'जामीन घेऊ नका, गपागपा सगळं सोडून तिकडं ठेप्याला या'

मुंबई तक

• 08:51 AM • 01 Sep 2026

Manoj Jarange Patil : मनोज जरांगे पाटील यांनी 12 तारखेला मुंबईकडे जाण्याची घोषणा करत मराठा समाजाला टप्प्याटप्प्याने मुंबईत पोहोचण्याचे आवाहन केले. मुंबईतील मित्र, पाहुणे आणि ओळखीच्या व्यक्तींकडे आधीच राहण्याची व्यवस्था करण्याची सूचना त्यांनी केली.

Manoj Jarange Patil

Manoj Jarange Patil

Google CTA

बातम्या हायलाइट

point

'जामीन घेऊ नका, गपागपा सगळं सोडून तिकडं ठेप्याला या'

point

मनोज जरांगे पाटलांचा मुंबईच्या आंदोलनासाठी गनिमी कावा

Manoj Jarange Patil Press Conference, जालना : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी 12 तारखेला मुंबईला जाणार असल्याचे जाहीर केले आहे. तोपर्यंत सरकारने मागण्या मान्य केल्या नाहीत, तर मराठ्यांनी मुंबईत जाण्यास सुरुवात करावी, असे आवाहन त्यांनी केले. मात्र, सर्वांनी एकाच वेळी मुंबईकडे न जाता 12 तारखेच्या दोन ते चार दिवस आधीपासून टप्प्याटप्प्याने मुंबईकडे जाण्याची सूचना जरांगे यांनी केली. आधी मुंबईत पोहोचणारे लोक नंतर आझाद मैदानावर येतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.

हे वाचलं का?

हेही वाचा : गाडी शिकवण्याच्या बहाण्याने 17 वर्षीय मुलीचा विनयभंग, लोकांनी आरोपीचा टक्कल करत फिरवलं

मनोज जरांगेंनी आंदोलकांना सांगितला गनीमी कावा 

जरांगे यांनी सांगितले की, 5-6 तारखेनंतर हळूहळू मुंबईकडे निघावे आणि प्रवासादरम्यान कोणालाही संशय येऊ नये, याची काळजी घ्यावी. मुंबईकडे जाणाऱ्यांनी झेंडे बांधून जाऊ नयेत, असेही त्यांनी म्हटले. पोलिसांनी अडवून पोलीस ठाण्यात नेले, तरी घाबरू नका, असे आवाहन करत त्यांनी पोलिसांना त्रास न देण्याची सूचनाही केली. आंदोलनासाठी मुंबईत जाणाऱ्या लोकांनी आधीच मित्र, पाहुणे आणि ओळखीच्या व्यक्तींकडे राहण्याची व्यवस्था शोधून ठेवावी, असे त्यांनी सांगितले.

हेही वाचा : गाडी शिकवण्याच्या बहाण्याने 17 वर्षीय मुलीचा विनयभंग, लोकांनी आरोपीचा टक्कल करत फिरवलं

अंतरवाली सराटीतील गर्दी हळूहळू कमी करून मुंबईकडे जाण्याचे आवाहन

मुंबईत मराठा समाजाचे अनेक लोक राहत असल्याचे सांगत जरांगे यांनी त्यांच्याकडे जाऊन राहण्याचे आवाहन केले. मुंबई, नवी मुंबई, पनवेल, कल्याण, भिवंडी आणि ठाणे परिसरात मोठ्या प्रमाणात लोक असल्याचे त्यांनी नमूद केले. प्रत्येक ठिकाणी आधी पोहोचून राहण्याची व्यवस्था करावी आणि योग्य पत्ता मिळवावा, असे त्यांनी सांगितले. आझाद मैदानावर सर्वांनी एकाच वेळी जाण्याऐवजी वेगवेगळ्या ठिकाणी राहण्यावर त्यांनी भर दिला. सरकारला आंदोलनाची गर्दी मुंबईकडे गेल्याचे जाणवावे, यासाठी अंतरवाली सराटीतील गर्दी हळूहळू कमी करून मुंबईकडे जाण्याचे आवाहन त्यांनी केले.

गणपतीच्या काळात मुंबईकडे जाणाऱ्यांनी गणेश दर्शनाचा आधार घेत हळूहळू पुढे जावे, असेही जरांगे यांनी सांगितले. सिद्धिविनायकासह गणेश दर्शनासाठी जाताना पाहुणे-रावळ्यांकडे राहण्याची व्यवस्था करावी, असे त्यांनी म्हटले. 7 तारखेपासून मुंबईकडे जाण्यास सुरुवात करा आणि अंतरवाली सराटीतील गर्दी कमी करा, असे आवाहन त्यांनी केले. सरकार चर्चेसाठी आले, तर चर्चेबाबतही त्यांनी भूमिका मांडली. अंतरवाली सराटी येथेच चर्चा होण्याची शक्यता असल्याचे सांगत मुंबईत जाऊन चर्चेचे काय करायचे, असा सवाल त्यांनी केला. मात्र सरकारकडून चर्चा करण्यासाठी प्रयत्न झाले आणि ते स्वतः आले, तर चर्चा होऊ शकते, असेही त्यांनी स्पष्ट केले.