Maharashtra MLC Election : "ऐनवेळी असे का केले?", ठाकरेंना कपिल पाटलांचा संतप्त सवाल

Vidhan Parishad election 2024 : विधान परिषद निवडणुकीत शेतकरी कामगार पक्षाचे नेते जयंत पाटील यांचा पराभव झाल्याने महाविकास आघाडीतील छोटे पक्ष नाराज झाले आहेत. 

कपिल पाटील यांनी उद्धव ठाकरे यांना काही सवाल केले आहेत.

जयंत पाटील यांच्या पराभवानंतर कपिल पाटील यांची उद्धव ठाकरेंवर टीका.

मुंबई तक

• 06:33 PM • 13 Jul 2024

follow google news

बातम्या हायलाइट

point

विधान परिषद निवडणूक निकाल २०२४

point

कपिल पाटील उद्धव ठाकरेंवर नाराज

point

जयंत पाटील यांचा पराभव झाल्याने मविआतील छोटे पक्ष नाराज

Maharashtra Vidhan Parishad Election : "भाजप पक्ष पळवतो, तर तुम्ही पण तसेच का वागत आहात?", असा सवाल करत कपिल पाटील यांनी संताप व्यक्त केला. जयंत पाटील यांचा विधान परिषद निवडणुकीत पराभव झाल्यानंतर पाटील यांनी उद्धव ठाकरेंच्या भूमिकेवर टीकास्त्र डागलं. (Kapil Patil Criticized Uddhav Thackeray After jayant patil Defeated in Vidhan parishad election)

हे वाचलं का?

विधान परिषद निकालाबद्दल शनिवारी (१३ जुलै) माध्यमांशी संवाद साधताना भाष्य केले. कपिल पाटील म्हणाले, "शेतकरी कामगार पक्षाचे नेते जयंत पाटील यांचा पराभव धक्कादायक आहे. मुंबईत शिक्षक भरतीची जागा घेतली. राजू शेट्टी यांच्या विरोधात उमेदवार दिला आणि पराभव केला. भाजप पक्ष पळवतो, तुम्ही पण तसेच का वागत आहात?", असा सवाल कपिल पाटील यांनी केला.

हेही वाचा >> "ठाकरेंची दोन मते फुटली", भाजप नेत्याने टाकला राजकीय बॉम्ब 

पुढे ते म्हणाले, "डावे आणि वंचित पक्ष जवळ घ्यायचे आणि नंतर दूर लोटायचे. महाविकास आघाडीने निर्णय घ्यावा की, आम्हाला सोबत ठेवायचे की नाही?"

लोकसभा निकालाची हवा डोक्यात जाऊ देऊ नका -कपिल पाटील 

कपिल पाटील पुढे म्हणाले की, "छोट्या पक्षांनी महाविकास आघाडीला मदत केली. नारायण नागोजी पाटील हे प्रथम विधानसभा सदस्य होते. त्यांच्या नातवाला म्हणजे जयंत पाटलांना त्यांच्या शताब्दी अगोदर असे बाहेर काढणे चांगले नाही. ते सहज निवडून आले असते."

हेही वाचा >> "जे आमदार फुटले त्यांची नावे...", जितेंद्र आव्हाडांच्या पोस्टने खळबळ

"राजू शेट्टी यांनाही दूर केले आहे. गावित यांची फसवणूक केली. शिक्षक भारतीची जागा लाटली. उद्धव ठाकरेंनी सांगितले होते की, मुंबई शिक्षक मतदारसंघ तुमचा, मग ऐनवेळी असे का केले?", असा सवाल कपिल पाटील यांनी केला. "लोकांनी लोकसभा निवडणुकीत दिलेला निकाल डोक्यात जाऊ देऊ नका", असा इशाराही त्यांनी दिला.

विधान परिषद निवडणुकीतील विजयी उमेदवार

भाजप - पंकजा मुंडे, परिणय फुके, योगेश टिळेकर, अमित गोरखे, सदाभाऊ खोत.

शिवसेना - भावना गवळी, कृपाल तुमाने. राष्ट्रवादी काँग्रेस - राजेश विटेकर, शिवाजीराव गर्जे.

प्रज्ञा सातव (काँग्रेस), मिलिंद नार्वेकर (शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे).

    follow whatsapp