'तुम्ही जेवता ना @# तर नाही खात ना?', माधुरी हत्तीणीवरून हिंदुस्थानी भाऊने कोल्हापूरकरांना डिवचलं, शिवीगाळ करणारा Video केला पोस्ट!

Hindustani Bhau: कोल्हापूरमधील माधुरी हत्तीणीवरून सध्या बरंच राजकारण सुरू आहे. अशातच हिंदुस्थानी भाऊने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करत कोल्हापूरकरांना डिवचलं आहे.

hindustani bhau teased citizens of kolhapur over madhuri elephant posted an abusive video

हिंदुस्थानी भाऊने शेअर केला वादग्रस्त व्हिडिओ

मुंबई तक

05 Aug 2025 (अपडेटेड: 05 Aug 2025, 10:29 PM)

follow google news

मुंबई: कोल्हापूरच्या नांदणी गावातील हत्तीण माधुरी हिला Vantara ला पाठवल्यानंतर कोल्हापूर तिला परत आणण्यासाठी एकवटलं आहे.  Vantara विरुद्ध नंदणीतील मठ असा वाद सुरू असताना आणि मुख्यमंत्री फडणवीसांनी स्वतः यामध्ये लक्ष घातलं असताना आता या सगळ्या वादात मीडिया इन्फ्ल्यून्सर हिंदुस्थानी भाऊने उडी घेतली आहे. माधुरी किंवा महादेवी हत्तींबद्दल व्हिडिओ करत त्याने सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. या व्हिडिओमध्ये त्याने अनंत अंबानींचं कौतुक केलं आहे. तर दुसरीकडे माधुरीला पुन्हा कोल्हापुरात पाठवण्याची मागणी करणाऱ्यांना अश्लाघ अशी शिवीगाळ केली आहे.

हे वाचलं का?

हिंदुस्थानी भाऊने त्याच्या 6 मिनिटांच्या व्हिडिओमध्ये अनेक शिव्यांचा वापर केला आहे. यानंतर त्याला प्रचंड निगेटिव्ह कमेंट्स यायला सुरुवात झाली. कोल्हापूरकरांना शिव्या घातल्या म्हणून असंख्य कमेंट सुरू झाल्या. काही वेळानी हिंदुस्तानी भाऊने कमेंट सेक्शन बंद केलं तर आता यूजर्सने त्याच्या दुसऱ्या पोस्टवर जाऊनही लोक कमेंट करणं सुरू आहे. 

पाहा हिंदुस्थानी भाऊ माधुरी हत्तीणीबाबत नेमकं काय म्हणाला... 

'कोल्हापूरच्या माधुरी हत्तीचा मॅटर सुरू आहे. तर मी त्याची काही माहिती घेतली की काय झालं, काय नाही झालं.. माझे देखील कोल्हापुरात बरेच मित्र आहेत. त्यांच्याशी बोललो.. त्यावेळी समजलं की, यावर बरंच राजकारण सुरू आहे. कारण आता इलेक्शन आलं आहे तर राजकारण होणारच...'

'एवढ्या वर्षांपासून कोणताही राजकीय नेता हा माधुरीला पाहायला गेला होता का? तर कोणीच गेलं नव्हतं. पण आता या मुद्द्याला मोठं केलं जात आहे. कारण आता निवडणूक आली आहे.'

हे ही वाचा>> 6 महिन्यात 7 वेळा शिक्षण विभाग तोंडघशी कसा पडलाय, शिक्षण विभागात खेळखंडोबा का?

'त्या माधुरी हत्तीणीला हे लोकं वापरत होते. जसे आपण घोडा भाड्याने देतो, गाडी भाड्याने देतो.. तसंच माधुरीला देखील भाड्याने द्यायचे. माझ्याकडे त्याचे काही फोटो आहेत.' 

'माझ्या घरी पण प्राणी आहे. मी त्यांना मुलांसारखं सांभाळतो. भाड्याने नाही देत मी त्यांनी.. तर हे लोकं तिला भाड्याने द्यायचे आणि पैसे कमवायचे. 2017 मध्ये जैन समाजच्या स्वामीजी होते त्यांच्यावर या माधुरी हत्तीणी हल्ला केला होता. ज्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर इथले एक नेते आहेत. राजू शेट्टी नावाचे नेते..' 

'या राजू शेट्टी यांनी 2018 साली वन विभागाला हे पत्र लिहिलं होतं. त्यात असं म्हटलेलं की, माधुरी हत्तीला सांभाळू शकत नाही. तिला येथून घेऊन जा म्हणून.' 

'तर तुम्ही जे नेत्यांच्या बोलण्यात येतात ना.. ते नका येऊ. खूप जण बोलतील की, याला अनंत अंबानीने पैसे दिले.. आधी म्हणायचे मला भाजपचा माणूस आहे.. अरे.. तुम्हारी #$ & $#@% तुम्हारे... समजलं. जिथे चूक आहे तिथे मी चूक आहे असं म्हणतो..'

हे ही वाचा>> आजपासून 'या' 7 मोठ्या गोष्टी बदलणार, तुमच्या-आमच्यावर होणार थेट परिणाम!

'ना अनंत अंबानी माझं घर चालवत ना तुमचं. अनंत अंबानीची इज्जत मी यासाठी करतो की, तो कट्टर सनातनी आहे. 200 च्या वर त्याच्याकडे हत्ती आहे. जगभरातील प्राणी आहेत. त्याला एका हत्तीशी काय देणं-घेणं आहे रे..' 

'फक्त कोणी आपल्याला भडकवलं तर तुमचं डोकं लागलीच फिरतं. अनंत अंबानीला ना मुक्या प्राण्यांची खरी किंमत माहिती आहे. ज्या अनंत अंबानीबाबत आता तुम्ही जे वाईट-वाईट बोलत आहात ना.. त्याची ना तुम्ही पुजा कराल.'

'पेटाने या हत्तीणीबाबत पत्र लिहिलं होतं. त्यानंतर हायकोर्टाने याबाबत एक निर्देश दिले की, हिला चांगल्या जागी, जिथे तिची देखभाल होईल अशा ठिकाणी जा. तुम्ही उलट अनंत अंबानीविरोधातच बोलत आहात.' 

'अरे थोडी अक्कल लावा रे.. जेवताना तुम्ही @# तर नाही खात? थोडं डोकं लावला.. कोणच्याही आहारी जाऊ नका.' असं म्हणत हिंदुस्थानी भाऊने सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर केला आहे.

    follow whatsapp