रोहिदास हातागळे /बीड (दि.10) : परळी वैद्यनाथ नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष दिपक देशमुख व त्यांच्या पत्नी संध्याताई दिपक देशमुख यांनी आज (दि.10 नोव्हेंबर) मुंबई येथे राष्ट्रवादी काँग्रेस - शरदचंद्र पवार पक्षात जाहीर प्रवेश केला. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम संपन्न झाला. देशमुख दाम्पत्याच्या या प्रवेशामुळे बीड जिल्ह्याच्या राजकारणात, विशेषतः परळीत राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाची ताकद वाढणार असल्याचे बोलले जात आहे.
ADVERTISEMENT
पक्षाच्या बड्या नेत्यांची उपस्थिती
या महत्त्वपूर्ण पक्षप्रवेशाच्या प्रसंगी आमदार जितेंद्र आव्हाड साहेब आणि पक्षाचे नवनिर्वाचित प्रदेश सरचिटणीस राजाभाऊ फड हे उपस्थित होते. दिपक देशमुख व संध्या देशमुख यांचे पक्षात स्वागत केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. माजी नगराध्यक्ष दिपक देशमुख आणि संध्याताई देशमुख यांच्या प्रवेशामुळे पक्षाला परळी वैद्यनाथ नगरपालिकेच्या आणि परिसराच्या राजकारणात मोठा फायदा होण्याची शक्यता आहे.
शरद पवारांची प्रतिक्रिया
शरद पवार यावेळी बोलताना म्हणाले, "दिपक देशमुख आणि संध्याताई देशमुख यांच्यासारख्या अनुभवी आणि जनसंपर्क असलेल्या नेत्यांच्या प्रवेशामुळे पक्षाला नक्कीच बळकटी मिळेल. आगामी काळात ते पक्ष वाढीसाठी महत्त्वपूर्ण योगदान देतील," असा विश्वास व्यक्त करतो.
आमदार जितेंद्र आव्हाड साहेब आणि राजाभाऊ फड यांनीही देशमुख दाम्पत्याच्या प्रवेशाचे स्वागत केले आणि पक्ष संघटना बळकट करण्यासाठी त्यांच्या अनुभवाचा उपयोग होईल, असे मत व्यक्त केले. दिपक देशमुख आणि सौ. संध्याताई दिपक देशमुख यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस - शरदचंद्र पवार पक्षातील प्रवेशाने परळी वैद्यनाथच्या आगामी राजकारणाला नवी दिशा मिळण्याची शक्यता आहे.
दरम्यान, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून आमदार धनंजय मुंडे यांच्या मतदारसंघातील राजाभाऊ फड यांना पक्षाच्या सरचिटणीस पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजाभाऊ फड यांना बळ देण्यासाठी ही जबाबदारी दिल्याचे बोलले जात आहे दिले.
इतर महत्त्वाच्या बातम्या
ADVERTISEMENT











