Narayan Rane : महापालिकेच्या निवडणुका सुरू होण्यापूर्वीच उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे दोन भाऊ मराठीसाठी एकत्र आले. संयुक्त महाराष्ट्राचा दाखला देत अनेक नेत्यांनी मुंबई ही मराठी माणसांचीच असल्याचा दावा केला. तसेच मुंबई ही मराठी माणसांचीच असल्याचं अनेकदा ठणकावून सांगितलं. याचवरून आता भाजपचे नेते नारायण राणे यांनी मुंबई आणि मराठी माणसांविषयी वक्तव्य केलं आहे. त्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : "शिवछत्रपतींच्या रायगडमध्ये डान्सबार?' राज ठाकरेंचा प्रश्न आणि मनसैनिक पनवेलच्या रस्त्यावर, 'नाईट रायडर्स' डान्स बारची तोडफोड
काय म्हणाले नारायण राणे?
एबीपी माझा या वृत्तमाध्यमाशी बोलताना नारायण राणे यांनी मुंबई ही मराठी माणसांची नसल्याचं वक्तव्य केलं आहे. नारायण राणे यांच्या या वक्तव्याने मराठी जणांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. मुंबईला सर्व जाती धर्माच्या लोकांचं योगदान दिल्याचं नारायण राणे यांनी सांगितलं आहे.
उद्योगधंदे, बाजारपेठा मराठी माणसांनी नाही उभे केले
त्यानंतर ते पुढे म्हणाले की, मुंबईतील उद्योगधंदे, बाजारपेठा मराठी माणसांनी निर्माण नाही केले. यामध्ये सर्व जाती धर्माचं योगदान आहे. ही मुंबई बहुरंगी असल्याचं वक्तव्य नारायण राणे यांनी केलं. त्यानंतर उलट त्यांनी पत्रकारांना सांगितलं की, तुम्हीही आपलं कसल्याची गोष्टींना प्रसिद्धी देता. जे जनहिताचं आहे, तेच प्रसिद्ध करा, असे नारायण राणे म्हणाले आहेत.
दरम्यान, काही दिवसांपासून मराठी आणि अमराठी वादाला तोंड फुटलं आहे. याचपार्श्वभूमीवर आता दोन ठाकरे बंधु एकत्र आलेले आहेत. त्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते संजय राऊत यांनी 2 ऑगस्ट रोजी पनवेलमध्ये शेकापच्या वर्धापनदिनी सत्ताधाऱ्यांना धारेवर धरले. तेव्हा राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा मराठी अस्मितेचा प्रश्न उपस्थित केला. त्याच्याच दुसऱ्या दिवशी प्रसारमाध्याशी बोलताना नारायण राणे यांनी मुंबई मराठी माणसाची नसल्याचं बेताल वक्तव्य केलं आहे.
हे ही वाचा : ऑनलाईन गेमच्या नादात तरुणाने उचललं टोकाचं पाऊल, दरवाजा आतून बंद, कुटुंबीयांनी दार तोडलं अन्...
त्यांचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होताना दिसत आहे. याच व्हिडिओवर मनसैनिक आणि ठाकरे गट नेमकी काय प्रतिक्रिया देईल, याकडे सर्व जणांचे लक्ष लागले आहे.
ADVERTISEMENT
