'मी उद्धव ठाकरे यांच्यासोबतच', उत्तर महाराष्ट्रातील 'या' खासदाराने भूमिका केली स्पष्ट

मुंबई तक

• 09:28 AM • 17 Jun 2026

ठाकरे गटाचे 9 पैकी 6 खासदार दिल्लीत पोहोचले असून ते शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मात्र यापैकी एका खासदाराने ते दिल्लीला संसदीय समितीच्या बैठकीसाठी आल्याचे सांगितले आहे.

Operation Tiger

Operation Tiger

Google CTA

बातम्या हायलाइट

point

'मी उद्धव ठाकरे यांच्यासोबतच'

point

उत्तर महाराष्ट्रातील 'या' खासदाराने भूमिका केली स्पष्ट

Operation Tiger : उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वाखालील शिवसेनेत पुन्हा एकदा मोठी फूट पडणार असल्याची चर्चा आहे. ठाकरे गटाचे 9 पैकी 6 खासदार दिल्लीत पोहोचले असून ते शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मात्र ठाकरे गटाचे नाशिकचे खासदार राजाभाऊ वाजे यांनी ते उद्धव ठाकरे यांच्यासोबत असल्याचे सांगितले आहे. ते नेमकं काय म्हणाले जाणून घेऊया.

हे वाचलं का?

'मी उद्धव ठाकरे यांच्यासोबत'

दिल्लीला गेलेल्या सहा खासदारांमध्ये नाशिकचे खासदार राजाभाऊ वाजे यांचा देखील समावेश आहे. मात्र त्यांनी संसदीय समितीच्या बैठकीसाठी दिल्लीला आल्याचे सांगितले आहे. वाजे म्हणाले की, 'मी कुठेही जात नाहीये. मी उद्धव ठाकरे यांच्यासोबतच आहे. संसदीय समितीच्या दुपारी तीन वाजता होणाऱ्या एका बैठकीला उपस्थित राहण्यासाठी मी दिल्लीला येणार आहे.' 

हे ही वाचा : 'ऑपरेशन टायगर'च्या पार्श्वभूमीवर ओमराजेंचं मौन, आहेत तरी कुठे?

ओम बिर्ला दिल्लीत दाखल

दरम्यान, दुसरीकडे पक्षातील इतर काही खासदारांच्या हालचाली मात्र वेगळ्याच दिशेने सुरू असल्याचे चित्र आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, खासदार दिल्लीत पोहोचले असून ते खासदार श्रीकांत शिंदे यांच्या निवासस्थानी बैठक घेण्याची शक्यता आहे. या बैठकीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः उपस्थित राहू शकतात, कारण ते मुंबईहून दिल्लीसाठी रवाना झाले आहेत. हे खासदार शिंदे गटाच्या नेत्यांशी चर्चा केल्यानंतर लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची भेट घेण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला हे देखील मंगळवारी रात्रीच दिल्लीत परतल्यामुळे या चर्चांना अधिक उधाण आले आहे. 

हे ही वाचा : ‘ऑपरेशन टायगर’ आधीच ठाकरेंचा सगळ्यात मोठा डाव; मध्यरात्रीच जारी केलं ‘ते’ पत्र, अन्…

'या' खासदारांची नावं चर्चेत

ओमराजे निंबाळकर, संजय देशमुख, बंडू जाधव, नागेश आष्टीकर, संजय दिना पाटील आणि राजाभाऊ वाजे हे खासदार शिंदे गटात समाविष्ट होणार असल्याची चर्चा आहे. मात्र या वृत्तांना अद्याप कोणत्याही संबंधित खासदारांकडून किंवा पक्षाकडून अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.

हे ही वाचा : महाराष्ट्रात नवा राजकीय भूकंप, ऐन रात्री ‘ऑपरेशन टायगर’ सुरू.. ठाकरेंचे खासदार थेट…

ऑपरेशन टायगर नेमकं काय आहे?

लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील राजकीय समीकरणे बदलण्याच्या उद्देशाने शिंदे गटाकडून आमदार आणि खासदारांना गळाला लावण्याचे प्रयत्न सुरू आहेत. यालाच राजकीय वर्तुळात "ऑपरेशन टायगर" असे नाव देण्यात आले आहे. ठाकरे गटातील नाराज नेते आणि लोकप्रतिनिधींना आपल्या बाजूने वळवण्याचा हा सगळा प्रयत्न सुरू आहे. यापुढे आता काय घडामोडी घडतात याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.