Nagar Parishad Election Result LIVE: सातारा जिल्ह्यातील नगरपरिषदांचे संपूर्ण निकाल

Satara District Nagar Parishad Election Result: सातारा जिल्ह्यातील महत्त्वाच्या असेलल्या 2 नगरपरिषदांचे संपूर्ण निकाल इथे पाहा.

election result live complete results of nagar parishad  in satara district phaltan satara nagar parishad election 2025 result

सातारा जिल्हा नगरपरिषद निवडणूक निकाल

मुंबई तक

17 Nov 2025 (अपडेटेड: 21 Dec 2025, 01:25 PM)

follow google news

सातारा: सातारा जिल्ह्यात फलटण आणि सातारा या 2 महत्त्वाच्या नगर परिषदांचा निकाल हा 3 डिसेंबर 2025 रोजी जाहीर होत आहे. जाणून घ्या या निवडणुकांचा नेमका आणि संपूर्ण निकाल.

हे वाचलं का?

सातारा जिल्ह्यातील महत्त्वांच्या नगरपरिषदांचे निकाल

  • मलकापूर नगरपरिषद नगराध्यक्ष पदाचे भाजप उमेदवार तेजस सोनवले 2500 मताने आघाडीवर
  • फलटण - अनिकेतराजे निंबाळकर पिछाडीवर, भाजपचे समशेर 30 मतांनी आघाडीवर
  • म्हसवड नगरपरिषदमध्ये प्रभाग क्रमांक दोनमध्ये भाजपचे दोन्ही उमेदवार विजयी घोषित
  • सातारा- अपक्षाने खाते खोललं, पहिलाच निकाल धक्कादायक
  • प्रभाग क्रमांक 3 - मयूर कांबळे आणि जयश्री जाधव विजयी
  • साताऱ्यातला दोन्ही राजेंना धक्का - भारतीय जनता पार्टीला दणका
  • वाईमध्ये नगराध्यक्ष पदाचे उमेदवार नितीन कदम अजित पवार गट पुढे
     

--------------------

1. फलटण

फलटण नगर परिषदेच्या निकालाचे अपडेट:

  • फलटण - अनिकेतराजे निंबाळकर पिछाडीवर, भाजपचे समशेर 30 मतांनी आघाडीवर

-------------

फलटण नगर परिषदेसाठी 20 डिसेंबर 2025 रोजी मतदान होईल.

----

2. सातारा

सातारा नगर परिषदेच्या निकालाचे अपडेट:

  • सातारा- अपक्षाने खाते खोललं, पहिलाच निकाल धक्कादायक
  • प्रभाग क्रमांक 3 - मयूर कांबळे आणि जयश्री जाधव विजयी
  • साताऱ्यातला दोन्ही राजेंना धक्का - भारतीय जनता पार्टीला दणका

----------------

सातारा नगर परिषदेच्या निवडणुकीचा निकाल 21 डिसेंबर 2025 रोजी जाहीर होईल

------

सातारा नगर परिषदेसाठी एकूण 59 टक्के मतदान झालं

  • मतमोजणी पुढे ढकलल्याने अभिजीत बिचुकले संतापले

सातारा नगरपालिकेचे अपक्ष उमेदवार बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांनी निवडणूक आयोगाने दिलेल्या 21 तारखेच्या मतमोजणीवर जहाल प्रतिक्रिया व्यक्त केली. 'आज मतदान झाल्यानंतर निकाल हा 20 दिवसानंतर आहे. माझं सगळ्या महाराष्ट्रातल्या नगरपरिषदा, नगरपंचायतीच्या निवडणुकांना प्रत्यक्ष उभा राहिलेल्या सगळ्या अपक्ष पक्षीय उमेदवारांना विनंती आहे की, ज्या ठिकाणी मतपेट्या ठेवल्या जातात त्या ठिकाणी आंथरूण-पांघरूण घेऊन मुक्कामाला जा. भाजप काहीही करू शकतं. असं शरद पवारांनी सांगितलं होतं ते खरं ठरू शकतं. म्हणून ज्या ठिकाणी ईव्हीएम मशीन ठेवले आहेत तिथेच मुक्कामी जा. गडबड होण्याची शक्यता आहे.. मी सेलिब्रेटी म्हणून सांगतोय.'

  • सातारा प्रभाग 5 मध्ये शिवसेना–भाजप संघर्ष, पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन

साताऱ्यातील प्रभाग क्रमांक 5 मध्ये शिवसेना आणि भाजप समर्थकांमध्ये मोठा वाद उफाळून आला आहे. या तणावानंतर शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन सुरू केले आहे.

या घटनेनंतर प्रभाग क्रमांक 5 मध्ये तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले असून पोलिसांनी कडक बंदोबस्त तैनात केला आहे. परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी अतिरिक्त पोलीस दल बोलावण्यात आले आहे.

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अशा प्रकारचा वाद उफाळल्याने प्रशासनही सतर्क.

  • सातारा नगरपरिषदेतील  7.30 ते 9.30 मतदान

एकूण केंद्र - 156
 
स्त्री - 4384
पुरूष - 6624
इतर - 02
एकूण - 11010
टक्केवारी - 7.42

  • विकास कामांकडे बघूनच लोक मतदान करतील: खासदार उदयनराजे भोसले

'जागा मोजक्या होत्या मात्र इच्छुकांची संख्या जास्त होती. त्यामुळे अनेकांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरला आहे. मात्र लोक विकास कामांकडे बघूनच मतदान करतील.' असा विश्वास भाजप खासदार उदयनराजे भोसले यांनी आज मंगळवार (2 डिसेंबर) रोजी सकाळी दहा वाजता व्यक्त केला. साताऱ्यातील आनंद इंग्लिश स्कूल येथे त्यांनी आपला मतदानाचा हक्क बजावल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

  • सातारा नगर परिषद निवडणूक: मतदानाला सुरुवात

---

साताऱ्यात बहुरंगी लढत पाहावयास मिळते 50 जागांसाठी 320 उमेदवारी अर्ज दाखल झाले होते नगराध्यक्ष पदासाठी नऊ तर नगरसेवक पदासाठी 159 उमेदवार रिंगणात उतरले आहेत.

सातारा जिल्ह्यामध्ये आठ आमदार महायुतीचे आहेत दोन खासदार देखील महायुतीचेच आहेत एकूण राज्यांमधील चार मंत्र्यांसह एकमेकाचे कार्यकर्ते परस्परांच्या विरोधात भिडले असल्याचे पहावयास मिळत आहे अशातच चार मंत्र्यांसह खासदार आमदारांचे प्रतिष्ठा पणाला लागली असल्याचे चित्र सध्या सातारा जिल्ह्यामध्ये दिसून येत आहे.

3. कराड

कराड नगर परिषदेच्या निकालाचे अपडेट:

कराड नगर परिषदेच्या निवडणुकीचा निकाल 21 डिसेंबर 2025 रोजी जाहीर होईल

-----

कराड नगर परिषदेसाठी एकूण 70 टक्के मतदान झालं

  • कराड नगरपालिकेसाठी लोकशाही आघाडीचे नेते माजी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी बजावला मतदानाचा हक्क

'लोकशाही आघाडी व यशवंत आघाडीच्या माध्यमातून या निवडणुकीला मी सामोरे जात मतदारांनी सहकार्याची भूमिका घेतली आहे. त्यामुळे निश्चित चांगला निकाल अपेक्षित आहे.' असे मत माजी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी व्यक्त केलं.

  • कराड नगर परिषद निवडणूक: मतदानाला सुरुवात

---

    follow whatsapp