एकीकडे एअर स्ट्राईक, नंतर ड्रोन हल्ला, आता धरणाचे दरवाजे उघडले... पाकिस्तानला तिसरा धक्का?

22 एप्रिलला पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 26 जणांचा मृत्यू झाला होता, ज्यात बहुतांश पर्यटक होते. या हल्ल्यासाठी पाकिस्तानला जबाबदार धरत भारताने लष्करी आणि राजनैतिक पातळीवर प्रत्युत्तर दिले आहे.

Mumbai Tak

मुंबई तक

08 May 2025 (अपडेटेड: 08 May 2025, 04:48 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

भारतानं चिनाब नदीवरच्या धरणाचे दरवाडे उघडले

point

पाकिस्तानकडे जाणार पाण्याचा प्रवाह

point

पाकिस्तानच्या काही भागात पूर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता

Jammu Kashmir : जम्मू-काश्मीरमध्ये मुसळधार पावसामुळे चिनाब नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाल्यानं भारत सरकारने गुरुवारी रामबन येथील बगलिहार जलविद्युत प्रकल्पाच्या धरणाचे दोन दरवाजे उघडले. यापूर्वी केंद्र सरकारने पाकिस्तानला पाण्याचा प्रवाह नियंत्रित करण्यासाठी धरणाचे सर्व दरवाजे बंद केले होते.

हे वाचलं का?

पाकिस्तानविरोधात भारताची आक्रमक पावले

22 एप्रिल रोजी पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 26 जणांचा मृत्यू झाला होता, ज्यात बहुतांश पर्यटक होते. या हल्ल्यासाठी पाकिस्तानला जबाबदार धरत भारताने लष्करी आणि राजनैतिक पातळीवर प्रत्युत्तर दिले आहे. बुधवारी पहाटे 1:30 वाजता भारतीय सशस्त्र दलांनी 'ऑपरेशन सिंदूर' नावाची कारवाई करत पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील (PoK) नऊ दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले.

हे ही वाचा >> Drone Strike: भारताचा पाकिस्तानवर दुसरा मोठा हल्ला, थेट लाहोरपर्यंत मारली मजल, Air डिफेन्स सिस्टमच टाकली उखडून!

ही कारवाई अवघ्या 25 मिनिटांत (पहाटे 1:05 ते 1:30) पूर्ण झाली. ज्या तळांवर ही कारवाई झाली, तिथून भारताविरोधात हल्ल्यांचे नियोजन होत असल्याचा दावा अधिकाऱ्यांनी केला. हे तळ जैश-ए-मोहम्मद (JeM) आणि लष्कर-ए-तोयबा (LeT) या दहशतवादी संघटनांशी जोडलेले होते.

इंडस करार स्थगित, चिनाबही चर्चेत

भारताने इंडस जल करार तात्पुरता स्थगित केला आहे. या करारात चिनाब नदीचाही समावेश आहे. 1960 च्या इंडस जल करारानुसार झेलम, चिनाब, रावी, बियास आणि सतलज या नद्यांच्या पाण्याच्या वापराचे हक्क भारत आणि पाकिस्तान यांच्यात विभागले गेले होते.

काय परिणाम होऊ शकतात? 

हे ही वाचा >> "राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांनी एकत्र येण्याचा निर्णय आता...", शरद पवार नेमकं काय म्हणाले?

पाकिस्तानच्या शेतीसाठी या नद्यांचे पाणी अत्यंत महत्त्वाचे आहे. बगलिहार धरण, जे चिनाब नदीवर आहे, यापूर्वीही इंडस जल कराराच्या चौकटीत भारत आणि पाकिस्तानमधील वादाचा विषय ठरले आहे. मात्र, यंदा या निर्णयामुळे सध्या पाकिस्तानमध्ये पूरस्थिती निर्माण होऊ शकते. भारताच्या या कठोर पावलांमुळे दोन्ही देशांमधील तणाव आणखी वाढण्याची शक्यता आहे.


 

    follow whatsapp