Nagar Parishad Election Result LIVE: परभणी जिल्ह्यातील नगरपरिषदांचे संपूर्ण निकाल

Parbhani District Nagar Parishad Election Result: परभणी जिल्ह्यातील महत्त्वाच्या असेलल्या एका नगरपरिषदेचा संपूर्ण निकाल इथे पाहा.

election result live complete results of nagar parishad  in parbhani district jintur nagar parishad election 2025 result

परभणी जिल्हा नगरपरिषद निवडणूक निकाल

मुंबई तक

19 Nov 2025 (अपडेटेड: 21 Dec 2025, 01:18 PM)

follow google news

परभणी: परभणी जिल्ह्यातील जिंतूर या एका महत्त्वाच्या नगर परिषदेचा निकाल हा 3 डिसेंबर 2025 रोजी जाहीर होत आहे. जाणून घ्या या निवडणुकांचा नेमका आणि संपूर्ण निकाल.

हे वाचलं का?

परभणी जिल्ह्यातील महत्त्वाच्या नगरपरिषदांचा निकाल

  • पूर्णा - प्रभाग क्रमांक 1 च्या मतमोजणीनंतर नगराध्यक्षपदासाठी राष्ट्रीय काँग्रेस आघाडीवर, प्रभाग एक मधील दोन्ही जागेवर काँग्रेसचा विजय
    नगराध्यक्ष पदाचे उमेदवार जुनेद खान 165 मतांनी आघाडीवर
  • पूर्णा नगर परिषदेत काँग्रेसच्या उमेदवार शेख हसीना आघडीवर
  • सोनपेठ- पहिल्या फेरी अंती परिवर्तन विकास आघाडीचे उमेदवार परमेश्वर कदम 300 मतांनी आघाडीवर
  • मानवतमध्ये राणी लाड आघाडीवर
  • जिंतूर नगरपालिका- नगराध्यक्ष पदाचे भाजप उमेदवार प्रताप देशमुख 300 मतांनी आघाडीवर

 

-------------

1. जिंतूर

जिंतूर नगर परिषदेच्या निकालाचे अपडेट:

जिंतूर नगर परिषदेच्या निवडणुकीचा निकाल 21 डिसेंबर 2025 रोजी जाहीर होईल

--------

जिंतूर नगर परिषदेसाठी एकूण 72 टक्के मतदान झालं

  • बोगस मतदानच्या संशयावरून ज्येष्ठ नागरिकास मारहाण

नगरपालिका निवडणुकीदरम्यान जिंतूर येथे बोगस मतदानच्या संशयावरून ज्येष्ठ नागरिकास मारहाण झाल्याचा प्रकार घडला असून या प्रकारानंतर परिसरात गोंधळ निर्माण झाला आहे. शहरातील प्रभाग क्रमांक 12 मध्ये असलेल्या जिल्हा परिषदेच्या शाळेवर हे मतदान केंद्र आहे. त्यावेळी बोगस मतदान केल्याच्या संशयावरून मतदान केंद्राच्या समोरच हा राडा झाला यामध्ये एका ज्येष्ठ नागरिकाला मारहाण करण्यात आली आहे

  • जिंतूर नगर परिषद निवडणूक: मतदानाला सुरुवात
     

-------

जिंतूरात नगराध्यक्षपदासाठी भाजप विरुध्द राष्ट्रवादीत थेट, तुल्यबळ लढत होणार : महायुतीतील या दोन मित्र पक्षाच्या लढाईत शिंदे गटही रिंगणात:

जिंतूर, नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदाच्या निवडणूकीत भारतीय जनता पार्टीने माजी नगराध्यक्ष प्रताप देशमुख तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून साबिया बेगम कपील फारुखी यांच्यात थेट लढतीचे चित्र स्पष्ट झाले असून महायुतीतील या दोन मित्रपक्षाच्या तुल्यबळ लढाईत शिवसेना शिंदे गटाने राजेश वट्टमवार यांचा उमेदवारी अर्ज कायम राखून या लढतीचे लक्ष वेधून घेतले आहे.

दरम्यान, या नगरपालिकेत नगराध्यक्षपदाकरीता एकूण 6  व सदस्य पदाकरिता 78 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात कायम राहिले आहेत.

या नगरपालिकेत महायुतीतील या दोन्ही पक्षात एकमेकांविरोधात जोरदार लढत होणार हे स्पष्ट होते. कारण, भाजपाचे ज्येष्ठ नेते माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर व जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांचे व राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातील माजी आमदार विजय भांबळे यांच्यातील विळ्या-भोपळ्याचे नाते सर्वश्रुत होते. 

हे दोघे विधानसभेनंतर पुन्हा या सार्वत्रिक निवडणूकीच्या निमित्ताने एकमेकांसमोर आव्हान उभे करणार व हे दोघे सर्वार्थाने या लढतीत प्रतिष्ठा पणास लावणार हे निश्चित होते. त्याप्रमाणे त्या दोघांनी या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कंबर कसली. भक्कम अशी मोर्चेबांधणी केली.

या उलट महाविकास आघाडीतील काँग्रेस असो, शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाद्वारे या सत्तारुढ युतीतील घटक पक्षांविरोधात दंड थोपाटण्याबाबत काडीच्याही हालचाली केल्या नाहीत.  त्याचे कारणही स्पष्ट आहे.