Nagar Parishad Election Result LIVE: सांगली जिल्ह्यातील नगरपरिषदांचे संपूर्ण निकाल

Sangli District Nagar Parishad Election Result: सांगली जिल्ह्यातील महत्त्वाच्या असेलल्या तीन नगरपरिषदांचे संपूर्ण निकाल इथे पाहा.

election result live complete results of nagar parishad  in sangli district islampur ishwarpur tasgaon karad nagar parishad election 2025 result

सांगली जिल्हा नगरपरिषद निवडणूक निकाल

मुंबई तक

17 Nov 2025 (अपडेटेड: 20 Dec 2025, 09:12 PM)

follow google news

सांगली: सांगली जिल्ह्यात इस्लामपूर (ईश्वरपूर), तासगाव आणि कराड या तीन महत्त्वाच्या नगर परिषदांचा निकाल हा 3 डिसेंबर 2025 रोजी जाहीर होत आहे. जाणून घ्या या निवडणुकांचा नेमका आणि संपूर्ण निकाल.

हे वाचलं का?

सांगली जिल्ह्यातील महत्त्वांच्या नगरपरिषदांचे निकाल

1. इस्लामपूर (ईश्वरपूर)

इस्लामपूर (ईश्वरपूर) नगर परिषदेच्या निकालाचे अपडेट:

इस्लामपूर (ईश्वरपूर) नगर परिषदेच्या निवडणुकीचा निकाल 21 डिसेंबर 2025 रोजी जाहीर होईल

---

इस्लामपूर (ईश्वरपूर) नगर परिषदेसाठी एकूण 74 टक्के मतदान झालं

  • सांगली जिल्ह्यातील ईश्वरपूरमध्ये सर्वांचं लक्ष

संपूर्ण राज्यातील ईश्वरपूर नगरपालिका सर्वाधिक लक्षवेधी ठरली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांच्या होम ग्राऊंड वरील ही निवडणूक असल्याने जास्तच महत्वाची ठरली आहे. 

गेल्यावेळी ही नगरपालिका भाजपाने अगदी थोडक्यात त्यांच्याकडून हिसकावून घेतली होती. त्यामुळे जयंत पाटील यावेळी अत्यंत सावधपणे पण तरीही आक्रमकपणे डाव टाकताना दिसत आहेत. त्यांच्या समोर असणारे भाजपा आणि त्यांचे मित्र पक्ष यांनी अगदी मुख्यमंत्र्यांनाही ईश्वरपूरमध्ये आणून अनेक आश्वासने त्यांच्याकडून जनतेला देत मतदारांना आकर्षित करून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. आता शेवटी मतदारराजा कोणाच्या पारड्यात सत्तेचे माप टाकतो ते पाहणे मोठे रंजक ठरणार आहे. 

  • इस्लामपूर (ईश्वरपूर) नगर परिषद निवडणूक: मतदानाला सुरुवात

---

नगराध्यक्ष पदाचे उमेदवार

  1. विश्वनाथ डांगे - भाजपा
  2. आनंदराव मलगुंडे - राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार)

2. तासगाव

तासगाव नगर परिषदेच्या निकालाचे अपडेट:

तासगाव नगर परिषदेच्या निवडणुकीचा निकाल 21 डिसेंबर 2025 रोजी जाहीर होईल

------

तासगाव नगर परिषदेसाठी एकूण 70 टक्के मतदान झालं

  • सांगलीच्या तासगावात मतदानाला गालबोट,  बोगस मतदानाचा प्रकार घडल्याचा प्रकार रोहित पाटलांचा आरोप, दोन गटात जोरदार बाचाबाची आणि हाणामारी

सांगली जिल्ह्यातील तासगाव नगरपालिकेच्या मतदानाला आज गालबोट लागले. तासगाव शहरातील सांगली नाका परिसरातील प्रभाग क्रमांक चारच्या बूथवर बोगस मतदान सुरू असल्याची चर्चा शहरात वाऱ्यासारखी पसरली होती. त्यातून राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे कार्यकर्ते संतप्त झाले. त्यांनी त्याठिकाणी येऊन विचारणा केली असता जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठ्या उगारल्या. तथापि यामुळे हे कार्यकर्ते जास्तच संतप्त झाले. 

थोड्याच वेळात तेथे आमदार रोहित आर आर पाटील दाखल झाले. कार्यकर्त्यांनी त्यांच्यासमोर आपल्या संतप्त भावना मांडल्या. आमदार रोहित पाटील यांनी पोलिसांना मतदान प्रक्रिया सुरळीत करण्यास सांगितले.  हस्तक्षेप करत पोलिसांनी मतदान पुन्हा सुरू केले आहे. 

दरम्यान, समोरचा गट कायमच अशा प्रकारचे वर्तन करत असून तासगावची जनता परिवर्तन घडवेल. बोगस मतदान थांबवण्यासाठी आम्ही सगळे प्रयत्न करत आहोत. पेड, हातनूर, मांजर्डे, हरिपूर, सांगली, सांगलीवाडी येथून लोक आणून मतदान करत आहेत. ते थांबवण्यासाठी प्रयत्न करत असताना हा प्रकार घडला असल्याची प्रतिक्रिया आमदार रोहित आर आर पाटील यांनी मुंबई तकशी बोलताना दिली आहे. 

  • तासगाव नगर परिषद निवडणूक: मतदानाला सुरुवात

---

    follow whatsapp