बाळासाहेब असते तर तुम्हाला उलटं टाकून खालून मिरचीची धुरी दिली असती, एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर घणाघात

Eknath Shinde on Uddhav Thackeray : बाळासाहेब असते तर तुम्हाला उलटं टाकून खालून मिरचीची धुरी दिली असती, एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर घणाघात

Mumbai Tak

मुंबई तक

02 Oct 2025 (अपडेटेड: 02 Oct 2025, 09:16 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

बाळासाहेब असते तर तुम्हाला उलटं टाकून खालून मिरचीची धुरी दिली असती

point

एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर घणाघात

Eknath Shinde on Uddhav Thackeray, Mumbai : "सावरकरांवर राहुल गांधी मुद्दाम टीका करतात. त्यांच्या मांडीला मांडून लावून बसतात आणि आम्ही हिंदूत्ववादी आहोत, असं सांगतात. हे तुमचं हिंदूत्व आहे? हे बेगडी हिंदूत्व आहे. बाळासाहेब असते तर तुम्हाला उलटं टाकून खालून मिरचीची धुरी दिली असती", असं म्हणत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर घणाघाती टीका केली. ते गोरेगाव येथील शिंदेसेनेच्या मेळाव्यातून बोलत होते. 

हे वाचलं का?

पाकिस्तानला धडा शिकवण्याचं काम मोदींनी केल - एकनाथ शिंदे 

एकनाथ शिंदे म्हणाले, पहलगाममध्ये आतंकवादी पाकड्यांनी आपल्या बहिणींचं कुंकू पुसण्याचं पाप केलं. त्याला धडा शिकवण्याचं काम मोदींनी केलं. गोळ्यांचा बदला गोळ्यांनी घेतला. तुमचे आमचे शेकडो लोकं गेले. मुंबईत बॉम्बस्फोट झाले. मोदींनी पाकिस्तानला धडा शिकवला. ऑपरेशन सिंदूर अजूनही सुरु आहे, हे सांगणारे मोदी होते. याचा अभिमान आहे. पाकिस्तान म्हणतो आमच्याशी नडू नका. आम्ही ताकद दाखवणार..अरे कसली ताकद दाखवणार? ऑपरेशन सिंदूर नंतर विदेशात शिष्टमंडळ पाठवली. त्यांचं नेतृत्व करण्याचं काम श्रीकांत शिंदेंना दिलं. तामिळनाडूत दुर्घटना घडली तिथेही श्रीकांत गेला. हा शिवसेनेचा अभिमान आहे, स्वाभिमान आहे. देशाची सेवा करण्याची संधी मिळत आहे. 

हेही वाचा : सोनम वांगचूक देशद्रोही, मग पाकिस्तानात जाऊन केक खाणारे मोदी कोण? उद्धव ठाकरेंचा सवाल

राहुल गांधी पाकिस्तानी भाषा बोलू लागले, त्यांच्या बाजूला तुम्ही बसू लागले

पुढे बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले, काही लोकं बोलले यांचा मेळावा सुरतला करायला पाहिजे. अमित शाहांना बोलवा, याला बोलवा. सुरत भारतातच आहे. तुमचा मेळावा तुम्ही पाकिस्तानमध्ये करायला हवा होता. पाकमध्ये तुमच्या हेडलाईन झाल्या असता. यांनीच आपल्या लष्करावर संशय घेतला. किती विमानं पडली ? तेच पाकिस्तानने सांगितलं. तुमच्या देशातले लोक संशय व्यक्त करत आहेत. या हेडलाईन तुम्हीच त्यांना दिल्या. त्यातच तुम्हाला धन्यता मिळते. राहुल गांधी पाकिस्तानी भाषा बोलू लागले. त्यांच्या बाजूला तुम्ही बसू लागले. हे देशप्रेम आहे का? हे पाकिस्तानी प्रेम आहे. तुम्हाला आमच्यावर टीका करण्याचा नैतिक अधिकार नाही. 

हेही वाचा : तीस वर्ष मुंबई महापालिका ओरबाडली? सगळी माया लंडनला गेली का? एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना सवाल

    follow whatsapp