"अहंकारी लोकांचा फणा 2024 च्या निवडणुकीत जनतेनं ठेचला आणि..", उपमुख्यमंत्री शिंदेचं उद्धव ठाकरेंवर शरसंधान!

मुंबई तक

• 09:17 PM • 19 Jun 2025

DCM Eknath Shinde Today Speech :  "2024 ला आपल्या शिवसेनेनं 80 जागा लढवल्या आणि तब्बल 60 जागा जिंकल्या. उबाठाने 85 जागा लढवल्या. त्यांनी अवघ्या 20 जागा जिंकल्या. पण...

Eknath Shinde On Uddhav Thackeray

Eknath Shinde On Uddhav Thackeray

Google CTA

बातम्या हायलाइट

point

शिवसेनेच्या मेळाव्यात एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका

point

जनतेनं त्यांची बिन पाण्याने हजामतपण करून टाकली आहे, म्हणून..

point

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नेमकं काय म्हणाले?

DCM Eknath Shinde Today Speech :  "2024 ला आपल्या शिवसेनेनं 80 जागा लढवल्या आणि तब्बल 60 जागा जिंकल्या. उबाठाने 85 जागा लढवल्या. त्यांनी अवघ्या 20 जागा जिंकल्या. स्ट्राईक रेट फक्त 23 टक्के होता. म्हणजे आपल्या शिवसेनेच्या 1/3 मतंही त्यांना मिळालं नाही. कारण विधानसभेच्या निवडणुकीत या महाराष्ट्रातल्या जनतेनं त्यांना जोरदार थर्ड दिला. वन थर्डही मतं मिळाली नाहीत. ज्या जागा जिंकल्या त्या देखील काँग्रेसच्या व्होट बँकेवर..काँग्रेसच्या मेहरबानीवर..कारण शिवसेनेच्या हक्काच्या उमेदवारांनी उबाठाला कधीच बायबाय केला आहे.

हे वाचलं का?

हे या 2024 च्या निवडणुकांमध्ये आपण पाहिलं. जनतेनं त्यांची बिन पाण्याने हजामतपण करून टाकली आहे. म्हणून आपल्याकडे आत्मविश्वास आहे. त्यांच्याकडे अहंकार आहे. आत्मविश्वास आपल्याला यशाकडे नेतोय. अहंकार त्यांना विनाशाकडे नेतोय. अहंकारी लोकांचा फणा 2024 च्या निवडणुकीत जनतेनेच ठेचण्याचं काम केलंय", असं म्हणत राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर अप्रत्यक्षपणे हल्लाबोल केला. ते शिवसेनेच्या वर्धापनदिनी शिवसैनिकांना संबोधीत करताना बोलत होते.

हे ही वाचा >> 'एकत्र येऊ नये म्हणून यांच्या मालकाचे नोकर...' मनसेच्या युतीवर उद्धव ठाकरेंचं आजवरचं सगळ्यात मोठं विधान

एकनाथ शिंदे पुढे म्हणाले, "शिवसेनेत जी काही वाढ होतेय, ती बाळासाहेबांच्या विचारांची आहे. धर्मवीर आनंद दिघे साहेबांची शिकवण, 80 टक्के समाजकारण आणि 20 टक्के राजकारण हा मूलमंत्र घेऊन आपण पुढे चाललो आहे. मला सांगायला अभिमान वाटतोय, आपण बाळासाहेबांचा विचार जीवापाड जपला. शिवसेनेचं नाव आपण जपलं. त्यामुळे शिवसेनेची विजयी घौडदौड दिमाखात सुरु आहे. विधानसभेच्या गेल्या तीन निवडणुकांमध्ये काय झालं, ते आपल्याला माहित आहे. 2014 साली शिवसेनेनं 282 जागा लढवल्या. 63 जागा जिंकल्या. त्यावेळी फक्त 22 टक्के स्ट्राईक रेट होता. 2019 साली शिवसेनेनं 124 जागा लढवल्या आणि 56 जागा लढवल्या. त्यावेळी स्ट्राईक रेट 45 टक्के होता".

हे ही वाचा >> नाशिकमध्ये पूर.. धडकी भरवणारी दृश्य, पावसाचं थैमान! पुण्यातही पावसाचा धुमाकूळ

"आपण आणि महाराष्ट्र याचा साक्षीदार आहे. बाळासाहेबांनी ज्या काँग्रेसला आयुष्यभर विरोध केला, त्याच काँग्रेसच्या दावणीला शिवसेना बांधण्याचं पाप कोणी केलं, आपल्याला माहितीय. सत्तेसाठी लाचारी पत्करली आणि कंबरेचं डोक्याला गुंडाळलं. ही अशी परिस्थिती निर्माण ज्यांनी केली. त्यांना 2019 ला शिवसेनेच्या मतदारांचा विश्वासघात त्यांनी केला. बाळासाहेबांचा विश्वासघात त्यांनी केला. बाळासाहेबांच्या विचारांचा विश्वासघात त्यांनी केला. मराठी माणसाचाही विश्वासघात त्यांनी केला. हिंदूत्वाचाही विश्वासघात केला. असा विश्वासघातकी माणूस या महाराष्ट्राने कधी पाहिला नाही", असंही शिंदे म्हणाले.