Mamata Banerjee : ‘INDIA’ आघाडी फुटली! ममता बॅनर्जींनी सोडली साथ

प्रशांत गोमाणे

24 Jan 2024 (अपडेटेड: 24 Jan 2024, 08:50 AM)

ममता बॅनर्जी यांनी जागावाटपाबाबत काँग्रेसला काही बदल सुचवले होते. या बदलांना काँग्रेसकडून थेट नकार देण्यात आला होता. त्यामुळे आम्ही स्वबळावर निवडणूक लढवणार असल्याची घोषणा ममता बॅनर्जी यांनी केली आहे.

mamata banerjee india alliance west bengale loksabha election 2024 tmc and congress seat rahul gandhi

mamata banerjee india alliance west bengale loksabha election 2024 tmc and congress seat rahul gandhi

follow google news

Mamata Banerjee, India Alliance : आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वीच इंडिया आघाडीला मोठा धक्का बसला आहे. कारण विरोधकांच्या इंडिया आघाडीचा भाग असलेल्या पश्चिम बंगालमच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी स्वबळावर निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे. काँग्रसने (Congress) टीएमसीचा (Tmc) प्रस्ताव मान्य न केल्यामुळे हा निर्णय घेतल्याचे ममता बॅनर्जी यांनी सांगितले आहे. दरम्यान लोकसभेच्या (Loksabha Election) तोंडावर ममता बॅनर्जी आघाडीतून बाहेर पडल्या असल्याने इंडिया आघाडीचे गणित बिघडण्याची शक्यता आहे. (mamata banerjee india alliance west bengale loksabha election 2024 tmc and congress seat rahul gandhi)

हे वाचलं का?

काँग्रेस आणि ममता बॅनर्जी यांच्या टीएमसी पक्षात जागावाटपावरून चर्चा सुरू होती. या जागावाटपावरून दोन्ही पक्षात वादविवादही झाल्याची दबक्या आवाजात चर्चा होती. त्यात ममता बॅनर्जी यांनी जागावाटपाबाबत काँग्रेसला काही बदल सुचवले होते. या बदलांना काँग्रेसकडून थेट नकार देण्यात आला होता. त्यामुळे आम्ही स्वबळावर निवडणूक लढवणार असल्याची घोषणा ममता बॅनर्जी यांनी केली आहे.

हे ही वाचा : Rohit Pawar ईडीसमोर हजर, सुप्रिया सुळेंनी संसदेतला ‘तो’ अधिकृत अहवालच सांगितला

ममता बॅनर्जींनी यावेळी राहुल गांधी यांचे नाव न घेता त्यांच्यावर निशाणा देखील साधला. ते पश्चिम बंगालची यात्रा करणार आहेत. या यात्रेची माहिती शिष्टाचार म्हणून देखील आम्हाला देण्यात आली नाही, अशी नाराजी देखील ममता बॅनर्जी यांनी व्यक्त केली. या सर्व गोष्टींना घेऊन आमच्यासोबत काहीच चर्चा करण्यात आली नाही. हे पूर्ण चुकीचे असल्याचे मत ममता बॅनर्जी यांनी व्यक्त केले.

हे ही वाचा : Ram Mandir : राऊतांनी फडणवीसांना पुन्हा डिवचलं, ‘ते कुठल्याही स्टेशनला फोटो…’

ममता बॅनर्जी यांनी इंडिया आघाडीचे नेतृत्व काँग्रेसकडे सोपवण्यावरून देखील अनेक प्रश्न उपस्थित केले होते. तसेच ममता बॅनर्जींच्या तृणमुल काँग्रेस पक्षाने काँग्रेसला फक्त दोन जागा देणार असल्याचे सांगितले होते. कारण 2019 च्या लोकसभा निवडणुकीत पश्चिम बंगालच्या 42 जागांमध्ये काँग्रेसला फक्त 2 च जागा जिंकता आल्या होत्या. यावर पश्चिम बंगालचे काँग्रेसचे अध्यक्ष अधीर रंजना चौधरी यांनी आम्हाला टीएमसीकडून कुठली भीक नको आहे, अशी टीका केली होती.

दरम्यान भाजपचा पराभव करण्यासाठी देशभरातील विरोधी पक्ष इंडिया आघाडीच्या बॅनरखाली एकत्र आले होते. या इंडिया आघाडीच्या अनेक बैठका देखील पार पडल्या होत्या. या बैठकानंतर आता जागावाटपाबाबत इंडिया आघाडीत चर्चा सूरू होती. या चर्चा सूरू असताना आता ममता बॅनर्जी यांनी इंडिया आघाडीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे इंडिया आघाडीला मोठा धक्का बसला आहे.

    follow whatsapp