Nagar Parishad Election Result LIVE: सोलापूर जिल्ह्यातील नगरपरिषदांचे संपूर्ण निकाल

Solapur District Nagar Parishad Election Result: सोलापूर जिल्ह्यातील महत्त्वाच्या असेलल्या पाच नगरपरिषदांचे संपूर्ण निकाल इथे पाहा.

election result live complete results of nagar parishad  in solapur district akluj barshi pandharpur mangalwedha sangola nagar parishad election 2025 result

सोलापूर जिल्हा नगरपरिषद निवडणूक निकाल

मुंबई तक

17 Nov 2025 (अपडेटेड: 21 Dec 2025, 01:21 PM)

follow google news

सोलापूर: सोलापूर जिल्ह्यात अकलूज, बार्शी, मंगळवेढा, पंढरपूर आणि सांगोला या 5 महत्त्वाच्या नगर परिषदांचा निकाल हा 3 डिसेंबर 2025 रोजी जाहीर होत आहे. जाणून घ्या या निवडणुकांचा नेमका आणि संपूर्ण निकाल.

हे वाचलं का?

सोलापूर जिल्ह्यातील महत्त्वाच्या नगरपरिषदांचे निकाल

  • करमाळा - शहर विकास आघाडीच्या मोहिनी सावंत 800 मतांनी आघाडीवर
  • कुर्डूवाडी - शिवसेना UBT च्या जयश्री भिसे आघाडीवर
  • अक्कलकोटमध्ये - भाजपचे मिलन कल्याण शेट्टी 3250 मतांनी आघाडीवर
  • सोलापूर -  अकलूज नगर परिषदेच्या शरद पवार गटाच्या राष्ट्रवादीचे आणि मोहिते पाटील गटाचे उमेदवार रेशमा आडगळे आघाडीवर
  • पंढरपूर - प्रभाग क्रमांक एक मधून बीजेपीचे लखन चौगुले विजय तर प्रज्ञा भोसले तीर्थक्षेत्र विकास आघाडी मधून विजयी
  • पंढरपूर - प्रभाग क्रमांक दोन मधून कळसे चित्रा आघाडीवर कळसे आणि प्रणिता घाडगे विजयी
  • सांगोला - शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे माजी आमदार शहाजी बापू पाटील यांचे उमेदवार आंनदा माने आघाडीवर

-----------------

1. अकलूज

अकलूज नगर परिषदेच्या निकालाचे अपडेट:

अकलूज नगर परिषदेच्या निवडणुकीचा निकाल 21 डिसेंबर 2025 रोजी जाहीर होईल

-------

  • अकलूज नगर परिषदेच्या शरद पवार गटाच्या राष्ट्रवादीचे आणि मोहिते पाटील गटाचे उमेदवार रेशमा आडगळे आघाडीवर
  • अकलूज नगर परिषद निवडणूक: मतदानाला सुरुवात

----

अकलूज नगर परिषदेसाठी एकूण 69 टक्के मतदान झालं

  • एकूण जागा 26 ( प्रभाग 13)
  • भाजप स्वतंत्र - 26 जागा
  • राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) - 26 जागा
  • राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) - 26 जागा

नगराध्यक्ष पदाचे उमेदवार 

  1. पूजा कोतमिरे - भाजप 
  2. देवयानी रास्ते - राष्ट्रवादी काँग्रेस(अजित पवार)
  3. रेशमा अडगळे - राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार)   

अकलूजमध्ये राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील तर भाजपकडून माजी आमदार राम सातपुते यांची प्रतिष्ठा इथे पणाला लागली आहे. तर नुकताच अजित पवार गटात प्रवेश केलेल्या पद्मजा देवी मोहिते-पाटील यांच्या अस्तित्वाची ही लढाई आहे.

2. बार्शी

बार्शी नगर परिषदेच्या निकालाचे अपडेट:

बार्शी नगर परिषदेच्या निवडणुकीचा निकाल 21 डिसेंबर 2025 रोजी जाहीर होईल

-------

बार्शी नगर परिषदेसाठी एकूण 63 टक्के मतदान झालं

  • बार्शी नगर परिषद निवडणुकीसाठी सकाळी 7.30 ते 3.30 वाजेपर्यंत मतदान केंद्रावर झालेलं मतदान

पुरुष- २५७९०
स्त्री- २५५२९
इतर- ३
एकूण- ५१३२२
एकूण टक्केवारी- ४७.०८

  • बार्शी नगर परिषद निवडणुकीसाठी सकाळी 7.30 ते 1.30 वाजेपर्यंत मतदान केंद्रावर झालेलं मतदान

पुरुष- १८६१२
स्त्री- १७५९१
इतर- १
एकूण- ३६२०४
एकूण टक्केवारी- ३३.२१

  • बार्शी नगर परिषद निवडणुकीसाठी सकाळी 7.30 ते 11.30 वाजेपर्यंत मतदान केंद्रावर झालेलं मतदान

पुरुष- ११५३६
स्त्री- ९८०७
इतर 0
एकूण- २१३४३
एकूण टक्केवारी- १९.५८

  • बार्शी नगर परिषद निवडणूक: मतदानाला सुरुवात

----

  • एकूण जागा - 42
  • भाजप - 36 जागा
  • शिवसेना UBT - 42 जागा
  • शिवसेना (शिंदे गट) - 6 जागा

नगराध्यक्ष पदाचे उमेदवार

  1. निर्मला विश्वास बारबोले - शिवसेना UBT   
  2. तेजस्विनी प्रशांत कथले - भाजप
  3. शेख जाकीराबी इकबाल - काँग्रेस
  4. पठाण खाजाबी जुम्माखान - AIMIM 
  5. संजीवनी सतिश बारंगुळे - प्रहार संघटना 
  6. सुप्रिया शेखर गुंड-पाटील - अपक्ष


शिवसेना (UBT)आमदार दिलीप सोपल यांच्या नेतृत्वाखाली नगराध्यक्ष सहित सर्व 42 नगरसेवक हे मशाल चिन्हावर निवडणूक लढवणार आहेत. त्यांनी कोणत्याही मित्र पक्षाला एकही जागा दिलेली नाही. दुसरीकडे माजी आमदार राजेंद्र राऊत यांनी भाजपाच्या चिन्हावर 36 नगरसेवक उभे केले आहेत आणि नगराध्यक्ष पदाला भाजपाचा उमेदवार दिला आहे. तर त्यांच्या मित्र पक्ष शिंदे गटाच्या शिवसेनेला त्यांनी सहा जागा दिल्या आहेत आणि बार्शी मधील अजित पवार आणि शरद पवार गट यांनी सोपल गटाला पाठिंबा दिलेला आहे. त्यांनी एकही उमेदवार दिलेले नाही

3. मंगळवेढा

मंगळवेढा नगर परिषदेच्या निकालाचे अपडेट:

मंगळवेढा नगर परिषदेसाठी 20 डिसेंबर 2025 रोजी मतदान होईल.

----

  • एकूण जागा 20 ( प्रभाग 10)
  • भाजप स्वतंत्र - 10 जागा
  • समविचारी ( तीर्थक्षेत्र) - 10 जागा

नगराध्यक्ष पदाचे उमेदवार

  1. सुप्रिया जगताप - भाजप
  2. सुनंदा आवताडे - समविचारी तीर्थक्षेत्र  

विद्यमान भाजप आमदार समाधान आवताडे यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. तर विरोधी गटाकडून त्यांचे चुलते आणि डिसीसी बँकेचे माजी चेअरमन बबनराव अवताडे यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

4. पंढरपूर

पंढरपूर नगर परिषदेच्या निकालाचे अपडेट:

  • पंढरपूर - प्रभाग क्रमांक एक मधून बीजेपीचे लखन चौगुले विजय तर प्रज्ञा भोसले तीर्थक्षेत्र विकास आघाडी मधून विजयी
  • पंढरपूर - प्रभाग क्रमांक दोन मधून कळसे चित्रा आघाडीवर कळसे आणि प्रणिता घाडगे विजयी

----------------

पंढरपूर नगर परिषदेच्या निवडणुकीचा निकाल 21 डिसेंबर 2025 रोजी जाहीर होईल

-----

पंढरपूर नगर परिषदेसाठी एकूण 64 टक्के मतदान झालं

  • पंढरपूर नगरपरिषदेतील दुपारी साडे तीन वाजेपर्यंतची मतदानाची टक्केवारी

सकाळी 7.30 ते दुपारी 3.30 मतदान केंद्रावर झालेली आकडेवारी
पुरुष 21089
स्त्री 20272
इतर 6
एकूण 41365
एकूण टक्केवारी 43.75

  • पंढरपूर नगरपरिषद सकाळी साडे नऊ वाजेपर्यंतची मतदानाची टक्केवारी

सकाळी 7.30 ते 9.30 मतदान केंद्रावर झालेली आकडेवारी
पुरुष - 2939
स्त्री - 2026
इतर - 0
एकूण - 4965
एकूण टक्केवारी - 5.25

  • पंढरपूर नगर परिषद निवडणूक: मतदानाला सुरुवात

--

  • एकूण जागा - 36 ( प्रभाग 18)
  • भाजप स्वतंत्र - 30 जागा
  • परिचारक गट - 6 जागा

नगराध्यक्ष पदाचे उमेदवार

  1. शामल शिरसट - भाजप 
  2. डॉ. प्रणिता भालके - तीर्थक्षेत्र विकास आघाडी

भाजपाचे माजी आमदार प्रशांत परिचारक यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. तर दिवंगत माजी आमदार भारत भालके यांचे पुत्र भगीरथ भालके यांच्यासाठी अस्तित्वाची लढाई आहे.

5. सांगोला

सांगोला नगर परिषदेच्या निकालाचे अपडेट:

  • सांगोला - शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे माजी आमदार शहाजी बापू पाटील यांचे उमेदवार आंनदा माने आघाडीवर

------------------

सांगोला नगर परिषदेच्या निवडणुकीचा निकाल 21 डिसेंबर 2025 रोजी जाहीर होईल

------------------

सांगोला नगर परिषदेसाठी एकूण 78 टक्के मतदान झालं

  • सांगोला नगर परिषद निवडणूक: मतदानाला सुरुवात

---

  • एकूण जागा - 23
  • शिवसेना (शिंदे गट) स्वतंत्र - 23 जागा
  • भाजप - 3 जागा
  • शेकाप - 10 जागा
  • राष्ट्रवादी (अजित पवार) - 10 जागा

नगराध्यक्ष पदाचे उमेदवार

  1. मारुती बनकर - भाजप
  2. आनंदा माने - शिवसेना (शिंदे गट)

सांगोल्यात माजी आमदार शहाजी बापू पाटील यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. दुसरीकडे एकत्र आलेल्या आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख, माजी आमदार दीपक साळुंखे, आणि भाजप जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

    follow whatsapp