Sharad Pawar, मुंबई : मुंबईतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शप) कार्यालयात पक्षाचा वर्धापनदिन साजरा करण्यात आला. यावेळी पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी नेत्यांसह कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं. शरद पवार यांनी यावेळी बोलताना मंत्री गिरीश महाजनांना त्यांच्या पंजाबमधील भाषणावरुन सुनावलंय. गिरीश महाजन काय म्हणाले होते? आता शरद पवारांनी त्यांना काय प्रत्युत्तर दिलंय? हे सविस्तर जाणून घेऊयात.. ॉ
ADVERTISEMENT
हेही वाचा : जालना : वडिलांच्या मित्राकडून 17 वर्षीय अल्पवयीन मुलीवर 'नको तेच', चार महिन्यांपूर्वी..
गिरीश महाजन काय म्हणाले होते?
गिरीश महाजन पंजाबमधील भाषणात म्हणाले,"6 जून 1984 हा काळा दिवस आपण कधी विसरु शकत नाहीत. आपले हजारो बहीण-भाऊ शहीद झाले. मारले गेले. आपल्या पवित्र धर्मस्थळावर सैन्याचं आक्रमण झालं, असंच मी म्हणेन. इंदिराजींनी सैन्याला जबरदस्तीने आपल्या पवित्र धर्मस्थळामध्ये घुसवलं. त्यानंतर क्रूरपणे आपल्या लोकांचे खून झाले. अब्दाली आल्यानंतर त्याने आपल्या अनेक बहीण-भावांना शहीद केले होते. त्याच प्रमाणे आपल्याच देशात आपल्याच पंतप्रधानांनी आपली वाईट अवस्था केली होती. एवढे खून होऊनही कोणाला शिक्षा झाली नाही, याचं दु:ख आहे."
हेही वाचा : आकांक्षाने प्रेमविवाह केला, कुटुंबियांनी एकत्र होऊन सूड उगवला!
शरद पवारांनी गिरीश महाजांना सुनावलं
शरद पवार म्हणाले, "आणखी एक गोष्ट काल माझ्या पाहण्यात आली. महाराष्ट्रातल्या मंत्रिमंडळातले एक गृहस्थ शीख समाजाच्या कार्यक्रमासाठी गेले होते. ते गेले, त्याची तक्रार करण्याचं कारण नाही. पण तिथं भाषण केलं गेलं. त्या भाषणामध्ये त्यांनी टीका टिप्पणी केली. इंदिरा गांधींवर टीका केली. इंदिरा गांधींनी स्वातंत्र्यानंतर देशाला संघटित केलं. देशाची जगात प्रतिमा वाढवली. देशाची प्रतिष्ठा त्यांनी संभाळली. त्यासंदर्भात त्यांनी कधीही तडजोड केली नाही. आणि काल कोणीतरी महाराष्ट्रातला मंत्री पंजाबमध्ये जाऊन म्हणतो की, शीखांवर अन्याय झाला. त्यांच्या हत्या झाल्या. ही गोष्ट खरी आहे. देशाच्या स्वातंत्र्यासाठी त्याग करणाऱ्या शीख समाजाचं योगदान आपण कधी विसरणार नाही. समाजाची प्रतिष्ठा ठेऊ. पण महाराष्ट्रातील मंत्र्याचं वक्तव्य आम्हाला मंजूर नाही. ते वक्तव्य असं होतं की, इंदिरा गांधी असोत किंवा राजीव गांधी असोत त्यांनी शीखांवर अत्याचार केले. शीखांवर अत्याचार करणारे काँग्रेसचे नेते आहेत, असं महाराष्ट्रातील मंत्री तेथे बोलत होते"
पुढे बोलताना शरद पवार म्हणाले, "देशाच्या स्वातंत्र्यासाठी शीख समाजाचं योगदान मी आताच सांगितलं. पण त्यासाठी किंमत ही देशाने सुद्धा दिली. काही चुकीचे लोक होते. आजही 98 टक्के शीख हे या देशासाठी पडेल ती किंमत द्यायला तयार आहे. देशातील शेतीचा अन्नधान्याचा प्रश्न सोडवण्याचं काम शीख समाजाच्या शेतकऱ्यांनी शिवारात घाम गाळून केलं. हे आपण कधी विसरणार नाहीत. सैन्यामध्ये पडेल ती जबाबदारी घेण्यासाठी शीख समाज पुढे येतो. हे सगळं होत असताना काही गोष्टी घडल्या त्या आपण विसरु शकत नाहीत. उदा - काही लोकांनी तरुण मुलांच्या मनामध्ये चुकीची विचारधारा सांगून त्यांना एका वेगळ्या रस्त्यावर नेण्याचा प्रयत्न केला. त्या रस्त्यावर अनेक हत्या झाल्या. देशाच्या स्वातंत्र्यासाठी योगदान दिलं, त्या लोकांच्या मालिकेमध्ये काही लष्करांच्या अधिकाऱ्यांचंही स्मरण करावे लागेल. देशाच्या एका लष्करप्रमुखांची हत्या केली गेली होती. त्यामध्ये शीखांचा हात होता, असं सांगण्याची भूमिका काही लोकांनी घेतली. म्हणून शीखांसंबंधी आदर आहे. मात्र, काल तिथे गेलेला मंत्री शीखांवर काँग्रेसने आणि देशाने अन्याय केला, असं भाषण केलं. हे संपूर्ण देशाची बेआब्रू करण्याचं काम केलं. इंदिरा गांधींची हत्या झाली, राजीव गांधींची हत्या झाली. पण या गोष्टी आता आपण विसरुया. आता त्याचं स्मरण करायला नको. मात्र, महाराष्ट्रातील एक मंत्री पंजाबमध्ये जाऊन शीखांच्या हत्या काँग्रेसच्या विचारांच्या लोकांनी केलंही भूमिका त्याठिकाणी मांडत आहेत. हे देशाच्या दृष्टीने योग्य नाही. नेहरु गेल्यानंतर इंदिरा गांधींनी देशासाठी पडेल ते केलं. पाकिस्तानला धडा शिकवला. बांगलादेशची निर्मिती देखील केली. राजीव गांधींची देखील हत्या झाली. नेहरु कुटुंबाचा त्याग देश कधीही विसरणार नाही. त्यांची तुलना कोणाशीही होऊ शकत नाही."
ADVERTISEMENT











