“जर फाशी घेण्याची वेळ आली तरी…”, जरांगेंसोबतच्या चर्चेत जिल्हाधिकारी नेमकं काय म्हणाल्या?

मुंबई तक

02 Sep 2026 (अपडेटेड: 02 Sep 2026, 03:30 PM)

Manoj Jarange Patil and Collector Ashima Mittal disscution : अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणादरम्यान जालन्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी मध्यरात्री त्यांची भेट घेतली. या चर्चेत “जर फाशी घेण्याची वेळ आली तरी मला चालेल” असं जिल्हाधिकारी म्हणाल्या. नेमकं काय घडलं? या संपूर्ण चर्चेचा याचा तपशील समोर आला आहे.

Manoj Jarange Patil and Collector Ashima Mittal disscution :

Manoj Jarange Patil and Collector Ashima Mittal disscution :

Google CTA

बातम्या हायलाइट

point

“जर फाशी घेण्याची वेळ आली तरी…”

point

जरांगेंसोबतच्या चर्चेत जिल्हाधिकारी नेमकं काय म्हणाल्या?

Manoj Jarange Patil and Collector Ashima Mittal disscution : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा आमरण उपोषणाला बसले आहेत. जालन्यातील अंतरवाली सराटी येथे सुरू असलेल्या या उपोषणादरम्यान जालन्याच्या जिल्हाधिकारी  अशीमा मित्तल  मध्यरात्री जरांगे पाटील यांची भेट घेण्यासाठी पोहोचल्या. यावेळी त्यांनी जरांगे पाटील यांच्याशी चर्चा करून त्यांच्या मागण्यांवर मार्ग काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, मध्यरात्री झालेली ही चर्चा निष्फळ ठरली. या चर्चेदरम्यान नेमकी काय चर्चा झाली, याचा तपशील आता समोर आला आहे.

हे वाचलं का?

हेही वाचा : शाहापूरमध्ये आश्रम शाळेतील 22 विद्यार्थिनींवर कर्मचाऱ्याकडून विनयभंग, आरोपीला अटक

मी नंतर सरकू देणार नाही, जरांगे जिल्हाधिकाऱ्यांना काय म्हणाले? 

चर्चेदरम्यान जिल्हाधिकाऱ्यांनी जरांगे पाटील यांना शिष्टमंडळासोबत चर्चा करून सर्व गोष्टी समजून घेण्याची भूमिका मांडली. त्यावर जरांगे पाटील यांनी हा विषय आपलं काम नसल्याचं सांगितलं. यावेळी त्यांनी काही मंत्र्यांबाबत तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली. “चांगल्या चांगल्या मंत्र्यांना फाशी घ्यायची वेळ येईल. तुम्हाला त्यांची बाजूच घ्यायची असेल तर मी चर्चेला तयार आहे. यावर तुम्ही एकदा विचार करा, मी नंतर सरकू देणार नाही” असं जरांगे पाटील म्हणाले. त्यावर जिल्हाधिकाऱ्यांनी आपण चर्चेसाठी तयार असल्याचं सांगितलं. मात्र, आपलं काम आणि आपली भूमिका याबाबतही त्यांनी जरांगे पाटील यांच्यासमोर स्पष्टपणे भूमिका मांडली.

हेही वाचा : 'आमच्या ग्रुपमध्ये सामील हो..', तृतीयपंथीयाने तरुणाच्या प्रायव्हेट पार्टवर ब्लेडने वार केल्याचा आरोप

"जर फाशी घेण्याची पण वेळ आली तरी मला चालेल"

“मनोजजी, नोकरी करताना जर फाशी घेण्याची पण वेळ आली तरी मला चालेल, पण मला माझं काम करू द्या,” अशा शब्दांत जिल्हाधिकारी  अशीमा मित्तल यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. आपण जिल्हाधिकारी म्हणून इथे बसलो आहोत आणि आपलं काम पार पाडणं ही आपली जबाबदारी असल्याचं त्यांनी सांगितलं. यावेळी जरांगे पाटील यांनी जिल्हाधिकाऱ्यांना ताई म्हणून संबोधत आपलं म्हणणं समजून घेण्याची विनंती केली. एखादा प्रश्न सुटला तर त्यासाठी आपण चर्चा करत असल्याचंही त्यांनी सांगितलं.

या चर्चेदरम्यान जरांगे पाटील यांनी मंत्र्यांच्या शिक्षणावर आणि त्यांच्या कामकाजावरही टीका केली. तुम्ही अधिकारी अभ्यास करून मोठे झालेले लेकरं आहेत. आणि ते चौथीपर्यंत शिक्षण घेतलेले मंत्री तुम्हाला शिकवत आहेत. तुम्हाला आडमुठ्यांचं ऐकावं लागतयं, असंही जरांगे म्हणाले. यावेळी  महाराष्ट्रात अशा आमदार-खासदारांचाही उल्लेख करत आपला रोष व्यक्त केला. सर्व मागण्यांची अंमलबजावणी केल्याशिवाय संबंधित व्यक्ती ऐकणार नाही अशी भूमिका तुम्ही सरकारकडे मांडा, असं मनोज जरांगेंनी अधिकाऱ्यांना सांगितलं.