Dhairyasheel Kadam profile story : सांगली-सातारा स्थानिक स्वराज्य संस्था विधानपरिषद निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टीने धैर्यशील ज्ञानदेव कदम यांना उमेदवारी जाहीर केलीये. या जागेसाठी महायुतीमधील अनेक ज्येष्ठ आणि मातब्बर नेते इच्छुक होते, मात्र पक्ष नेतृत्वाने शेवटी कदम यांच्यावर विश्वास दाखवत त्यांना उमेदवारी जाहीर केली.
ADVERTISEMENT
हेही वाचा : मुंबई: मुलगा दुधासाठी रडत होता, वडिलांनी दिलं फेकून अन्.. स्वत: दारूच्या नशेत
भाजपने उमेदवारी जाहीर केल्यानंतर कदम यांची प्रतिक्रिया
उमेदवारी जाहीर झाल्यानंतर धैर्यशील कदम म्हणाले, "हा माझ्या 32 वर्षांच्या कामाचा सन्मान आहे. पक्षात जो निर्णय घेतला जातो, त्याच्या पाठीशी ठामपणे उभे राहणे हे आमचे कर्तव्य आहे. त्यामुळे तिकीट मिळण्यापूर्वी आम्ही जे चार ते पाच जण इच्छुक होतो, त्या सर्वांचाच हा विजय आहे असे मी मानतो. निवडणुकीच्या काळात सर्वजण पक्षाच्या पाठीशी एकदिलाने उभे राहतील", असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला.
हेही वाचा : गडचिरोली : समलैंगिक संबंधांचा थरारक अंत, सतीशने काय केलं?
धैर्यशील कदम यांचा राजकीय प्रवास
महाराष्ट्राच्या राजकारणात संघटन कौशल्य, कार्यकर्त्यांशी असलेली नाळ आणि सातत्यपूर्ण जनसंपर्क यांच्या बळावर स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणारे नाव म्हणून धैर्यशील कदम यांना ओळखलं जातं.. सातारा जिल्ह्यात भाजपचा विस्तार करण्यामध्ये त्यांचे योगदान महत्त्वपूर्ण मानले जाते.
राजकारणातील त्यांचा प्रवास संघर्षातून घडलेला आहे. सुरुवातीच्या काळात त्यांनी काँग्रेस पक्षातून राजकीय वाटचाल केली. 2014 मध्ये कराड उत्तर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली. त्यानंतर त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश करून सातारा जिल्ह्यात पक्ष संघटना मजबूत करण्याचे काम हाती घेतले.
धैर्यशील कदम यांनी भाजपचे सातारा जिल्हाध्यक्ष म्हणून काम करताना जिल्ह्यात पक्षाचा विस्तार, बूथस्तरावरील संघटन बांधणी आणि सदस्य नोंदणी अभियान प्रभावीपणे राबवले. त्यांच्या नेतृत्वाखाली भाजपने ग्रामीण भागातही मजबूत पाय रोवले. कार्यकर्त्यांना सोबत घेऊन काम करण्याची त्यांची शैलही त्यांची सर्वात मोठी ताकद मानली जाते.
पक्ष संघटनेतील त्यांच्या कार्याची दखल घेत भाजप आणि महायुतीने सातारा-सांगली स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून विधान परिषद निवडणुकीसाठी त्यांच्यावर विश्वास व्यक्त केला. स्थानिक स्वराज्य संस्थांमधील व्यापक संपर्क, संघटन कौशल्य आणि कार्यकर्त्यांचा मजबूत पाठिंबा यांच्या बळावर त्यांनी विधान परिषदेत प्रवेश केला. सध्या ते सातारा आणि सांगली जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्था, विकासकामे, ग्रामीण प्रश्न, पायाभूत सुविधा, शिक्षण, रोजगार आणि शेतकरी हिताच्या मुद्द्यांवर सक्रियपणे काम करत आहेत. शांत, संयमी आणि अभ्यासू नेतृत्व म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
ADVERTISEMENT











