काँग्रेसमधील मरगळ ते सरकारच्या दाव्यांची चिरफाड, सतेज पाटलांची सडेतोड मुलाखत

मुंबई तक

• 10:28 AM • 03 Jul 2026

आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांमधील मरगळ कशी झटकली जाणार? काँग्रेसचं पुढचं भविष्य नेमकं काय आहे? महाराष्ट्राच्या विकासासाठी काँग्रेसचा अजेंडा नेमका काय आहे? याबद्दल मुंबई Tak बैठकमध्ये काँग्रेसचे नेते सतेज पाटील यांनी रोखठोक भूमिका मांडली.

Satej Patil Interview

Satej Patil Interview

Google CTA

बातम्या हायलाइट

point

काँग्रेसमधील मरगळ ते सरकारच्या दाव्यांची चिरफाड

point

सतेज पाटलांची सडेतोड मुलाखत

Satej Patil Interview : "सध्याच्या राजकीय पटलावर भाजपचे आव्हान किंवा एकनाथ शिंदेंचे अस्तित्व यापेक्षाही महाराष्ट्राची विसकटलेली आर्थिक, औद्योगिक आणि सामाजिक परिस्थिती हे आमच्यासमोरील सर्वात मोठे आव्हान आहे. तामिळनाडू आज औद्योगिक विकासात आपल्यापुढे गेला आहे, तर आर्थिक पाहणीनुसार लोक शेतीपासून दूर जात आहेत, ज्यामध्ये महाराष्ट्राचा वाटा मोठा आहे. राज्याला पुन्हा स्वकर्तृत्वावर उभे करणे हेच आमचे मुख्य उद्दिष्ट आहे," असे ठाम प्रतिपादन काँग्रेसचे नेते सतेज पाटील यांनी केले. 'मुंबई Tak बैठक 2026' या विशेष कार्यक्रमात ते बोलत होते.

हे वाचलं का?

निधावाटपाबाबत चुकीचा ट्रेंड

निधी वाटपातील पक्षपातीपणा आणि प्रशासकीय कोंडी राज्यातील सध्याच्या राजकीय स्थित्यंतरावर आणि फोडाफोडीवर बोलताना सतेज पाटील यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. "ज्या लोकप्रतिनिधींनी विशिष्ट विचारधारेवर मत मागितले, त्यांनी पक्ष सोडण्यापूर्वी राजीनामा द्यायला हवा होता. 'विकासकामांसाठी किंवा निधी अभावी सत्तेसोबत गेलो' हा पक्षांतर करणाऱ्यांचा युक्तिवाद साफ चुकीचा आहे. विरोधी पक्षात राहूनही संघर्ष करून मतदारसंघाचा विकास करता येतो, याचे उत्तम उदाहरण गणपतराव देशमुख आहेत," असे ते म्हणाले. गेल्या 15 वर्षांत विरोधी आमदारांची कोंडी करण्याचा एक चुकीचा ट्रेंड सुरू झाला असून, सध्या केवळ सत्ताधारी आमदारांनाच निधी दिला जात आहे. दुर्दैवाने आता प्रशासनही सत्ताधाऱ्यांच्या दबावाखाली चुकीचे काम करू लागले आहे, असा आरोप त्यांनी केला.

हे ही वाचा : मुंबईकरांनो सावधान, पावसाची बॅटिंग सुरुच, पुढील 3 तास महत्त्वाचे, IMD चा इशारा

'तरुणांना 5 हजार रुपयांचा स्टायपंड द्या'

शक्तीपीठ महामार्गापेक्षा तरुणांच्या रोजगाराला प्राधान्य द्या सरकारच्या पायाभूत सुविधांच्या दाव्यांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत पाटील यांनी शक्तीपीठ महामार्गाच्या उपयुक्ततेवर टीका केली. "1 लाख 5 हजार कोटी रुपये एका रस्त्यावर खर्च करण्यापेक्षा बेरोजगार तरुणांना नोकरी लागेपर्यंत दरमहा 5 हजार रुपयांचा स्टायफंड द्या. छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेता, तर प्रत्येक गडकिल्ल्याला 500 कोटी रुपये द्या. राज्यातील 21 हजार गावांमध्ये अजूनही चांगले रस्ते नाहीत, तिथे निधी द्या," अशी मागणी त्यांनी केली. महामार्गांमुळे केवळ दळणवळण वेगवान होते, त्यातून शाश्वत रोजगार निर्माण होत नाही, असे सांगत त्यांनी सरकारला आयटी पार्क उभारून नव्या कंपन्यांना सवलतीच्या दरात जागा देण्याचा सल्ला दिला, ज्यामुळे हजारो तरुणांना थेट रोजगार मिळेल.

हे ही वाचा : Maharashtra weather : कोकणासह राज्यभरात धो-धो पाऊस, 'या' जिल्ह्यांना मोठा अलर्ट

भाजपचे हिंदुत्व द्वेष पसरवणारे

भाजपचे द्वेष पसरवणारे हिंदुत्व आणि तरुणांचे मूलभूत प्रश्न भाजपच्या हिंदुत्वाच्या नरेटिव्हवर बोलताना ते म्हणाले, "आमचे हिंदुत्व 'सर्वधर्मसमभाव' मानणारे आणि सर्वांना सोबत घेणारे आहे, तर भाजपचे हिंदुत्व द्वेष पसरवणारे आहे. आजच्या सुशिक्षित तरुणांना जाती-धर्माच्या राजकारणात रस नसून त्यांना बेरोजगारी आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) मुळे नोकऱ्यांवर येणारे संकट या मूलभूत प्रश्नांवर चर्चा हवी आहे."

हे ही वाचा : नवी मुंबई : 'चुकीचे इंजेक्शन'ने 2 गर्भवती महिलांचा मृत्यू? मनसे आक्रमक अन् पहिली कारवाई

'तर दुधात साखर'

काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार गट) काँग्रेसमधील विलीनीकरणाच्या चर्चेवर बोलताना पाटील म्हणाले की, हा निर्णय दिल्ली पातळीवर (हायकमांड) होऊ शकतो; परंतु दोन्ही पक्षांची विचारधारा एकच असल्याने जर हे घडले, तर महाराष्ट्राच्या दृष्टीने ते 'दुधात साखर' ठरेल. तसेच, काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांच्या कामाचे कौतुक करत त्यांनी स्पष्ट केले की, सत्ता नसताना निकाल देणे अवघड असते, तरीही ते ग्राउंड वर्क करत आहेत. आम्ही सर्वांनी एक सक्षम इकोसिस्टीम तयार करून पक्षाच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे, असा विश्वास त्यांनी शेवटी व्यक्त केला.