Nagar Parishad Election Result LIVE: कोल्हापूर जिल्ह्यातील नगरपरिषदांचे संपूर्ण निकाल

Kolhapur District Nagar Parishad Election Result: कोल्हापूर जिल्ह्यातील महत्त्वाच्या असेलल्या एका नगरपरिषदेचा संपूर्ण निकाल इथे पाहा.

election result live complete results of nagar parishad  in kolhapur district kagal nagar parishad election 2025 result

कोल्हापूर जिल्हा नगरपरिषद निवडणूक निकाल

मुंबई तक

19 Nov 2025 (अपडेटेड: 21 Dec 2025, 10:49 AM)

follow google news

कोल्हापूर: कोल्हापूर जिल्ह्यात कागल या एका महत्त्वाच्या नगर परिषदेचा निकाल हा 3 डिसेंबर 2025 रोजी जाहीर होत आहे. जाणून घ्या या निवडणुकांचा नेमका आणि संपूर्ण निकाल.

हे वाचलं का?

कोल्हापूर जिल्ह्यातील महत्त्वाच्या नगरपरिषदेचा निकाल

  • कुरूंदवाड - पहिली फेरी मनिषा डांगे (राजर्षी शाहू विकास आघाडी) - 3882
  • योगिनी पाटील ( काँग्रेस) - 2647
  • कागल नगरपरिषद - राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी - अजित पवार गट - शाहू आघाडीच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ.सविता प्रताप ऊर्फ भैय्या माने १३०० मतांनी आघाडीवर
  • गडहिंग्लज नगरपरिषद - राष्ट्रवादीच्या नगराध्यक्ष पदाचे उमेदवार पहिल्या फेरीत 1765 मतांनी आघाडीवर
  • शिरोळ नगरपालिका निवडणूक 2025 - पहिल्या फेरीत शिवशाहू यादव पॅनेलच्या नगराध्यक्षा पदाच्या उमेदवार योगिता सतीश कांबळे 2160 मतांनी आघाडीवर

-------------

1. कागल

कागल नगर परिषदेच्या निकालाचे अपडेट:

  • कागल नगरपरिषद - राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी - अजित पवार गट - शाहू आघाडीच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ.सविता प्रताप ऊर्फ भैय्या माने १३०० मतांनी आघाडीवर

 

-------------

कागल नगर परिषदेच्या निवडणुकीचा निकाल 21 डिसेंबर 2025 रोजी जाहीर होईल

-------

कागल नगर परिषदेसाठी एकूण 81 टक्के मतदान झालं

  • कागल नगरपरिषद निवडणूक: संत रोहिदास विद्या मंदिर केंद्रावर तृतीयपंथी आणि पोलिसात प्रचंड बाचाबाची

तृतीयपंथी उमेदवार जावेद पिंजारी यांच्यासह सहकारी तृतीयपंथी उमेदवार आणि पोलिसात प्रचंड बाचाबाची
वायर खराब झाल्याचे कारण देत बॅलेट युनिट रातोरात बदललं शिवाय याबाबत उमेदवारांनाही काही कल्पना न दिल्याने तृतीयपंथी उमेदवारांचा आक्षेप
मंत्री हसन मुश्रीफ यांनी देखील तृतीयपंथी यांच्याशी संवाद साधला.
पोलीस बायस पद्धतीने वागत असल्याचा तृतीयपंथी शिवानी गजबर यांचा आरोप 

  • कागल नगर परिषद निवडणूक: मतदानाला सुरुवात

----

कागल नगरपरिषद नगराध्यक्ष पदासाठी 5 तर नगरसेवक सदस्य पदासाठी 64 जणांचे अर्ज वैध

कोल्हापूर जिल्ह्यात 10 नगररिषद आणि 3 नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदासाठी 50 उमेदवार तर सदस्य नगरसेवक पदांसाठी 725 उमेदवार रिंगणात आहेत. नगराध्यक्षपदासाठी काही ठिकाणी दुरंगी, काही ठिकाणी तिरंगी तर काठी ठिकाणी चौरंगी लढती होणार आहेत.

कोल्हापूर जिल्ह्यातील 10 नगरपरिषद आणि 3 नगरपरिषदेसाठी 2 डिसेंबर रोजी मतदान होत आहे. 18 नोव्हेंबर रोजी उमेदवारी अर्जाची छाननी होऊन नगराध्यक्षपदासाठी 92 आणि नगरसेवक पदासाठी 1067 उमेदवारांचे अर्ज वैध ठरले होते. त्यानंतर दोन दिवसात अर्ज माघारीची प्रक्रिया पूर्ण झाली. पन्हाळा नगरपरिषदेत 6 जागा बिनविरोध झाल्या आहेत. मलकापूर आणि कागल नगरपरिषेदत प्रत्येकी एक जागा बिनविरोध झाली आहे. तर अर्ज माघारीच्या अखेरच्या दिवसापर्यंत 242 उमेदवारांनी माघार घेतली यानंतर नगराध्यक्षपदासाठी 50 आणि नगरसेवक पदांसाठी 725 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत.