अहिल्याबाईंच्या जयंतीत राडा, पडळकर आणि रोहित पवारांचे कार्यकर्ते तुटून पडले

Rohit Pawar And Gopichand Padalkar : राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीनिमित्त गोपिचंद पडळकर यांची गाणी लावण्यात आली होती. अशातच आमदार रोहित पवार यांच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठा राडा झाला होता. या प्रकरणी रोहित पवार यांनी सोशल मीडियावर ट्विट करत संताप व्यक्त केला आहे.

Rohit Pawar And Gopichand Padalkar

Rohit Pawar And Gopichand Padalkar

मुंबई तक

31 May 2026 (अपडेटेड: 31 May 2026, 06:55 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

रोहित पवार आणि गोपीचंद पडळकर

point

रोहित पवार यांचं ट्विट जसंच्या तसं

point

राजमाता अहिल्याबाई होळकर जयंती

Rohit Pawar And Gopichand Padalkar : राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या 301 व्या जयंतीनिमित्त देशभरात उत्साहाचं वातावरण आहे. मात्र, जतचे भाजप आमदार गोपिचंद पडळकर यांच्या कार्यकर्त्यांमध्ये आणि शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांच्या कार्यकर्त्यांमध्ये धरपकड झाली. दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठा राडा झाला. हे प्रकरण अहिल्यानगरच्या चौंडी येथील आहे. गोपिचंद पडळकर नाचतानाचा व्हिडिओ देखील व्हायरल होताना दिसत आहे. यावरून आमदार रोहित पवार यांनी ट्विट करत संताप व्यक्त केला. 

हे वाचलं का?

हे ही वाचा : अहिल्यानगरात बसची एर्टीगाला धडक, अपघातात कारचा भुगा; 15 जण...

नेमकं काय घडलं? 

अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीनिमित्त चौंडी येथे जयंती उत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं. अहिल्याबाई यांच्या जयंतीत गोपीचंद पडळकर यांचं गाणं लावण्यात आलं होतं, अशातच अहिल्याबाई होळकर यांना अभिवादन करण्यासाठी रोहित पवार हे देखील तेथे आले होते. यावेळी कार्यकर्त्यांमध्ये जोरदार बाचाबाची झाल्याचं समोर आलं. त्याचबरोबर काही ठिकाणी तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. 

परिस्थितीत बघता दोन्ही गटाचे कार्यकर्ते एकेमेकांसमोर भिडल्याने तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. दोन्ही गटातील कार्यकर्त्यांमध्ये धक्काबुक्की झाली होती. या सगळ्याप्रकारानंतर रोहित पवार यांनी संताप व्यक्त करत आपली प्रतिक्रिया दिली. 

रोहित पवार यांचं ट्विट जसंच्या तसं

''लोककल्याणकारी राज्याचा आदर्श घालून देणाऱ्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त चोंडी येथील त्यांच्या जन्मस्थळी रात्री अभिवादन करण्यासाठी गेलो असता विरोधकांचं अत्यंत किळसवाणं आणि शरम वाटावी असं वर्तन बघायला मिळालं. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा आदर्श घेण्याऐवजी त्यांच्या जयंतीच्या नावाने स्वतःचाच उदोउदो करुन घेण्याची हौस भागवली जात होती. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या विराट कर्तृत्त्वाचे, उत्तुंग नेतृत्त्वाचे, समाजाप्रतीच्या निष्ठेचे गोडवे गाण्याऐवजी ‘रामभाऊ तुमचं काम एक नंबर’ अशी स्वतःचीच आरती गाणारी ओंगाळवाणी गाणी ऐकावी लागत होती… हे ऐकून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती आहे की विरोधकांच्या वाढदिवसाची पार्टी आहे, असा प्रश्न पडला. तिथंच मिरवणुकीसारखं वातावरण दिसलं.. वाटलं पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेची मिरवणूक असावी, पण ती मिरवणूक नव्हती तर दुसऱ्या एका आमदाराला काहीजण खांद्यावर घेऊन आत्मस्तुती करणाऱ्या ‘नाद करायचा नाय’ गाण्यावर नाचत होते. विशेष म्हणजे हे सगळं पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या स्मारकाजवळ घडत होतं आणि यावरही कळस म्हणजे या स्थळाचं पावित्र भंग करणारी शिविगाळही इथं ऐकायला मिळाली.. हे सगळं संतापजनक आहे. किमान कुठं कसं वागायचं याचं तरी भान लोकप्रतिनिधींनी ठेवलं पाहिजे..!''

दरम्यान या प्रकरावर गोपीचंद पडळकर यांनी देखील एका वृत्तवाहिनीला प्रतिक्रिया दिली. पडळकर म्हणाले, 'अहिल्यादेवींना अभिवादन करण्यासाठी स्वच्छ मनाने यावं लागतं. दंगल घडावी असा दृष्ट हेतू ठेवून जर कोणी येत असेल तर योग्य नाही. तुम्ही अभिवादन करुन गेले नंतर फायर शोच्यावेळेत पुन्हा पाच पन्नास लोकं घेऊन येणं कितपत योग्य आहे. तुम्ही स्टंटबाजी कराल आणि आम्ही बघत बसू असं नाही होणार. असले उद्योग त्यांनी करु नये.'