतं. यावर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मोठी प्रतिक्रिया दिली आहे

Ajit Pawar On Eknath Shinde

Ajit Pawar On Eknath Shinde

Google CTA
▌

बातम्या हायलाइट

point

पुण्याच्या राजकारणाबाबत अजित पवारांचं मोठं विधान!

point

एकनाथ शिंदेंना अजित पवारांनी दिलं रोखठोक उत्तर

point

अजित पवार पत्रकार परिषदेत नेमकं काय म्हणाले?

Ajit Pawar Press Conference :  पुणे जिल्ह्यात भगवा फडकवायचा आहे, असं मोठं विधान राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुणे जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना केलं होतं. यावर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मोठी प्रतिक्रिया दिली आहे. पत्रकार परिषदेत अजित पवार म्हणाले, "तुम्ही (मीडिया) लावालाव्या करायच्या बंद करा. असले धंदे बंद करा. खऱ्या बातम्या द्यायला शिका. मधेही ज्या काही घटना घडल्या. एकदा पोलिसांचा रिपोर्ट येऊद्या. काही माहिती घेण्याच्या आतच काही लोक उतावीळपणा दाखवतात. काय करू आणि काय नाय. काही माहिती घेण्याच्या आधीच बातम्या देतात. पण तुमचा तो अधिकार आहे. पण आमची विनंती आहे, इतका आतातायीपणा चांगला नाही. थोडसं सबुरीनं घेतलं तर जास्त बरं होईल".

हे वाचलं का?

"आम्ही महायुतीच्या सरकारमध्येच काम करतोय.  आम्हाला मोठं बहुमत महाराष्ट्रातल्या जनतेनं दिलं आहे. पण त्याचबरोबर प्रत्येकाला आपापला पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे. ते शिवसेनेचे नेते आहेत, त्यामुळे ते तसं म्हणणार. ते महाराष्ट्रात गेल्यानंतर प्रत्येक जिल्ह्यात तसं सांगू शकतात. आमचे देवेंद्र फडणवीस साहेब गेले, तर ते सांगू शकतात. आपल्याला भाजपचा झेंडा तिथे रोवायचा आहे. मी तिथे गेलो तर मी सांगेन मला राष्ट्रवादीचा तिरंगा झेंडा तिथे फडकवायचा आहे. आम्ही एकजुटीनं राहायचं ठरवलेलं आहे. कुणाच्या हातात सूत्र द्यायची आणि कुणाच्या हातात नाही, हे जनता जनार्दनाच्या हातात आहे", असं मोठं विधान पवार यांनी केलं.

हे ही वाचा >> 'आता 'त्यांनी' धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतला नाही तर...' अंजली दमानिया संतापल्या

एखाद दुसरा अपवाद वगळता सर्व जिल्ह्यांमध्ये लहान बालकांचं आरोग्य चांगलं राहण्यासाठी महत्त्वाचा कार्यक्रम केंद्र सरकारने मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली घेतलेला आहे. राज्य सरकारचे देवेंद्र फडणवीस असतील, एकनाथ शिंदे असतील, प्रकाश आबिटकर, दादा भुसे आम्ही सगळ्यांनी मिळून आज त्याचा शुभारंभ केलेला आहे. आपल्या महाराष्ट्रात अंगणवाडीत शिकत असलेली बालकं आणि प्राथमिक शाळेत शिकत असणारी लहान मुलं, साधारण 24 ते 25 लाख विद्यार्थ्यांचं आरोग्य तपासण्याचं काम आपण करतोय, असंही अजित पवार म्हणाले. 

हे ही वाचा >> Beed: "जोपर्यंत फाशी होत नाही, तोपर्यंत..." वाल्मिक कराडवर आरोपपत्र दाखल होताच धनंजय देशमुखांची मोठी प्रतिक्रिया