Ishan Kishan : टीम इंडियाचा क्रिकेटपटू इशान किशनचे वडील प्रणव किशन यांनी 27 ऑक्टोंबर रोजी नितीश कुमारांच्या जनता दलात पक्षप्रवेश केला होता. त्यानंतर जनता दलाचे कार्यकारी अध्यक्ष संजय झा यांनी 'इशान किशन पक्षासाठी प्रचार करेल', असं मोठं विधान केलं होते. यावरून आता इशान किशन राजकारणात प्रवेश करणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. त्यावर इशान किशन यांच्या वडिलांनी भाष्य केलं आहे.
ADVERTISEMENT
काय म्हणाले प्रणव किशन?
प्रणव किशन यांनी काही महिन्यांपूर्वी जेडीयुमध्ये पक्षप्रवेश केला. जेडीयुमध्ये त्यांना स्थान देत राजकीय सल्लागार म्हणून त्यांची निवड करण्यात आली. त्यानंतर पक्षाने दिलेल्या जबाबदारीत कसलीही करस सोडणार नसल्याचं ते म्हणाले होते.
हेही वाचा : IPL 2025: 35 चेंडूत 100 धावा करणारा 14 वर्षांचा वैभव सूर्यवंशी मराठी आहे?
त्याचप्रमाणे जेव्हापासून मी राजकारणात रस घेण्यास सुरूवात केली, तेव्हापासून नितीशजींचं काम पाहून मी खूप प्रभावित झालो असं ते म्हणाले. मला मिळालेली जबाबदारी नक्कीच पूर्ण करेन असं आश्वासनही त्यांनी दिलं. त्यासाठी जनमाणसांपर्यंत पोहोचायचंय असा दावा त्यांनी केला.
त्यानंतर येणाऱ्या काळात निवडणूक लढवणार की नाही? असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. त्यावर प्रत्युत्तर देत ते म्हणाले की, हा सर्व पक्षाचा अंतर्गत निर्णय आहे. मी एक छोटा कार्यकर्ता आहे. पक्षाने दिलेली जबाबदारी पार पाडेल असं ते म्हणाले. त्यानंतर त्यांनी इशान किशन राजकारणात प्रवेश करणार की नाही यावर स्पष्टीकरण दिलं.
हेही वाचा : Who is Avneet Kaur: कोण आहे ही अवनीत? जिच्यामुळे विराट कोहलीचा टप्प्यातच कार्यक्रम झालाय!
इशान किशन राजकारणात प्रवेश करणार?
ते म्हणाले की, इशानला राजकारणात फारसा रस नाही. पण मी राजकारणात सक्रिय झाल्यापासून तोही उत्साहित आहे. जर त्याला क्रिकेटमधून वेळ मिळाला तर निवडणुकीच्या वेळी जो जनता दलसाठी प्रचार करेल, असं प्रणव म्हणाले. त्याच्या या वक्तव्यामुळे इशान किशन आता राजकारणात सक्रिय होणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे.
ADVERTISEMENT
