मोठी बातमी : कॅबिनेट बैठकीत कर्जमाफी योजनेस मंजुरी, कोणत्या शेतकऱ्यांचं कर्ज होणार माफ?

Farmer loan waiver scheme : महाराष्ट्र सरकारने 56 लाख शेतकऱ्यांना दिलासा देत 2 लाख रुपयांपर्यंतचे कृषी कर्ज माफ करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या योजनेमुळे 65 लाखांहून अधिक खात्यांना लाभ मिळणार असून, नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50,000 रुपयांचे प्रोत्साहनपर अनुदानही दिले जाणार आहे.

Farmer loan waiver scheme

Farmer loan waiver scheme

मुंबई तक

02 Jun 2026 (अपडेटेड: 02 Jun 2026, 05:04 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

मोठी बातमी : कॅबिनेट बैठकीत कर्जमाफी योजनेस मंजुरी

point

कोणत्या शेतकऱ्यांचं कर्ज होणार माफ?

Farmer loan waiver scheme : राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा आणि दिलासादायक निर्णय घेण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत, 2 लाख रुपयांपर्यंतचे कृषी कर्ज माफ करण्याची योजना मंजूर करण्यात आली आहे. पावसाळ्याच्या तोंडावर घेण्यात आलेल्या या निर्णयामुळे राज्यातील तब्बल 56 लाख शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. 

हे वाचलं का?

भाजपप्रणित महायुती सरकारने निवडणुकीत दिलं होतं आश्वासन

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या योजनेच्या माध्यमातून 65 लाखांहून अधिक बँक खात्यांना लाभ मिळणार असून, यात सुमारे 36,585 कोटी रुपयांची कर्ज माफी केली जाणार आहे. 2024 च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपप्रणित महायुती सरकारने शेतकऱ्यांना कर्जमाफीचे मोठे आश्वासन दिले होते, त्याचीच पूर्तता या निर्णयाद्वारे करण्यात आली आहे.

हेही वाचा : Govt Jobs : सीडॅकमध्ये 900 हून अधिक जागांची भरती, काय आहेत पात्रतेचे निकष?

नियमित कर्जदारांसाठी प्रोत्साहनपर अनुदानाची घोषणा

केवळ कर्जमाफीच नव्हे, तर ज्या शेतकऱ्यांनी आपल्या पीक कर्जाची नियमितपणे परतफेड केली आहे, अशा शेतकऱ्यांचाही सरकारने विचार केला आहे. नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50,000 रुपयांपर्यंतचे प्रोत्साहनपर अनुदान देण्याचा निर्णयही मंत्रिमंडळाने घेतला आहे. 

मात्र, सध्या राज्यात विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आचारसंहिता लागू असल्याने, या योजनेची अधिकृत घोषणा लगेच केली जाण्याची शक्यता कमी असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले आहे. शेतकऱ्यांच्या हिताचा हा निर्णय राज्यभरातील कृषी क्षेत्रात मोठी सकारात्मक चर्चा निर्माण करणारा ठरला आहे. ही योजना अंमलात आल्यानंतर अनेक अल्पभूधारक आणि गरजू शेतकऱ्यांना नव्याने शेती करण्यासाठी मोठी आर्थिक मदत होणार आहे.

इतर महत्त्वाच्या बातम्या 

Exclusive: 'निष्ठा पराभूत झालेली नाही, निष्ठेची चेष्टा झाली..', NCP चे माजी आमदार कोणावर संतापले?