मुंबई: शेतकरी आंदोलनातून सरकारला कर्जमाफीसाठी धारेवर धरणारे नेते बच्चू कडू यांनी मुंबई Tak चावडीवर एक अत्यंत खळबळजनक खुलासा केला आहे. गुवाहटीला जाण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी स्वत: बच्चू कडूंना फोन केला होता असं खुद्द फडणवीस म्हणाले होते. पण याचबाबत चावडीवर प्रश्न विचारण्यात आला तेव्हा बच्चू कडू थेट असं म्हणाले की, 'फडणवीस साहेब तेव्हा साफ खोटं बोलले...'
ADVERTISEMENT
पाहा बच्चू कडू नेमकं काय म्हणाले...
प्रश्न: देवेंद्र फडणवीसांनी मागे सांगितलं होतं की, 'माझ्या एका फोनवर बच्चू कडू हे गुवाहटीला गेले होते. ते एकमेव असे आमदार होते की, ज्यांना मी फोन केला होता.' यावेळी बच्चू कडूंनी त्यांचं सर्वस्व पणाला लावलं. जे त्यांच्याकडे मंत्रिपद होतं ते सोडून ते तिकडे गेले. ते मंत्रिपद त्यांना मिळालं देखील नाही हा भाग वेगळा.
फडणवीस हे तेव्हा मुख्यमंत्री देखील नव्हते. पण तरीही त्यांच्या एका फोनवर तुम्ही तुमचं सर्वस्व पणाला लावून गुवाहटीला गेलात. तर तशाच पद्धतीने तुम्ही एक फोन फडणवीसांना लावून शेतकऱ्यांचे प्रश्न मांडले का? किंवा तसं काही करण्याचा प्रयत्न केला का? जेणेकरून तुम्हाला आंदोलन करण्याची गरजच भासली नसती.
हे ही वाचा>> 'आम्ही तारीख घ्यायला आलो होतो आणि आम्हाला..', बच्चू कडूंना CM फडणवीसांनी दिला 'तो' शब्द!
बच्चू कडू: पुन्हा गफलत आहे.. तुम्ही फोन लावायचं म्हणता आहात. पण मी 8 दिवस अन्नत्याग केलं आहे. ते तुम्हाला महत्त्वाचं वाटत नाही आणि तुम्ही फोन लावायचं म्हणत आहात. अहो किती कठीण काम आहे..
माझं काय म्हणणं आहे.. तेव्हा मला मुख्यमंत्र्यांनी फोन लावलाच नाही. फडणवीस साहेब तेव्हा साफ खोटं बोलले.. मला त्यांनी फोनच लावला नाही. त्यांनी त्या राणा आणि आमच्या वादात त्यांनी सांगितलं की, हा वाद मिटवा वैगरे.. त्या दृष्टीने ते बोलले असतील. मला फोनच लावला नाही. तुम्ही कधी मला विचारलं? मी हे 10 वेळा सांगितलं आहे की, देवेंद्र भाऊ फडणवीसचा मला एक फोनही आला नव्हता. या सगळ्या संदर्भात..
हे ही वाचा>> शेतकरी कर्जमाफी: बच्चू कडूंची CM फडणवीसांसोबत बैठक सुरू असतानाच आला GR, नेमकं काय आहे जीआरमध्ये?
मग कोणी काही बोलेल आणि तुम्ही आरोप करणार? तुम्ही म्हणता फोन लावूनच तुम्ही प्रश्न मांडायला पाहिजे होते. अरे फोन लावण्यापेक्षा मी अन्नत्याग आंदोलन केलंय. 400 किमी पायी चाललो, पायाला फोडं आले. ते काय फोननं होणार होतं काम?
प्रश्न: तुमची फडणवीसांबरोबर जवळीक आहे तर त्याचा उपयोग जास्त झाला पाहिजे.. अशा अर्थाने तो प्रश्न आहे..
बच्चू कडू: जवळीक असती तर.. या सहा महिन्यात माझ्याविरोधात 50 गुन्हे दाखल आहेत. जळगाव, यवतमाळ, चंद्रपूर इकडे वेगवेगळे गुन्हे दाखल आहेत. आता जे गुन्हे दाखल आहेत ना ते 10 वर्षांच्या शिक्षेचे आहेत.
प्रश्न: हे सरकार तुमच्यावर सूड उगवतंय?
बच्चू कडू: उगवणारच.. फक्त 50-60 कोटी रुपये खर्च करणार.. माझ्या विरोधात बोलायला लावणार, सुपारी घेणार. बच्चू कडूला बदनाम करणार. त्याला तसं मारण्यापेक्षा बदनामी करून मारणार बच्चू कडूला. बदनामी करण्याचा डावच आहे.
ADVERTISEMENT











