Harshwardhan Sapkal on Devendra Fadnavis, नागपूर : नाशकातील भोंदूबाबा अशोक खरात याचे काळे कारनामे समोर आल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी या प्रकरणाविषयी रविवारी (दि.22) पहिल्यांदा भाष्य केलं. इंटेलिजन्सच्या जोरावर आम्हीच त्याचा भांडाफोड केलाय, असं म्हणत फडणवीसांनी कारवाईचं श्रेय घेण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी आज (दि.23) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर सडकून टीका केली. ते नागपुरात बोलत होते. देवेंद्र फडणवीस काल (दि.22) घेतलेल्या पत्रकार परिषदेत काय म्हणाले होते? आणि हर्षवर्धन सपकाळ यांनी आज बोलताना काय म्हटलंय? सविस्तर जाणून घेऊयात..
ADVERTISEMENT
हर्षवर्धन सपकाळ काय म्हणाले?
हर्षवर्धन सपकाळ म्हणाले, "खराचे घाणेरडे आणि विकृत कृत्य सुरु असताना देवेंद्र फडणवीस तुम्ही मूग गिळून गप्प का होतात? या प्रश्नाचं उत्तर देवेंद्र फडणीसांनी दिलं पाहिजे. कारण या अशोक खरातचे घाणेरडे कृत्य सुरु होते, त्या काळात देवेंद्र फडणवीसचं राज्याचे गृहमंत्री होते. हे अपयश देवेंद्र फडणवीसांचं आहे. ते त्यांनी स्वीकारावं. रुपाली चाकणकर यांनी राजीनामा देताना जे फोटोसेशन केलं, ते पाहून कुठेही नैतिकता आम्हाला दिसत नव्हती. कुठेही पश्चाताप दिसत नव्हता. त्यांनी वैयक्तिक कारणासाठी राजीनामा दिल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे फडणवीसांनी खोटं बोलणे बंद करावे."
देवेंद्र फडणवीस काय म्हणाले होते?
देवेंद्र फडणवीस म्हणाले, " खरात यांचं प्रकरण गंभीर आहे. इंटेलिजन्सच्या जोरावर आम्हीच त्याचा भांडाफोड केलेला आहे. लाजेखातर किंवा सामाजिक दबावामुळे महिला एकदम समोर येत नाहीत. आम्ही या पीडितांना धीर देऊन किंवा त्यांच्या कुटुंबियांना धीर देऊन त्यांना समोर आणण्याचा प्रयत्न सुरु आहे. काही महिला यामध्ये प्रतिसाद देखील देत आहेत. या प्रकरणाचे वरिष्ठ स्तरावर मॉनेटरिंग होत आहे. स्वत: डीजींना मी सांगितलं आहे, याचं मॉनेटरिंग करायचं आहे. एसआयटीची स्थापना करण्यात आलेलं आहे. याला राजकीय रंग देण्याचा प्रयत्न सुरु आहे. कोणाकडे काही पुरावा असेल तर सादर करावा. विरोधी पक्षातील कोणते लोक बाबाकडे गेले? याचे मी पुरावे देऊ शकतो. सर्वात जास्त माझ्याकडे पुरावे आहेत. मात्र, ते पोलिसांकडे आहेत, ते पोलिसांचं काम आहे. ते माझं काम नाही. खरातांना 40 किलोमीटर पाण्याची लाईन कशी दिली? हे सगळं तुम्ही काल दाखवलेलं आहे. यामध्ये राजकारण करु नये. हा महिलांच्या डिग्नीटीचा प्रश्न आहे. काही झालं तर खरातांना याची शिक्षा भोगावी लागेल."
इतर महत्त्वाच्या बातम्या
बीड : परळीत 50 वर्षीय नराधमाकडून पाचवीतील मुलीवर लैंगिक अत्याचार, किराणा दुकानात बोलावून नको ते केलं
ADVERTISEMENT











