मुंबई TAK बैठक : भाजप की शिंदे… BMC मध्ये महापौर कुणाचा? अतुल भातखळकरांचं उत्तर

मुंबई तक

13 Apr 2023 (अपडेटेड: 13 Apr 2023, 07:33 AM)

मुंबई महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अतुल भातखळकर आणि सचिन अहिर यांची मुंबई TAK बैठकीमध्ये उपस्थितीमध्ये

MLA Atul Bhatkhalkar and Sachin Ahir present in Mumbai TAK Baithak in the wake of the Mumbai Municipal Elections

MLA Atul Bhatkhalkar and Sachin Ahir present in Mumbai TAK Baithak in the wake of the Mumbai Municipal Elections

follow google news

मुंबई : महापालिकेत दिडशे जागा भाजप, शिवसेना आणि अन्य मित्र पक्षांनी मिळून जागा जिंकून आणण्याचा निर्धार आहे. किमान दिडशे जागा जिंकण्याच ध्येय आहे. महायुती हेच कमळ आहे. महापौर कोणाचा यापेक्षा मुंबईकरांचे प्रश्न सुटण गरजेचं आहे. आमची महायुती पूर्ण बहुमताने सत्तेत येईल, असा आशावाद भाजपचे आमदार अतुल भातखळकर (Atul Bhatkhalkar) यांनी मुंबई TAK बैठकमध्ये व्यक्त केला. यावेळी शिवसेना (UBT) आमदार सचिन अहिर (Sachin Ahir) हेही व्यासपीठावर उपस्थित होते. (MLA Atul Bhatkhalkar and Sachin Ahir present in Mumbai TAK Baithak in the wake of the Mumbai Municipal Elections)

हे वाचलं का?

राज्यातील राजकारणातील दिग्गज आणि सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये ‘मुंबई Tak बैठक’ पार पडत आहे. यात सकाळी 9 वाजता महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये पहिले सत्र पार पडले. त्यानंतर मुंबई महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अतुल भातखळकर आणि सचिन अहिर यांच्या उपस्थितीमध्ये दुसरे सत्र पार पडले. मुंबईतील सध्याच्या राजकीय घडामोडी, मुंबईचा विकास, मुंबईपुढील प्रश्न आणि भविष्यातील मुंबईची वाटचाल याबाबत समजून घेण्यासाठी या दोन्ही मान्यवरांचे सत्र महत्वाचे ठरले.

यावेळी बोलताना अतुल भातखळकर काय म्हणाले?

कोविड काळात उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे कुठे होते? त्यांचा फोटो दाखवा. भाजपचे कार्यकर्ते फिल्डवर होते. भाजपच्या कार्यकर्त्यांचा कोविड काळात फिल्डवर काम करताना मृत्यू झाला. दुखःच्या प्रसंगात राजा जनतेसोबत पाहिजे. पण राजाने मुंबईकरांना वाऱ्यावर सोडलं. आज मुंबईतील आरोग्य स्थिती काय आहे? हॉस्पिटल्सचा विचार करायचा म्हटलं तर केईएम आणि सायन हॉस्पिटल समोर येतात. पण मुंबई महापालिकेशी संबंधित इतर हॉस्पिटल्सच काय? महापालिकेने मागील 30 वर्षांमध्ये हे हॉस्पिटल्स विकसित का केली नाहीत? स.का. पाटील रुग्णालयाची जागा 7 एकर आहे. पण ते रुग्णालय किती लोकांना माहित आहे? बीएमसीच्या कारभारात आमुलाग्र बदलाची गरज आहे असं मतं यावेळी त्यांनी व्यक्त केली.

लोकचं आम्हाला पुन्हा संधी देतील : सचिन अहिर

लोकांनी ठाकरेंच्या शिवसेनेला पुन्हा निवडून का द्याव, याबाबत बोलताना सचिन अहिर म्हणाले, आम्ही केलेलं काम लोकांच्या समोर आहे. त्यामुळे लोकं आम्हाला पुन्हा संधी देतील. मुंबई महापालिकेचं कोविड काळात जगभर कौतुक झालं. त्यामुळे योग्यवेळी लोकांसमोर जाऊ त्यावेळी लोक आम्हाला साथ देतील. कोविडच्या काळात कोण कुठे होतं हे लोकांना माहित आहे.

सर्वच जबाबदाऱ्या मुंबई महापालिकेवर टाकून चालणार नाही : सचिन अहिर

म्हाडा, एएमएमआरडीए, एमएसआरडीसी, सार्वजनिक बांधकाम विभाग आहे. त्यातून मुलभूत सुविधा देण्याची जबाबदारी मुंबई महापालिकेची आहे. त्यामुळे मुंबईतील सर्वच गोष्टींसाठी महापालिकेला जबाबदार धरता येणार नाही. पण त्यातही मुंबईतील आरोग्य सुविधांचा चेहरा-मोहरा बदलत आहे. शिक्षणाचे स्वरुप बदलत आहे. ४ हजार जागांसाठी ४० हजार अर्ज येत आहे.

    follow whatsapp