79th Independence Day 2025: नवी दिल्ली: आज भारताचा 79 वा स्वातंत्र्यदिन हा संपूर्ण देशभरात मोठ्या थाटामाटात साजरा करत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतंच लाल किल्ल्यावरून राष्ट्रध्वज फडकवलं असून आता ते देशाला संबोधित करत आहेत. पंतप्रधान म्हणून स्वातंत्र दिनी केलेले हे मोदींचे 12 वं भाषण आहे. हा संपूर्ण सोहळा तुम्ही मुंबई Tak च्या यूट्यूब चॅनलवर LIVE पाहू शकता.
ADVERTISEMENT
सकाळी 7.30 वाजता या संपूर्ण सोहळ्याला सुरूवात झाली आहे. सुरुवातीला, सर्व पाहुण्यांचे सर्वांचे स्वागत करण्यात आले आणि त्यानंतर 21 तोफांची सलामी दिली गेली. त्यानंतर ध्वजारोहण होऊन राष्ट्रगीत झालं. यानंतर पंतप्रधान मोदी यांनी देशावासियांना उद्देशून भाषणास सुरुवात केली आहे.
हे ही वाचा>> 'जगातील कोणत्याही नेत्याने 'ऑपरेशन सिंदूर' बंद करा असं सांगितले नाही', पंतप्रधान मोदींनी स्पष्ट करून टाकलं
पंतप्रधान मोदींचं भाषण कुठे-कुठे पाहता येईल?
जर, तुम्हाला पंतप्रधान मोदींचे भाषण आणि स्वातंत्र्य दिनाचे समारंभ टीव्हीवर थेट पहायचे असतील मुंबई Tak च्या यूट्यूब चॅनलवर LIVE पाहू शकता. याशिवाय दूरदर्शनवरही हा सोहळा पाहता येईल. तसंच टाटा स्कायवरील चॅनेल क्रमांक 114 वर डीडी नॅशनल चॅनेल, सन डायरेक्टवरील चॅनेल क्रमांक 310, व्हिडिओकॉन डी2एच वर चॅनेल क्रमांक 127 आणि एअरटेल डी2एच वर चॅनेल क्रमांक 136 वर पाहू शकता.
ADVERTISEMENT
