Lok Sabha : निवडणुकीत भाजपला बसणार मोठा झटका, NDAची झोप उडवणारा सर्व्हे

प्रशांत गोमाणे

ADVERTISEMENT

lok sabha election 2024 sakal media survey bjp nda vs india alliance what was public pole
सर्वेक्षणात भाजपप्रणित एनडीएला (NDA) मोठा धक्का बसला आहे. तर इंडिया (India) आघाडीला काहीसा दिलासा मिळालाय.
social share
google news

Sakal Survey 2024, NDA vs India : आगामी लोकसभा निवडणूक कोणत्याहीक्षणी लागण्याची शक्यता आहे. या निवडणुकीत भाजपप्रणित एनडीए आणि इंडिया आघाडी यांच्यात थेट लढत होणार आहे. तत्पुर्वी एक धक्कादायक सर्वे समोर आला आहे. या सर्वेक्षणात भाजपप्रणित एनडीएला (NDA) मोठा धक्का बसला आहे. तर इंडिया (India) आघाडीला काहीसा दिलासा मिळालाय. त्यामुळे नेमक्या सर्वेत काय आहे? हे जाणून घेऊयात.  (lok sabha election 2024 sakal media survey bjp nda vs india alliance what was public pole)  

ADVERTISEMENT

सकाळ मीडिया ग्रुपच्या वतीने एक सर्वेक्षण करण्यात आले आहे. या सर्वेक्षणात देशातील कोणत्या पक्षाला, किती लोकांची पसंती आहे. या संदर्भातला सर्वे केला गेला आहे. या सर्वेनुसार भाजपप्रणित एनडीएला 43. 3 टक्के लोकांची पसंती दर्शवली आहे. तर विरोधकांच्या इंडिया आघाडीला 45.7 टक्के लोकांनी पसंती मिळाली आहे.तसेच देशभरातील इतर पक्षांना म्हणजेच अपक्षांना 3.7 टक्के लोकांनी पसंती दिली आहेत. तर 10. 3 टक्के लोकांनी कोणत्याच पक्षाला निवडले नाही आहे. 

हे ही वाचा : वंचितला MVA दिल्या 'एवढ्या' जागा, राऊतांची थेट घोषणा

एकूणच या सर्वेक्षणातून भाजपला मोठा धक्का बसताना दिसतो आहे. कारण ए़नडीएला 43. 3 टक्के लोकांचीच पसंती आहे. तर विरोधकांच्या इंडिया आघाडीला आणि महाविकास आघाडीला 45.7 टक्के टक्के लोकांनी पसंती दर्शवली आहे. त्यामुळे इंडिया आघाडीला मोठा दिलासा मिळताना दिसतो आहे. जनतेने दिलेला कौल पाहता आगामी निवडणुकीत दोन्ही पक्षांमध्ये तगडी फाईट होण्याची शक्यता आहे. 

हे वाचलं का?

जनतेला कौल काय? 

एनडीए :  43. 3 टक्के 
इंडिया आघाडी : 45.7 टक्के 
अपक्ष : 3.7 टक्के 
कोणताच पक्ष नाही :  10. 3 टक्के 

हे ही वाचा : Rahul Kaswan : भाजप खासदाराला काँग्रेसने दिले तिकीट, यादीत कुणाची नावे?

दरम्यान सकाळ माध्यमाने केलेल्या या सर्वेक्षणात महाराष्ट्रातील 48 लोकसभा, विधानसभा निहाय विभागून सर्वेक्षण करण्यात आले आहे. या अंतर्गत लिंग, वय, जात, धर्म, कुटुंबाची आर्थिक स्थिती, वेगवेगळे उत्पन्न गट, सरकारी योजनांचे लाभार्थी, नवं मतदार असे निकष निश्चित केले होते. तसेच सर्वेक्षणात 2024 च्या उमेदवारांबद्दल कल समजून घेण्यात आलेला नाही. मात्र सर्वेक्षण सध्याच्या खासदारांच्या कामगिरीबद्दल कल सांगणारे आहेत. 

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT