Lok Sabha : शिंदेंना झटका तर ठाकरेंना मोठा दिलासा! 'या' पोलने ठरवलं कोण मारणार बाजी?

प्रशांत गोमाणे

12 Mar 2024 (अपडेटेड: 12 Mar 2024, 10:39 PM)

Uddhav Thackeray Vs Eknath Shinde : शिवसेनेच्या 2019 लोकसभेच्या निवडणुकीच्या मतांची टक्केवारी पाहिली असता, शिवसेनेला त्यावेळेस 23.5 टक्के मते मिळाली होती. मात्र आता पक्षफुटीनंतर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला 12.5 टक्के आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला 4.9 टक्के मतदान मिळणार आहे.

lok sabha election 2024 sakal media survay udhhav thackeray vs eknath shinde vote sharing percentage

लोकसभा निवडणुकीत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला 4.9 टक्के मतदान मिळणार आहे. तर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला 12.5 टक्के मतदान मिळणार आहे.

follow google news

Sakal Media Survay, Uddhav Thackeray Vs Eknath Shinde : महाराष्ट्रात लोकसभेच्या 48 जागांसाठी निवडणूक होणार आहे. यंदाच्या वर्षी ही निवडणूक खूपच रंगतदार असणार आहे.कारण भाजपने शिवसेना, राष्ट्रवादीसारखे दोन मोठे पक्ष फोडले आहेत. त्यामुळे या पक्षफुटीचा नेमका कुणाला फायदा होणार आहे? कुणाच मतदान घटणार आहे? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. या संदर्भातलाच एक  सर्वे समोर आला आहे. या सर्वेनुसार शिंदे (Eknath Shinde) गटाची डोकेदुखी वाढणार आहे. तर ठाकरेंना (Udhhav Thackeray) मोठा दिलासा मिळणार आहे.  (lok sabha election 2024 sakal media survay udhhav thackeray vs eknath shinde vote sharing percentage) 

हे वाचलं का?

एकनाथ शिंदे यांनी 40 आमदारांसह गुवाहाटी गाठून भाजपसोबत सत्तास्थापण केली होती. त्यामुळे महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचं सरकार कोसळलं होतं. या सर्व घडामोडीनंतर एकनाथ शिंदे यांनी आपणच खरी शिवसेना असल्याचा दावा केला होता. त्यानंतर निवडणूक आयोगाने आणि नंतर विधानसभा अध्यक्षांनी खरी शिवसेना म्हणून एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला मान्यता दिली होती. तसेच धनुष्यबाण चिन्ह देखील शिंदेंना देण्यात आले होते. आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नाव आणि मशाल हे चिन्ह देण्यात आलं होतं. 

हे ही वाचा : Lok Sabha : निवडणुकीत भाजपला बसणार मोठा झटका

सर्वेक्षणात कुणाला फायदा होणार?

सकाळ मीडिया ग्रुपने केलेल्या सर्वेनुसार, लोकसभा निवडणुकीत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला 4.9 टक्के मतदान मिळणार आहे. तर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला 12.5 टक्के मतदान मिळणार आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत शिंदेंची शिवसेना ठाकरेंपेक्षा 7.6 टक्के मतांनी मागे असण्याचा अंदाज आहे. 

दरम्यान जर शिवसेनेच्या 2019 लोकसभेच्या निवडणुकीच्या मतांची टक्केवारी पाहिली असता, शिवसेनेला त्यावेळेस 23.5 टक्के मते मिळाली होती. मात्र आता पक्षफुटीनंतर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला 12.5 टक्के आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला 4.9 टक्के मतदान मिळणार आहे.एकूणच दोन्ही शिवसेनेला मिळून 17.4 टक्के मतदान मिळणार आहे. त्यामुळे शिवसेनेच्या मताचा टक्का चांगलाच घटणार असल्याचे सर्वेतून समजते आहे. 

हे ही वाचा : Rahul Kaswan : भाजप खासदाराला काँग्रेसने दिले तिकीट, यादीत कुणाची नावे?

दरम्यान सकाळ माध्यमाने केलेल्या या सर्वेक्षणात महाराष्ट्रातील 48 लोकसभा, विधानसभा निहाय विभागून सर्वेक्षण करण्यात आले आहे. या अंतर्गत लिंग, वय, जात, धर्म, कुटुंबाची आर्थिक स्थिती, वेगवेगळे उत्पन्न गट, सरकारी योजनांचे लाभार्थी, नवं मतदार असे निकष निश्चित केले होते. तसेच सर्वेक्षणात 2024 च्या उमेदवारांबद्दल कल समजून घेण्यात आलेला नाही. मात्र सर्वेक्षण सध्याच्या खासदारांच्या कामगिरीबद्दल कल सांगणारे आहेत. 

    follow whatsapp