Jayant Patil :राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे माजी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे. जयंत पाटील यांच्या राजीनाम्यानंतर पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदी नेमकी कोणाला संधी मिळणार याची एकच चर्चा होताना दिसत आहे. जयंत पाटील यांच्यानंतर आता शशिकांत शिंदे यांना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या प्रदेशाध्यक्षपदाचा पदभार देण्यात येणार असल्याची चर्चा आहे.
ADVERTISEMENT
हेही वाचा : तीन वर्षांपासून होतं जीवापाड प्रेम, बहिणीने चौकात सोडलं अन् तरुणी गायब, अखेर तरुणासोबत जंगलात...
15 जुलै रोजी शशिकांत शिंदे यांना पदभार स्वीकारणार आहेत. 10 जून रोजी पक्षाच्या वर्धापन दिनादिवशी जयंत पाटील यांनी प्रदेशाध्यक्षपदावरून मुक्त करावं अशी मागणी केली होती. मला पवार साहेबांनी बरीच संधी दिली आहे. सात वर्षांचा कालावधी दिला. शेवटी पक्षाने नव्या चेहऱ्याला संधी द्यावी. तुम्हा सर्वांसमोर विनंती करतो की, शेवटी पक्ष हा पवार साहेबांचा आहे. पवार साहेबांनी योग्य तो निर्णय घ्यावा. आपल्याला बरंच आणखी पुढं जायचंय, असं जयंत पाटील म्हणाले आहेत.
शशिकांत शिंदेंना पदभार सांभाळण्याची संधी
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे प्रदेशाध्यपद शशिकांत शिंदे यांना मिळणार असल्याच्या चर्चांना उधाण आलेलं आहे. त्यानंतर आता एका वृत्तमाध्यमाशी बोलताना शशिकांत शिंदे म्हणाले की, अद्यापही प्रदेशाध्यक्षपदाबाबत कोणाचंही नाव निश्चित करण्यात आलेलं नाही.
हेही वाचा : “मला कुटुंबापासून दूर जायचंय...” राधिकाची व्हॉट्सअॅप चॅट आली समोर! कोचला नेमकं काय सांगितलं?
पवारसाहेब आणि सुप्रिया ताई, जयंत पाटील आणि पक्ष जो निर्णय घेईल तो मान्य असेल. 15 तारखेला पक्षाची बैठक होईल तेव्हाच निवड होईल, असं शशिकांत शिंदे म्हणाले आहेत. त्यानंतर पुढे ते म्हणाले की, आणखी कोणाचं नाव चर्चेत आहे याबाबत माहिती नाही. मला आपल्याकडूनच कळालं असल्याचं त्यांनी माध्यमाशी बोलताना सांगितलं.
ADVERTISEMENT
