Kirit Somaiya : ‘नवीन पॉर्नस्टार गिरगीट सोमय्या’, व्हिडीओनंतर कल्याणमध्ये…

मुंबई तक

19 Jul 2023 (अपडेटेड: 19 Jul 2023, 06:58 AM)

किरीट सोमय्या व्हिडीओ प्रकरणावरून विरोधक भाजपला लक्ष्य करत असून, शिवसेनेने (युबीटी) मुंबईसह राज्यातील विविध भागात जोडे मारो आंदोलन केले. त्यानंतर आता काँग्रेसनेही सोमय्यांना घेरलं आहे.

congress put up banners against kirit somaiya in kalyan

congress put up banners against kirit somaiya in kalyan

follow google news

Kirit Somaiya Latest Video : माजी खासदार किरीट सोमय्या यांचे व्हिडीओ वृत्तवाहिन्या आणि सोशल मीडियावरून समोर आले. नको त्या अवस्थेतील व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर विरोधकांकडून भाजपचे नेते किरीट सोमय्या यांना लक्ष्य केलं जात आहे. शिवसेनेने (युबीटी) आंदोलन केल्यानंतर काँग्रेसने थेट बॅनर्स लावले आहेत. कल्याणमध्ये लावलेले बॅनर्स चर्चेचा विषय ठरले आहेत.

हे वाचलं का?

किरीट सोमय्या यांचे काही व्हिडीओ समोर आल्यानंतर राज्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. किरीट सोमय्या व्हिडीओ प्रकरणावरून विरोधक भाजपला लक्ष्य करत असून, शिवसेनेने (युबीटी) मुंबईसह राज्यातील विविध भागात जोडे मारो आंदोलन केले. त्यानंतर आता काँग्रेसनेही सोमय्यांना घेरलं आहे.

वाचा >> Kirit Somaiya : ‘महिलांना फोन करून…’, सोमय्यांच्या व्हिडीओवर अनिल परबांनी काय सांगितलं?

कल्याणमध्ये काँग्रेसच्या वतीने सोमय्यांचे बॅनर्स लावण्यात आले. व्हिडीओतील एक दृश्य या बॅनरवर आहे. त्याचबरोबर रंग बदलणाऱ्या सरड्याचाही फोटो आहे. या बॅनरवर ‘बेटी बचाव, बेटी पढावचा नारा देणारे भाजपचे लोकप्रिय नेते नवीन पॉर्न स्टार गिरगीट सोमय्या यांचा जाहीर निषेध’, असा मजकूर आहे.

कल्याणमधील छत्रपती शिवाजी महाराज चौकात हे बॅनर लावून किरीट सोमय्यांचा निषेध करण्यात आला आहे. कल्याण-डोंबिवली शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने हे बॅनर्स लावण्यात आले आहेत.

राष्ट्रवादी युवक काँग्रेसने पाठवले कपडे

राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने मुंबईतील राष्ट्रवादी भवनातून पॅन्ट, शर्ट आणि अंर्तवस्त्र पाठवण्यात आली. “एक हाथ मदतीचा… आपल्या किरीट सोमयाला… भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांचा नग्न (NUDE) व्हिडीओ न्यूज चॅनेलवर दाखवण्यात येत आहे. त्यातून त्यांची आर्थिक परिस्थिती वाईट असल्याने कपडे विकत घेऊ शकत नाही, असे लक्षात येते. म्हणून मुंबई प्रदेश राष्ट्रवादी युवक काँग्रेस सोमय्यांना पॅन्ट, शर्ट व अंतर्वस्त्र पाठवत आहोत. (अडचणीच्या वेळेत सर्वांनी पुढे येऊन सोमैयाजी ला कपडे देऊन मदत केली पाहिजे)”, अशा स्वरुपात राष्ट्रवादी युवक काँग्रेसने या प्रकरणावर टीका केलीये.

‘लंपट सोमय्या हाय हाय’

किरीट सोमय्या प्रकरणाचे पडसाद तिसऱ्या दिवशीही अधिवेशनात उमटले. विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यासह काँग्रेस, शिवसेना (युबीटी) आमदारांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन केले. यावेळी आमदारांनी किरीट सोमय्यांविरोधात घोषणा बाजी केली. ‘किरीट सोमय्या हाय हाय’, ‘लंपट सोमय्या हाय हाय’, ‘कलंकित सोमय्या हाय हाय’, ‘किरीट सोमय्याला संरक्षण देणाऱ्या भाजपाचा निषेध असो’, अशी घोषणाबाजी विरोधकांनी केली.

    follow whatsapp