मुंबई: महाराष्ट्रातील 29 महानगरपालिकांच्या दीर्घप्रतीक्षित सार्वत्रिक निवडणुकीसाठी सर्व यंत्रणा पूर्णपणे सज्ज झाल्या आहेत. आज (15 जानेवारी 2026) रोजी सकाळी 7.30 ते संध्याकाळी 5.30 वाजेपर्यंत राज्यभरात एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. मतमोजणी व निकाल शुक्रवार 16 जानेवारी 2026 रोजी जाहीर होतील.
ADVERTISEMENT
राज्यातील ही निवडणूक साधारण 5 वर्षांच्या प्रदीर्घ अंतरानंतर होत असून, मुंबईसह पुणे, ठाणे, नागपूर, नाशिक, छत्रपती संभाजीनगर आदी प्रमुख शहरांचा समावेश आहे. राज्य निवडणूक आयोगाने 15 डिसेंबर 2025 रोजी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला होता.
महाराष्ट्रातील 29 महानगरपालिकांमधील निवडणुकीचे LIVE UPDATE:
- कोल्हापूर महानगरपालिका
सकाळी 9:30 वाजेपर्यंत 9:64 टक्के मतदान
- उल्हासनगर महानगरपालिका निवडणूक
सकाळी 9 : 30 वाजेपर्यंत 4. 29 टक्के मतदान
- कल्याण डोंबिवली महानगरपालिका
सकाळी 9 : 30 वाजेपर्यंत 7.29 टक्के मतदान
- जालना शहर महानगरपालिका निवडणूक
सकाळी 9:30 वाजेपर्यंत मतदानाची टक्केवारी : 8.21 टक्के
- अमरावती महानगरपालिका
सकाळी 9:30 वाजेपर्यंत मतदानाची टक्केवारी : 6.6 टक्के
- अकोला महानगरपालिका निवडणूक
सकाळी 9:30 वाजेपर्यंत मतदानाची टक्केवारी : 6.48 टक्के
- परभणी महापालिका निवडणूक
सकाळी 9:30 वाजेपर्यंत 7.56 टक्के मतदान
- नागपूर शहर महानगरपालिका
सकाळी 9:30 वाजेपर्यंत मतदानाची टक्केवारी : 7 टक्के
- पिंपरी- चिंचवड महानगर पालिका
पहिल्या दोन तासांतील मतदान टक्के आकडेवारी 6:56 टक्के
- लातूर
सकाळी 7.30 ते 9.30 सरासरी 5.56% मतदान
- उल्हासनगर कॅम्प 5 मधील सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालयात या केंद्रावरील प्रकार
एक तासापासून ईव्हीएम मशीन बंद...
- नाशिक महानगरपालिका निवडणूक
सकाळी 7:30 ते 9:30 सरासरी 6.51 % मतदान
- अमरावती: शहरातील प्रभाग क्रमांक 7 पीडीएमसी जवाहर स्टेडियम परिसरातील गर्ल्स हायस्कूल मतदान केंद्र क्रमांक 23 येथे मतदानादरम्यान ईव्हीएम यंत्रात तांत्रिक बिघाड झाला. सकाळी साडेसात वाजता मतदानास सुरुवात झाल्यानंतर काही वेळातच ईव्हीएम मशीन अचानक बंद पडली.
- ठाणे: प्रभाग क्रमांक 13 काजूवाडी ठाणे महानगरपालिका शाळा क्रमांक 95/130 मतदाराने मत न टाकता त्याच्या अगोदर कोणीतरी बोगस मतदान करून गेले..
- पुणे
बंद पाडलेले EVM मशीन बदलण्यात आले
निवडणूक आयोगाचे इंजीनियर बंद पडलेले ईव्हीएम मशीन बदलण्यासाठी प्रभाग क्रमांक 26 मध्ये आले.
- जळगाव शहरात मतदान सुरू होण्यापूर्वी एका मतदान केंद्रावर काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. महानगरपालिका उर्दू शाळा क्रमांक 15 येथील मतदान केंद्रावर ईव्हीएम मशीन मांडणीचा क्रम चुकल्याचा आरोप उमेदवार प्रतिनिधींनी केला.
- जालन्याच्या प्रभाग क्रमांक दहा मधील एका मतदान केंद्रावर गोंधळ झाल्याचं पाहायला मिळालं. सरकारी कर्मचारी आपल्या आईचा, जी काँग्रेसकडून निवडणूक लढवत आहे ती मतदान केंद्रात प्रचार करत असल्याचा आरोप अपक्ष महिला उमेदवाराच्या पतीने केला आहे. मतदान केंद्रात येऊन संबंधित सरकारी कर्मचारी त्याच्या आईचा प्रचार करत असल्याचं लक्षात येताच, अपक्ष उमेदवाराच्या पतीने त्या कर्मचाऱ्याला मतदान केंद्राबाहेर ओढत नेलं.
- नागपूरच्या प्रभाग क्र. 28मधील आराधना नगर येथील जेआरके काॅन्व्हेंट मतदान केंद्रावरील मतदान ईव्हीएममधील तांत्रिक बिघाडामुळे उशिराने सुरू झाली. तेथील ईव्हीएम बदलण्यात आत्या नंतर 8.48 वाजता मतदान सुरू झाले.
-
पिंपरी- चिंचवडमध्ये नवी सांगवी येथील प्रभाग क्रमांक 31 मधील केंद्र क्रमांक 32 येथे ईव्हीएम मशीन अर्धा तास उशिरा सुरू झालं. त्यामुळे आमदार शंकर जगताप यांनी मतदारांसाठी अधिकचा वेळ मागितला आहे. तशी मागणी त्यांनी संबंधित निवडणूक अधिकाऱ्यांकडे केली आहे.
-
पुण्यात ईव्हीएम मशीन बंद
सेंट हिल्डज स्कूल गुरुवार पेठ अजून मतदान सुरू नाही
यंत्रे खराब बदलून देण्याची प्रक्रिया सुरू
मतदानाचा पहिला तास वाया
- महाराष्ट्रातील 29 महानगरपालिकांसाठी मतदान सुरू
मतदान केंद्रांवर कठोर सुरक्षा व्यवस्था असून, मोबाइल, कॅमेरा किंवा इलेक्ट्रॉनिक गॅझेट्स नेण्यास सक्त मनाई आहे. मतदानासाठी EPIC (वोटर आयडी), आधार कार्ड, पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसन्स इत्यादी ओळखपत्रे स्वीकारली जातील.
मतदानसाठी विशेष सुट्टी
मतदारांना मतदानाचा हक्क बजावता यावा म्हणून 15 जानेवारी 2026 ही तारीख संबंधित 29 महापालिका क्षेत्रांत सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. ही सुट्टी शासकीय, अर्धशासकीय कार्यालये, बँका, सार्वजनिक उपक्रम इत्यादींना लागू राहील.
या 29 महानगरपालिकांसाठी होणार मतदान
1. मुंबई महापालिका
2. ठाणे महापालिका
3. कल्याण-डोंबिवली महापालिका
4. नवी मुंबई महापालिका
5. पुणे महापालिका
6. उल्हासनगर महापालिका
7. वसई-विरार महापालिका
8. भिवंडी महापालिका
9. पनवेल महापालिका
10. मिरा-भाईंदर महापालिका
11. पिंपरी-चिंचवड महापालिका
12. नाशिक महापालिका
13. छ. संभाजीनगर महापालिका
14. कोल्हापूर महापालिका
15. सांगली-मिरज महापालिका
16. सोलापूर महापालिका
17. मालेगाव महापालिका
18. अहिल्यानगर महापालिका
19. जळगाव महापालिका
20. धुळे महापालिका
21. इचलकरंजी महापालिका
22. नांदेड महापालिका
23. परभणी महापालिका
24. जालना महापालिका
25. लातूर महापालिका
26. नागपूर महापालिका
27. अमरावती महापालिका
28. अकोला महापालिका
29. चंद्रपूर महापालिका
मतदारांसाठी उपयुक्त सूचना
आपले नाव मतदार यादीत आहे की नाही हे ‘मताधिकार’ अॅप किंवा राज्य निवडणूक आयोगाच्या वेबसाइटवर तपासा. मतदान केंद्र, उमेदवारांची यादी आणि इतर माहिती अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध.
ADVERTISEMENT










