Aniruddhacharya Viral News : कथावाचक अनिरुद्धाचार्य महाराज गेल्या काही दिवसांपासून समाजवादी पार्टी (सपा) च्या निशाण्यावर आहेत. अखिलेश यादव यांच्यासोबत वाद झाल्यानंतर त्यांचा आणखी एक खळबळजनक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्या व्हिडीओत अनिरुद्धाचार्य यांनी मुलींच्या लग्नाचं वय आणि त्यांच्या चारीत्र्यावर अशोभनीय विधान केलं आहे.
ADVERTISEMENT
समाजवादी पार्टीचे खासदार घोसीचे खासदार राजीव राय यांनी सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल केला. या व्हिडीओत अनिरुद्धाचार्य यांनी मुलींचं लग्नाचं वय कमी करण्याबाबत संतापजनक वक्तव्य केलं."आता आम्ही लग्न करून 25 वर्षांच्या मुली आणतो. 25 वर्ष होईपर्यंत मुलीने चार ठिकाणी तोंड काळं केलेलं असतं. तारुण्यात चुकीच्या वळणावर पोहोचलेल्या असतात.
समाजवादी पार्टीने केला विरोध
भारतीय कायद्यान्वये, मुलींच्या लग्नाचं कायदेशीर वय 18 वर्ष आणि मुलांचं 21 वर्ष आहे. बालविवाह करणं कायदेशीर गुन्हा आहे. एवढच नाही, बालविवाह निषेध संशोधन 2021 मध्ये मुलींच्या लग्नाचं वय 18 ने वाढवून 21 करण्याचा प्रस्तावही ठेवण्यात आला होता. पण त्या अजून मंजुरी मिळाली नाही. अशातच अनिरुद्धाचार्य यांच्या विधानामुळे समाजवादी पार्टीने कठोर पाऊल उचललं आहे.
हे ही वाचा >> पैसा पाणी : ट्रम्प यांच्या धमकीमुळे पेट्रोल महागणार?
खासदार राजीव रायने या विधानाचा निषेध करून महिला आयोग, महिला बाल विकास मंत्रालय आणि उत्तर पोलीसांना यावर कारवाई करण्याची मागणी केलीय. त्यांनी प्रश्न उपस्थित केले की, आमच्या बहिणींना असे लोक चारित्र्याचा प्रमाणपत्र देणार? जर कारवाई केली नाही. तर आपल्या देशात असे संस्कार आहेत?
सपा आणि अनिरुद्धाचार्य यांच्यात जुना वाद
हे पहिल्यांदाच नाही, जेव्हा सपा आणि अनिरुद्धाचार्य आमने-सामने आले नाहीत. त्यांच्यातील संघर्ष एका जुन्या व्हायरल व्हिडीओमुळे सुरु झाला होता. 2023 मध्ये हा व्हिडीओ व्हायरल झाला होता. या व्हिडीओत अनिरुद्धाचार्य, सपाचे सर्वेसर्वा अखिलेश यादव यांना विविध जाती-धर्मांच्या वर्ण व्यवस्थेबाबत सांगत होते. यावर अखिलेश यादव यांनी पलटवार करत म्हटलं होतं की, बाबा आमचा आणि तुमचा रस्ता वेगळा आहे. यापुढे जातीवरून बोलू नका.
हे ही वाचा >> दारू पिण्याची तलप आली..बायकोच्या दागिन्यांवर हात टाकला! संतापलेल्या पत्नीनं पतीला संपवलं अन् नंतर..
या घटनेनंतर अनिरुद्धाचार्य यांनी स्टेजवरून म्हटलं होतं की, अखिलेश यादव मला म्हणतात, माझा रस्ता वेगळा आहे. पण मुस्लिमांना नाही म्हणणार की , त्यांचा रस्ता वेगळा आहे. विचार करा..जेव्हा राजाच्या आत इतकं द्वेष आहे, मग देशाचं कल्याण कसं होणार? प्रजेची सेवा कशी करणार?
ADVERTISEMENT
