भाजपने बसवराज पाटील यांना उमेदवारी, आता काँग्रेसने तरुण तुर्क नेता मैदानात उतरवला

Maharashtra Politics : भाजपने धाराशिव–बीड–लातूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधानपरिषद मतदारसंघातून बसवराज पाटील यांना उमेदवारी दिलीये. तर काँग्रेसने तरुण तुर्क नेता मैदानात उतरवला

Maharashtra Politics

Maharashtra Politics

मुंबई तक

01 Jun 2026 (अपडेटेड: 01 Jun 2026, 11:51 AM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

भाजपने बसवराज पाटील यांना उमेदवारी

point

आता काँग्रेसने तरुण तुर्क नेता मैदानात उतरवला

Maharashtra Politics, गणेश जाधव  : धाराशिव–बीड–लातूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने माजी मंत्री बसवराज पाटील (मुरूमकर) यांची, तर काँग्रेसने युवा नेते महेश देशमुख यांची उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे या मतदारसंघात अनुभवी नेतृत्व विरुद्ध युवा नेतृत्व अशी चुरशीची लढत रंगणार आहे. विशेष म्हणजे दोन्ही उमेदवार धाराशिव जिल्ह्यातील हे उमरगा तालुक्यातील आहेत.

हे वाचलं का?

हेही वाचा : आधी गोड-गोड बोलली अन् नंतर घरी बोलवून केलं कांड, तरुणासोबत घडलं भयानक

भाजपची उमेदवार यादी 

भाजपच्या 11 उमेदवारांची संपूर्ण यादी (मतदारसंघानुसार)
वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली : अरुण लखाणी
भंडारा-गोंदिया : अविनाश ब्राह्मणकर
अमरावती : प्रवीण पोटे पाटील
सांगली-सातारा : धैर्यशील कदम
सोलापूर : राजेंद्र राऊत
अहिल्यानगर : प्राजक्त तनपुरे
छ. संभाजीनगर-जालना : सुहास शिरसाट
नांदेड : अमर राजूरकर
धाराशिव-बीड-लातूर : बसवराज पाटील  
जळगाव : नंदकिशोर महाजन
नागपूर : डॉ. राजीव पोतदार

हेही वाचा : एक दिवसापूर्वी भाजपात आले, अन् थेट विधानपरिषेदची उमेदवारी

धाराशिव–बीड–लातूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने माजी मंत्री बसवराज पाटील (मुरूमकर) यांची अधिकृत उमेदवारी जाहीर केली आहे. भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीने उमेदवारांची यादी जाहीर करत त्यांच्या नावावर अंतिम शिक्कामोर्तब केले.

कोण आहेत बसवराज पाटील?

बसवराज माधवराव पाटील हे मराठवाड्यातील ज्येष्ठ आणि अनुभवी राजकारणी म्हणून ओळखले जातात. धाराशिव जिल्ह्यातील मुरूम येथील असलेल्या बसवराज पाटील यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीत तीन वेळा आमदार म्हणून प्रतिनिधित्व केले आहे. 1999 मध्ये उमरगा विधानसभा मतदारसंघातून ते प्रथमच विधानसभेवर निवडून गेले होते. त्यानंतर 2009 आणि 2014 मध्ये औसा विधानसभा मतदारसंघातूनही त्यांनी विजय मिळवला.

महाराष्ट्र शासनात 1999 ते 2004 या कालावधीत त्यांनी ग्रामविकास मंत्री म्हणून जबाबदारी सांभाळली होती. काँग्रेस पक्षात दीर्घकाळ कार्यरत राहिल्यानंतर त्यांनी 2024 मध्ये भाजपमध्ये प्रवेश केला. मराठवाड्यातील संघटनात्मक ताकद, स्थानिक स्वराज्य संस्थांमधील प्रभाव आणि राजकीय अनुभवामुळे त्यांना भाजपमधील महत्त्वाचे नेतृत्व मानले जाते.

माजी केंद्रीय गृहमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शिवराज पाटील चाकूरकर यांचे ते निकटवर्तीय मानले जात होते. काँग्रेसमधील संघटनात्मक कामकाजात त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली असून प्रदेश काँग्रेसच्या कार्याध्यक्षपदाची जबाबदारीही त्यांनी सांभाळली होती. मराठवाड्यातील काँग्रेसच्या राजकारणात शिवराज पाटील चाकूरकर यांच्या नेतृत्वाखाली काम करत त्यांनी स्वतंत्र राजकीय ओळख निर्माण केली.

सध्या ते लातूर ग्रामीण भाजप जिल्हाध्यक्ष म्हणून कार्यरत असून विधान परिषद निवडणुकीसाठी त्यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर मराठवाड्याच्या राजकीय वर्तुळात चर्चांना वेग आला आहे. भाजपने अनुभवी नेतृत्वावर विश्वास दाखवत त्यांना मैदानात उतरवल्याने ही निवडणूक प्रतिष्ठेची ठरणार असल्याचे बोलले जात आहे.

कोण आहेत महेश देशमुख?

महेश देशमुख हे काँग्रेसचे युवा नेते असून सध्या ते धाराशिव जिल्हा परिषद सदस्य म्हणून कार्यरत असून युवक काँग्रेसमधून त्यांनी आपली स्वतंत्र राजकीय ओळख निर्माण केली आहे. धाराशिव जिल्हा परिषद आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमधील कामाच्या माध्यमातून त्यांनी ग्रामीण भागात मजबूत संपर्क निर्माण केला आहे. युवक काँग्रेसच्या विविध पदांवर काम करताना त्यांनी संघटनात्मक नेतृत्व सिद्ध केले आहे.