Manoj Jarange Patil Press Conference: मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांना जीवे मारण्यासाठी तब्बल दोन कोटी रुपयांची सुपारी दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. या प्रकरणी जालना स्थानिक गुन्हे शाखेने बीड जिल्ह्यातील दोघांना ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली होती. या प्रकरणामुळे, मराठा आंदोलनाच्या कार्यकर्त्यांमध्ये संतापाचं वातावरण पाहायला मिळतंय. दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषदेत या सगळ्या प्रकरणाबाबत आपलं व्यक्त केलं आहे.
ADVERTISEMENT
या घटनेबाबत बोलताना जरांगे म्हणाले की, "मी मराठी समाजाला शांत राहण्याची विनंती केली. आपले सुद्धा हात खूप लांब आहेत आणि हे त्यांना समजलं असेल. खरं तर, सगळ्यांनी सावध राहण्याची गरज आहे. पण, मी जोपर्यंत जीवंत आहे, तोपर्यंत तुम्हाला टेन्शन नाही. आपण त्यांचे सगळे डाव उघडे पाडले आहेत. सगळा नायनाट होणारच आहे. यावरून, खरं काय आहे हे सगळ्यांनाच माहितीये. आम्हाला कळालेली नावे आम्ही पोलीस प्रशासनाला सांगितली. या प्रकरणात दोन आरोपींना अटक केली आहे, एवढंच मी सांगतो. या प्रकरणात 11-12 जणं आहे. पैसे कमवण्याच्या नादात कोणत्या थराला जाताय, हे लक्षात ठेवा."
पुढे बोलताना ते असंही म्हणाले की, "बीडचा कांचन नावाचा एक माणूस आहे, जो धनंजय मुंडेचा कार्यकर्ता किंवा पीए आहे. तो माणूस त्या दुसऱ्या आरोपीकडे गेला. खरं तर, खोटे रकॉर्डिंग बनवा, खोटे व्हिडीओ बनवा, हे त्यांचं पहिलं काम होतं. मग, ते दुसऱ्या मुद्द्यावर आले खूनच करायचा आणि तिसरा मुद्दा म्हणजे गोळ्या देऊन किंवा औषध देऊन मग घातपात करू."
"त्या दिवशी, त्या धनंजय मुंडेच्या कार्यकर्त्याने दुसऱ्या आरोपीला सोबत घेतलं आणि परळीला रेस्टहाऊसमध्ये नेलं. तिथे मोठी बैठक सुरू होती. आणि हा माणूस आल्याचं कळताच धनंजय मुंडेने बैठक सोडून 15-20 मिनिटे त्या आरोपीला दिली. तिथे एक आधीच एक दुसरा माणूस होता. तो बाहेर आल्यानंतर तो आरोपी म्हणाला शोधावं लागेल, तेव्हा दुसरा म्हणाला माझ्याकडे आहे मोठं. त्यानंतर, इकडे आल्यावर 2 कोटी आणि 50 लाख एक्स्ट्रा असं त्यांनी ठरवलं होतं. धनंजय मुंडे त्यांना प्रत्यक्ष भेटलेला आणि त्याने नेमकं काय करायचं ते सांगितलं. मग, काहीच जुळेना म्हणून संभाजीनगरच्या झाल्टा फाट्याला धनंजय मुंडे पुन्हा त्यांना भेटायला गेला. तिथे त्याने दोघांची 1 तास वाट पाहत होता. त्यावेळी, त्यांच्यात बोलणं झालं आणि मी करतो व्यवस्था असं म्हणाला आणि ते निघाले. यानंतर, त्यांच्यात सतत बोलणं व्हायचं."
"मग, सह्याद्री रेस्ट हाऊससमोर कोणतंतरी निकेतन बीडी येथे भाऊबीजेच्या दिवशी, त्याने हा कट शिजवला. यात बरेच जणं आहेत. 10-11 जणांचा हा ग्रुप आहे. आरोपी म्हणाले, तुम्ही आम्हाला गाडी घेऊन घ्या. धनंजय मुंडे म्हणाला, नवी गाडी देण्यापेक्षा राज्याच्या पासिंगची गाडी देतो. पुढे काय घडलं? याबद्दल सुद्धा आमच्याकडे माहिती आहे. पण, आता पोलिसांच्या तपासात ते सगळं उघडकीस येईल. तोवर मी सर्व मराठा बांधवांना शांत राहण्याची विनंती करतो."
सर्वच राजकीय नेत्यांनी हा विषय गांभीर्याने घेतला पाहिजे. माझ्यावर आलेली वेळ ही तुमच्यावर सुद्धा येऊ शकते."
ADVERTISEMENT











