MLA Disqualification: ‘ठाकरेंचा ‘तो’ व्हिप बोगस, खोटा..’, शिंदेंच्या वकिलांचा खळबळजनक आरोप

ऋत्विक भालेकर

• 03:43 PM • 22 Nov 2023

Mahesh Jethmalani: आमदार अपात्रता सुनावणीनंतर शिंदे गटाचे वकील महेश जेठमलानी यांनी असा आरोप केला आहे की, शिवसेनेने बजावलेला व्हिप हा खोटा होता.

mla disqualification case whip issued by thackeray group mla sunil prabhu on 21 june 2022 is bogus and fake shinde group lawyer mahesh jethmalani sensational allegation

mla disqualification case whip issued by thackeray group mla sunil prabhu on 21 june 2022 is bogus and fake shinde group lawyer mahesh jethmalani sensational allegation

follow google news

MLA Disqualification Hearing on Whip: मुंबई: शिवसेनेच्या आमदार अपात्रतेची सलग दुसऱ्या दिवशी सुनावणी पार पडली. या सुनावणीनंतर शिंदे गटाचे वकील महेश जेठमलानी यांनी अत्यंत गंभीर आणि खळबळजनक दावा ठाकरे गटाविरोधात केला आहे. ज्या व्हिपच्या आधारे शिवसेना (UBT) ने शिंदेंच्या आमदारांना अपात्र करण्याची मागणी केली आहे तो व्हिपच खोटा आणि बनावट असल्याचा आरोप जेठमलानी यांनी केला आहे. (mla disqualification case whip issued by thackeray group mla sunil prabhu on 21 june 2022 is bogus and fake shinde group lawyer mahesh jethmalani sensational allegation)

हे वाचलं का?

महेश जेठमलानी यांनी शिवसेनेचे प्रतोद सुनील प्रभू यांची आज (22 नोव्हेंबर) उलटतपासणी घेतली. ज्यावेळी त्यांनी प्रभूंना व्हिपवरून वेगवेगळे सवाल विचारणं सुरू केलं. दरम्यान, सुनावणी संपल्यानंतर माध्यमांशी बोलताना जेठमलानी म्हणाले की, हा व्हिपच खोटा आहे. पाहा महेश जेठमलानी नेमकं काय म्हणाले.

हे ही वाचा>> Chhagan Bhujbal : मनोज जरांगेंविरुद्ध दंड थोपटणाऱ्या भुजबळांच्या मागे फडणवीस आहेत का?

‘ठाकरे गटाने 21 जूनला जारी केलेला व्हिप बनावट’

‘माझ्या मते युक्तिवाद चांगला झाला. आम्हाला जी उत्तरं हवी होती सुनील प्रभू यांच्याकडून.. ती उत्तरं त्यांनी दिली. त्यामुळे आमची केस आणखी मजबूत झाली आहे. आम्ही भरपूर खूष आहोत. आमचं म्हणणं आहे की, त्यांनी जो व्हिप जारी केला 21 जून रोजी.. तो व्हिप कधीच इश्यू झालेलाच नव्हता. तो एक बोगस व्हिप आहे, बनावट व्हिप आहे.’

‘त्या लोकांची अपात्रता याचिका या आधारावर आहे की, 21 तारखेचा जो व्हिप जारी केला होता त्याच्याविरोधात कोणी आलं नव्हतं बैठकीसाठी. तो 21 तारखेचा जो व्हिप होता प्रत्येक आमदाराला सांगण्यात आलं होतं की, तुम्हाला बैठकीला यायचं आहे. जे बैठकीला हजर नव्हते त्यांना अपात्र करा.. अशी त्यांची मागणी. पण आजच्या सुनावणीमध्ये आम्ही ग्राऊंड तयार केलं.’

’21 तारखेचा व्हिप जो सुनील प्रभूंनी जारी केला होता.. तो सकृतदर्शनी एक बोगस व्हिप आहे.. तो कधी पाठविण्यातच आला नव्हता. हा बनावटच व्हिप आहे.. असं आमचं म्हणणं आहे.’

‘काही गोष्टी आपल्याला आश्चर्यचकीत करणाऱ्या असतील. बघा पुढे काय-काय होतंय ते. पण 31 डिसेंबरपर्यंत सुनावणी पूर्ण होईल. कारण सर्वोच्च न्यायालयाने तोपर्यंत निर्णय द्यायला सांगितला आहे.’ असं महेश जेठमलानी यावेळी म्हणाले.

हे ही वाचा>> MLA Disqualification: ‘त्या’ व्हीपवरून तुफान वाद, प्रभू-जेठमलानी भिडले, वाचा सुनावणी जशीच्या तशी..

आता महेश जेठमलानी यांच्या या आरोपाला शिवसेना (UBT) नेमकं काय उत्तर देतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. शिवाय या सगळ्या आरोपांचा आमदार अपात्रता सुनावणीच्या निकालावर काय परिणाम होतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

    follow whatsapp