इंडिया टुडे GDB सर्व्हे: आंतरजातीय विवाह किंवा इतर धर्मीय कर्मचाऱ्यांच्या बाबतीत महाराष्ट्र कुठे? पाहा कितवा नंबर मिळालाय!

मुंबई तक

• 09:00 AM • 22 Mar 2025

India Today आणि How India Lives यांच्या Gross Domestic Behaviour (GDB) Survey सर्वेक्षणात नागरी जाणीव, सामाजिक वर्तन, स्त्री पुरूष समानता आणि भेदभाव यावर लोकांचे मत घेण्यात आले. या सर्वेक्षणात महाराष्ट्रातील नेमकी परिस्थिती जाणून घेतली, येथे आंतरधर्मीय आणि आंतरजातीय विवाहांना आणि नोकरीमध्ये धार्मिक भेदभाव किती आहे यावर सर्व्हे करण्यात आला.

india today gdb survey Diversity and discrimination (फोटो सौजन्य: Gork AI)

india today gdb survey Diversity and discrimination (फोटो सौजन्य: Gork AI)

Google CTA

India Today GBD Survey: इंडिया टुडे ग्रुप आणि डेटा अॅनालिटिक्स फर्म How India Lives यांनी एक विशेष मत सर्वेक्षण केले आहे. या सर्वेक्षणात नागरी जाणीव, लोकांचे सामाजिक आणि प्रामाणिक वर्तन, लिंग समानता आणि भेदभाव यासारख्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर लोकांचे मत घेण्यात आले. या सर्वेक्षणाला सकल घरगुती वर्तन (GDB) असे नाव देण्यात आले आहे. ज्याप्रमाणे देशाच्या अर्थव्यवस्थेचे मोजमाप करण्यासाठी GDP (ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट) वापरले जाते, त्याचप्रमाणे GDB सर्वेक्षण हे लोकांचे सामाजिक वर्तन, सहानुभूती आणि प्रामाणिकपणा मोजण्याचा प्रयत्न आहे. या सर्वेक्षणात, एक सुसंस्कृत समाज म्हणून आपण कुठे उभे आहोत हे समजून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला.

हे वाचलं का?

या सर्वेक्षणात आपले शेजारी, विविध जाती आणि धर्माचे लोक, महिला, भ्रष्टाचार आणि सार्वजनिक सुरक्षिततेसारख्या मुद्द्यांबद्दल आपण काय विचार करतो याचा आढावा घेतला जातो. या सर्वेक्षणाचे निकाल काही राज्यांच्या बाबत धक्कादायक आहेत. 

या सर्वेक्षणात सामाजिक समावेशनाबद्दल पाच महत्त्वाचे प्रश्न विचारून लोकांच्या वृत्तीचा शोध घेण्यात आला. विविधता आणि भेदभावाच्या क्रमवारीत महाराष्ट्र हा कोणत्या स्थानी आहे हे जाणून घेण्यात आलं. या क्रमवारीत केरळ अव्वल स्थानावर आहे, तर महाराष्ट्र हा चौथ्या क्रमांकावर आहे.

हे ही वाचा>> India Today GDB सर्व्हे: धक्कादायक! महाराष्ट्रातल्या लोकांचं वर्तन कसं आहे, डोळे उघडवणारा रिपोर्ट

या सर्वेक्षणातून असे दिसून आले की केरळमधील लोक खाण्यापिण्याच्या सवयींवरील निर्बंधांना जोरदारपणे नकार देतात, नोकरीतील भेदभावाला विरोध करतात आणि आंतरधर्मीय आणि आंतरजातीय विवाहांना स्वीकारतात. 

दुसरीकडे, महाराष्ट्रात आंतरधर्मीय विवाहांना थोडासा विरोध होताना दिसतो आहे. तर नोकरीत धार्मिक भेदभाव फार प्रमाणात आढळत नाही. जर आपण आंतरजातीय विवाहाबद्दल बोललो तर ते महाराष्ट्र हे याबाबत काहीसं प्रगतशील राज्य असल्याचे दिसून येत आहे. इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रातील लोकांची मानसिका ही संकुचित नाही. 

विविधता आणि भेदभाव (Diversity and discrimination: The best and the worst)

Rank 2025  State Diversity/Discrimination index
1 Kerala 0.872657818
2 Tamil Nadu 0.672391666
3 West Bengal 0.664540238
4 Maharashtra 0.615092785
5 Chandigarh 0.597613563
6 Haryana 0.490049195
7 Assam 0.47545808
8 Telangana 0.467632637
9 Rajasthan 0.40225891
10 Bihar 0.394243182
11 Andhra Pradesh 0.387668887
12 Odisha 0.379084769
13 Jharkhand 0.376940681
14 Chhattisgarh 0.367237002
15 Himachal Pradesh 0.352840263
16 Gujrat 0.31418911
17 NCT of Delhi 0.306666094
18 Punjab 0.296787695
19 Karnataka 0.278985742
20 Uttarakhand 0.199240599
21 Uttar Pradesh 0.178062418
22 Madhya Pradesh 0.112278061

 

या प्रश्नांच्या आधारे करण्यात आले सर्वेक्षण:

प्रश्न 1: रहिवाशांच्या संघटना किंवा गृहनिर्माण संस्थांना वैयक्तिक अपार्टमेंट किंवा सार्वजनिक ठिकाणी विशिष्ट प्रकारचे अन्न (जसे की मांस किंवा गोमांस) बंदी घालण्याचा अधिकार असावा का?

 

 

 

होय

नाही

सर्वोत्तम वर्तन असलेले राज्य

केरळ

10%

88%

सर्वात वाईट वर्तन असलेले राज्य

उत्तराखंड

75%

25%

 

राष्ट्रीय सरासरी:

  • 55% प्रतिसादकर्त्यांनी त्यांच्या भागात अन्नावरील कोणत्याही प्रकारच्या निर्बंधांना विरोध केला.

 

प्रश्न 2: पुरुष आणि स्त्री वेगवेगळ्या धर्माचे असले तरीही त्यांना लग्न करण्याचे स्वातंत्र्य असले पाहिजे का?

 

 

 

होय

नाही

सर्वोत्तम वर्तनशील राज्य

चंदीगड

90%

10%

सर्वात वाईट वर्तन असलेले राज्य

कर्नाटक

6%

94%

 

राष्ट्रीय सरासरी:

  • 61% प्रतिसादकर्त्यांनी आंतरधर्मीय विवाहांना विरोध केला.

 

प्रश्न 3: पुरुष आणि स्त्री वेगवेगळ्या जातीचे असले तरीही त्यांना लग्न करण्याचे स्वातंत्र्य असले पाहिजे का?

 

 

 

होय

नाही

सर्वोत्तम वर्तनशील राज्य

चंदीगड

91%

9%

सर्वात वाईट वर्तन करणारे राज्य

उत्तर प्रदेश

16%

84%

 

राष्ट्रीय सरासरी:

  • 56% प्रतिसादकर्त्यांनी आंतरजातीय विवाहांना विरोध केला.

 

प्रश्न 4: तुमच्या गावात किंवा परिसरात वेगवेगळ्या धर्माचे लोक किंवा कुटुंबे स्थायिक झाल्यास तुम्हाला समाधान वाटते का?

 

 

 

होय

नाही

सर्वोत्तम वर्तन असलेले राज्य

प. बंगाल

91%

9%

सर्वात वाईट वर्तन करणारे राज्य

उत्तराखंड

28%

72%

 

राष्ट्रीय सरासरी:

  • 70% प्रतिसादकर्त्यांनी सांगितले की ते वेगवेगळ्या धर्माच्या लोकांना त्यांचे शेजारी म्हणून स्वीकारण्यास तयार आहेत.

 

प्रश्न 5: एखाद्या मालकाला विशिष्ट धर्माच्या लोकांना कामावर न ठेवण्याचा अधिकार असावा का?

 

 

 

होय

नाही

सर्वोत्तम वर्तन असलेले राज्य

केरळ

9%

88%

सर्वात वाईट वर्तन करणारे राज्य

उत्तर प्रदेश

51%

49%

 

राष्ट्रीय सरासरी:

  • 60% प्रतिसादकर्त्यांनी रोजगाराच्या संधींमध्ये धार्मिक भेदभावाला विरोध केला