Mahayuti : “…तर तुम्हाला सत्ता मिळाली असती का?”, गुलाबराव पाटलांचा भाजपला रोकडा सवाल

मुंबई तक

15 Jan 2024 (अपडेटेड: 15 Jan 2024, 05:33 AM)

जळगावमधील मेळाव्यात एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार किशोर पाटील आणि कॅबिनेट मंत्री गुलाबराव पाटील यांनी भाजपच्या भूमिकेबद्दलची नाराजी बोलून दाखवली.

Gulabrao patil asked to bjp that if we hadn't rebel then how can you get power.

Gulabrao patil asked to bjp that if we hadn't rebel then how can you get power.

follow google news

– मनीष जोग, जळगाव : Mahayuti Melava : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक मतदारसंघातील तिन्ही पक्षातील नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्यात समन्वय घडवून आणण्यासाठी महायुतीने राज्यभर मेळावे सुरू केले आहे. रविवारी झालेल्या या मेळाव्यातून कुरबुरीच समोर आल्या. जळगावात तर ‘आम्ही बंड केले नसते, तर तुम्हाला सत्ता मिळाली असती का?’, असा सवाल करत गुलाबराव पाटील यांनी भाजपच्या भूमिकेबद्दलची खदखद व्यक्त केली. (Gulabrao Patil Targets BJP in Mahayuti Melava )

हे वाचलं का?

रविवारी (१४ जानेवारी) राज्यातील अनेक जिल्ह्यात महायुतीचे मेळावे झाले. जळगावमध्येही भाजप, शिवसेना, अजित पवार गटाचा कार्यकर्ता मेळावा झाला. या मेळाव्यात एकनाथ शिंदेंच्या सेनेचे आमदार किशोर पाटील आणि कॅबिनेट मंत्री गुलाबराव पाटील यांनी नाराजी बोलून दाखवली.

गुलाबराव पाटील काय बोलले?

मेळाव्यात बोलताना गुलाबराव पाटील म्हणाले, “तुमच्या वेळी बरोबर होते आणि आमच्या वेळेला गडबड होते. शिवसेनेत असताना आम्ही भाजपसोबत गेलो. त्यावेळी वर्षभर आम्हाला आणि आमच्या कुटुंबाला काय त्रास सहन करावा लागला, हे आमच्या कुटुंबाला माहीत आहे. आमचं काय होईल हे माहीत नसताना आम्ही धोका पत्करून आपल्यासोबत आलो आहोत, याची जाणीव ठेवायला हवी”, अशा शब्दात पाटलांनी नाराजी व्यक्ती केली.

हेही वाचा >> “नवरीचा पत्ता नाही, नवरा…”, राणेंनी इच्छुकांचे टोचले कान

राम मंदिराचे श्रेय भाजप घेताना दिसत आहे. भाजपच्या नेत्यांकडून तशी विधानंही केली जात आहे. यावरून गुलाबरावांनी खडेबोल सुनावले. ते म्हणाले, “मागच्या काळात मशीद पडली, त्यावेळी आपणही त्यामध्ये सहभागी होतो. आपल्याला जेलमध्ये जावे लागले होते. राम सर्वांचा आहे. रामाला प्रायव्हेट कंपनी करू नका.”

हेही वाचा >> “उद्धव ठाकरेंसोबत जाण्याला मी विरोध केला कारण…”, देवरांचं खळबळ माजवणारा खुलासा

किशोर पाटलांनी व्यक्त केली खदखद

आमदार किशोर पाटील म्हणाले, “गेल्या अनेक वर्षांपासून शिवसेना-भाजप युती आहे. शिवसेनेनं कधीही गद्दारी केली नाही. माझ्या उमेदवारीच्या वेळी एका अपक्ष उमेदवाराला पुढे करण्यात आले. एवढंच काय, तर नंतर त्याला भाजप तालुकाध्यक्ष बनवण्यात आलं. बाजार समिती निवडणुकीमध्येही युती धर्म निभवायला हवा होता, पण त्यावेळी साथ दिली नाही”, अशा शब्दात आमदार पाटलांनी भाजपबद्दलची नाराजी व्यक्त केली.

    follow whatsapp